बंबईसे आया मेरा दोस्त

आयुर्हित's picture
आयुर्हित in जनातलं, मनातलं
21 Jan 2014 - 11:37 pm

मला लहानपणापासूनच बंबईसे आया मेरा दोस्त ह्या गाण्याचे खूप अप्रूप होते. बऱ्याच वेळेला मी हे गाणे गुणगुणायचो. कळत न कळत माझ्या मनावर (नको तो) परिणाम झालाच. म्हणजे शाळेत/महाविद्यालयात जात असताना रात्र रात्र जागून अभ्यास करणे, साहजिकच सकाळी उशिरा उठणे, कसे अगदी चांगले वाटत होते!

पण तरीहि, काही तरी चुकल्यासारखे वाटायचे, कारण कि आमची न शिकलेली आजी सारखी सांगायची कि “लवकर निजे लवकर उठे, तया ज्ञान आरोग्य संपत्ती भेटे”

दिवस अगदी मजेत जात होते. नोकरीला लागल्यानंतर एक कंपू असा भेटला कि “रात्र रात्र जागून अगदी सकाळ उजाडेपर्यंत” पीत बसणे हे दर आठवड्याला होऊ लागले.

पार्टीचे, वाढदिवसाचे निमित्त करून रात्री उशिरा जेवणे, उशिरा पर्यंत जागत राहणे आजतागायत चालूच राहिले.

पण आता तरी यात बदल करावा लागणार आहे असे वाटते. कारण आमची न शिकलेली आजी, खूप मोठ्ठे तत्वज्ञान सांगत होती, हे पटायला २०१४ साल उजाडावे लागले आणि मनात असलेले भारतीय संस्कृतीचे महत्व अजूनही वाढले.

(क्रमश:)

धोरणसंस्कृतीजीवनमानतंत्रऔषधोपचारशिक्षणप्रकटनसद्भावनामाध्यमवेधअनुभवमाहितीप्रश्नोत्तरे

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

22 Jan 2014 - 2:15 am | खटपट्या

हम्म !!! पुढे काय

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Jan 2014 - 5:40 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मला लहानपणापासूनच गीत रामायणातल्या "हाणा मारा कापा तोडा" ह्या ओळींचे खूप अप्रूप होते. नंतर मी मोठी झाले. कसं ना!

विकास's picture

22 Jan 2014 - 10:56 am | विकास

आपले अनुभवाधारीत लिखाण मुक्तपिठापेक्षा, पैलतीर या सदरात योग्य ठरेल.

प्यारे१'s picture

22 Jan 2014 - 12:41 pm | प्यारे१

+७८६.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Jan 2014 - 7:39 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

तुमच्यामुळे मला 'ट्विटर कथा' मराठीत लिहीण्याची कल्पना मिळाली.

वरच्या प्रतिसादातलं 'कसं ना' एवढं काढून टाकलं की एक कथा झाली.

आदूबाळ's picture

22 Jan 2014 - 8:40 pm | आदूबाळ

काय राव! मिपा-वागळ्यांनी "अवांतर नको"ची खुंटी मारली नाही या वेळेस तर धावले सगळे चानस मारायला...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Jan 2014 - 9:01 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मला धागा वाचून वाटलं, सगळ्यांनी आपापल्या लहानपणापासून आत्तापर्यंत काय बदल झाले हे मर्यादित शब्दात लिहायचं असं धाग्याचं रूप आहे. म्हणून मी पण अंमळ आखूड प्रयत्न केला.

विकास's picture

22 Jan 2014 - 9:21 pm | विकास

सगळ्यांनी आपापल्या लहानपणापासून आत्तापर्यंत काय बदल झाले हे मर्यादित शब्दात लिहायचं असं धाग्याचं रूप आहे.
कल्पना चांगली आहे. मी लगेच लिहायचा विचार केला पण "मर्यादीत शब्द" ही संकल्पना अजून समजतच नाही. कदाचीत मी अजून त्यासाठी लहान असेन.

म्हणून मी पण अंमळ आखूड प्रयत्न केला.

मी चुकून आखूडच्या ऐवजी आखडू वाचले, त्याबद्दल क्षमस्व.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Jan 2014 - 9:26 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मी चुकून आखूडच्या ऐवजी आखडू वाचले, त्याबद्दल क्षमस्व.

नाही. क्षमा मागूच नका. आखूड हा शब्द वापरण्यामागे हा पण एक हेतू होताच.

विकास's picture

22 Jan 2014 - 10:48 pm | विकास

नाही. क्षमा मागूच नका.

असे वाचल्यावर आखडू कसे म्हणणार? खरचं आमच्या सातवीतल्या बाईंनी बरोबर सांगितले होते की "आखडू म्हणू नये", ते एकदम आठवले.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Jan 2014 - 2:48 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

आशं नै कलाचं. ;-)

मला केवढा अभिमान वाटतो हो, मला कोणी आखडू, स्नॉब वगैरे म्हटल्यावर!

विकास's picture

23 Jan 2014 - 3:50 am | विकास

मला केवढा अभिमान वाटतो हो, मला कोणी आखडू, स्नॉब वगैरे म्हटल्यावर!

