हूल हीच चाहूल आजवर तीच ओळखीची
आळवावरचा थेंब जसा अस्पर्श उजागर त्याची
एकेक शहारा आस तयाला ह्या हृदयीची त्या हृदयी
झुरे सावली वाटेवरती खंत तिला रात्रीची
रोमांकित अनुबंध पोरका धग अशीच जराशी
फुंकर हळवी भेट चेतवे निखाराच वैशाखी
संधीवरची दूर क्षितीजे स्मरणे आभासाची
सुंभ जळाले पीळ खळे ना राख चिमुटभर बाकी
………………अज्ञात
प्रतिक्रिया
8 Feb 2014 - 4:15 am | पाषाणभेद
(जाऊद्या काका आता. वेळ निघून गेली.)
मस्त काव्य आहे! हुरहुर लागली.