मिपाचे नविन सदस्य

बरखा's picture
बरखा in जे न देखे रवी...
5 Feb 2014 - 5:14 pm

ही कविता मिपाचे नविन सदस्या॑साठी
मिपावरी नविन सदस्यत्व मिळाले
अतिविचाराने मग लेख मि ट्॑कले
प्रतिसादा॑चा हा पाउस पडला
लेखाची मग खिल्ली उड्वुनी गेला|
एक-दोन प्रतिसादा॑नी दिलासा तो मिळाला
पुन्हा आमचा तो ट्॑कनाचा प्रयत्न सुरु झाला
विचार करोनी मग लेख मी ट्॑कला
प्रतिसाद न आले तया लेखनाला||:(
ट्॑कनाचा मग नाद मी सोडिला
केवळ वाचनात मी जीव गु॑तवला
आवड्ले लेख तर प्रतिसाद मी दिला
लेखाला न मिळाले एवढे प्रतिसाद त्याला||| :)
धन्य हो मिपा आणि मिपाकरहो
कधी घेति उचलुनी डोक्यावर हो
तर कधी पाडती धाड्कन तो॑डावर हो|||| :(
तरीही मिपा वाटे आपलेसे
सख्या नात्याहुन ही घट्ट ईथली नाति
करी चेष्टा मस्करी तरि न होई दुखी कोणी|||||
सुचेनासे झाले कि मिपा उघडावे
लेखाखालिल प्रतिसाद वाचावे
चि॑ता होई दुर मन होई प्रसन्न
चि॑ता दुर करण्याची दवा आहे प्रतिसादात॑
जय जय मिपा आणि मिपाकर हो|||||| :)

विडंबन

प्रतिक्रिया

विटेकर's picture

5 Feb 2014 - 5:21 pm | विटेकर

कुठल्या छंदात आहे ही कविता ? काही अनुप्रास, यमक वगैरे ? " मीटर " मधे काहीच बसत नाही .
हा फटका आहे का ? नेमेकं काय आहे?
आणि पल्लवी कुलकर्णी इतकं छान नाव आहे त्याचे हे असं काय केलयं ?
( ह घ्या)

दिपक.कुवेत's picture

5 Feb 2014 - 5:46 pm | दिपक.कुवेत

कुठे मीटर, यमक वगैरे शोधत बसताय. आशय भावला म्हणजे झालं. निदान मला तरी अश्या साद्या, सोप्या, समजतील अशाच कविता आवडतात. पल्लवी....लगे रहो. ऑल दि बेस्ट!

चिन्मय खंडागळे's picture

5 Feb 2014 - 6:09 pm | चिन्मय खंडागळे

सहमत आहे.
प्रास, यमक, वृत्त सगळ्याची काशी करून कुठलेही बडबडगीत कविता म्हणून टाकण्याचे प्रकार वाढत चालले आहेत.
'कविता' आणि 'विनोद' म्हणजे काय कोणीही करू शकतो अशीच धारणा असते. त्यातून 'विनोदी कविता' म्हणजे संपलंच.

विवेकपटाईत's picture

5 Feb 2014 - 7:29 pm | विवेकपटाईत

किती जुनाट विचार सारणी कवितेला मीटर विजेचे असते किंवा पाण्याचे इत्यादी. कवितेत कुठे मीटर बसवायचे. आणि मीटर असेल तर बिल हे आलेच पुन्हा प्रश्न 'कोण घेणार आणि कोण भरणार? . बाकी यमक इत्यादी बाबी आता जुन्या झाल्या. झाडाला (मिसळपावच्या) नवी पालवी (पल्लवी) फुटली आहे. तिला बहरू तरी द्या.

वैभव जाधव's picture

5 Feb 2014 - 8:00 pm | वैभव जाधव

अहो पण भाराभार टायपण्यात कितीहि पटाईत असलो तरी कुणासमोर काय अन कसे मांडावे याचा विवेक नको का?

अत्रुप्त आत्मा's picture

5 Feb 2014 - 8:05 pm | अत्रुप्त आत्मा

@कुठल्या छंदात आहे ही कविता ? >>> :D अनंतछंदी! ;)

कविता करताना कुठ्लाही छ्॑द मनात धरुन ती केलेली नाही. जसे मनात येत गेले तसे लिहिले, तरिही कविता वाचायची असल्यास "मनाचे श्लोका" प्रमाणे वाचावी.
प्रश्न : पल्लवी कुलकर्णी इतकं छान नाव आहे त्याचे हे असं काय केलयं ?
उत्तर : मिपाचे सदस्यत्व घेतले तेव्हा ट्॑कनाचा आणि तेही मराठी ट्॑कनाचा काहिच अनुभव न्हवता. नाव घेताना जसे ट्॑कले तसेच आले , त्याला पुन्हा बदलण्याचा प्रयास केला नाही. जर नाव बदलता येत असेल तर ते कसे बदलायचे ते सा॑गितल्यास नक्की सुधारणा करेन.
पल्लवी कुलकर्णी.

जेपी's picture

6 Feb 2014 - 5:49 pm | जेपी

नाव बदलायचे आसे .
संपादक मंडळाशी संर्पक करा .
(नुकताच नाव बदलेला) तथास्तु

जे काय असल ते आवडल्या आहे .
पण .........

मुक्त विहारि's picture

5 Feb 2014 - 5:48 pm | मुक्त विहारि

विशेषतः शेवटचे कडवे...

"तर कधी पाडती धाड्कन तो॑डावर हो|||
तरीही मिपा वाटे आपलेसे
सख्या नात्याहुन ही घट्ट ईथली नाति
करी चेष्टा मस्करी तरि न होई दुखी कोणी|||||
सुचेनासे झाले कि मिपा उघडावे
लेखाखालिल प्रतिसाद वाचावे
चि॑ता होई दुर मन होई प्रसन्न
चि॑ता दुर करण्याची दवा आहे प्रतिसादात॑
जय जय मिपा आणि मिपाकर हो||||||"

एकदम चपखल....

आयुर्हित's picture

6 Feb 2014 - 12:00 am | आयुर्हित

खूप चांगला प्रयत्न, भावना पोचल्या!
असेच छान छान लिहित जाणे.

मनापासुन केलेली रचना आवडली. :)

आनन्दिता's picture

6 Feb 2014 - 5:30 am | आनन्दिता

+१ हेच म्हणते...

सुदर्शन काळे's picture

6 Feb 2014 - 4:00 pm | सुदर्शन काळे

रचना कुठल्याहि छंदात असो वा नसो... मनापासुन केलेली काव्यरचना आहे ही.. म्हणून दाद द्यायलास हवी. मिपाच्या सर्व अनुयायांचं अगदी समर्पक वर्णन....
मी देखिल कधीही मिपाजाल उघडुन प्रतिक्रिया (आणि त्यावरच्या प्रतिक्रिया) वाचत असतो... एकदम रिफ्रेशिंग...
अजुन येउद्या पल्लवीजी...

इशा१२३'s picture

6 Feb 2014 - 7:01 pm | इशा१२३

शेवटचे कडवे मस्त!