म्हणूनच असे जेंव्हा मी म्हणत नाही तेंव्हा मी वास्तवीक तुमच्यावर टिका करत असतो! ;)

चित्रगुप्त's picture

22 Jan 2014 - 9:06 am | चित्रगुप्त

छान. आवडले.
'लवकर निजे, लवकर उठे' यावर पूर्वीचा एक धागा आहे, आणि त्यावर प्रतिसादांची धमाल आहे.
उदाहरणार्थ, बॅटमॅन यांचा काव्यमय (पृथ्वी वृत्तातील) प्रतिसादः

निजे लवकरी उठे चटशिरी, तयाला खरी |
मिळेल धनबुद्धिसंपद बहू, टनाने जरी |
नुरे निजसखी तयाजवळि हो, करी दे तुरी |
पळोनि इतरांस डेटित बसे, बला ही खरी ||

आणि आमचे शार्दुलविक्रिडातील हे कवन ( चालः मंगलाष्टकाची)
झोपे आणि उठे झणीं पुरुष जो - पावेल आयुर्मती
गाठी नित्य सखी तयाचि सुभगा - अन्यांस देण्या रती

मूळ धाग्याचा दुवा: (कसं सुचतं हे सगळं ? अहो, ब्रह्ममुहूर्तावर जाग येण्यातून.)
http://misalpav.com/node/24817

टवाळ कार्टा's picture

22 Jan 2014 - 10:46 am | टवाळ कार्टा

=))

झोपे आणि उठे झणीं पुरुष जो - पावेल आयुर्मती
गाठी नित्य सखी तयाचि सुभगा - अन्यांस देण्या रती

हे अधिक गोळीबंद झालेय. चित्रांसोबत शब्दचित्रांतही आपला हातखंडा आहे चित्रगुप्त सर.

>>झोपे आणि उठे झणीं पुरुष जो - पावेल आयुर्मती
गाठी नित्य सखी तयाचि सुभगा - अन्यांस देण्या रती

हे झक्कासच !! :))))

पण आता तरी यात बदल करावा लागणार आहे असे वाटते. कारण आमची न शिकलेली आजी, खूप मोठ्ठे तत्वज्ञान सांगत होती, हे पटायला २०१४ साल उजाडावे लागले आणि मनात असलेले भारतीय संस्कृतीचे महत्व अजूनही वाढले.

म्हणजे २०१४ मध्ये नक्की काय घडलं की ज्यामुळे आपल्याला आपल्या मध्ये बदल घडवावा असं वाटलं हे जाणण्याची उत्सुकता आहे.

बाकी एवढेसे मॅटर आणि क्रमशः????? बात कुछ जमी नही.

छान ! छान !! भारतीय संस्कृती खरच महान आहे.
तुमचा संकल्प सिद्धिस जावो ही सदिच्छा !

(पुढचा संकल्प याच लेखात सांगीतला असता तरी चालले असते)

चिरोटा's picture

22 Jan 2014 - 11:19 am | चिरोटा

मस्त्.टोपणनावावरून आपण लवकर निजून लवकर उठणारे,सूर्यनमस्कार घालणारे,च्यवनप्राश खाणारे वाटला होतात.

मंदार कात्रे's picture

22 Jan 2014 - 11:46 am | मंदार कात्रे

'जीवशास्त्रीय घड्याळ' हीच संकल्पना यासंदर्भात लागू पडते .
त्याचप्रमाणॅ पहाटे ३ च्या वेळी झोप आर ई एम अवस्थेतली झोप म्हणजेच साखरझोप असते...

यावेळेला अनेक क्रिएटीव्ह / सुखद भावना जाग्रुत करणारे हार्मोन स्रवतात ,असे मागे वाचलेले होते.

मदनबाण's picture

23 Jan 2014 - 10:37 pm | मदनबाण

त्याचप्रमाणॅ पहाटे ३ च्या वेळी झोप आर ई एम अवस्थेतली झोप म्हणजेच साखरझोप असते...
जवळपास ३+ वर्ष अशी { रामदास काकांच्या शब्दात सांगायचे झाले तर ग्रेव्हवयार्ड शिफ्ट}शिफ्ट केली आहे ! म्हणजे १:४०/४५ ड्रायव्हर फोन करायचा... साब,गाडी आ गया है| माझ्या मोबल्यात २:०० एम चा अलार्म सेट असायचा. १५ मिनीटात अंघोळ करुन खाली यायचे,कुत्र्यांच्या तावडीतुन स्वतःला वाचवुन स्वतःला गाडीत ढकलायचे...ऑफिस येई पर्यंत त्याच्याशी सतत बोलत रहायचे ! नाहीतर भाऊ स्टेअरिंगवर झोपणार याची खात्री ! ३:१५ ला हॅन्डऑव्हर घ्यायचा व ३:३० ला आयपी फोन भारतात ट्रान्सफर करायचा की शिफ्ट सुरु... दर ५ दिवसांनी शिफ्ट बदलायची ! तरी अजुन जिवंत आहे.

सकाळी 6 ते 7 - 1 कप चहा, 1 फळ, स्वतः:चे आन्हिक आवरणे
स. 7 ते 7।। - 12 सूर्यनमस्कार, 200 ते 500 दोरीच्या उड्या....

पण तो सगळा प्रोग्रॅम या वयोगटासाठी आहे:

स. 11।। ते 5।। - शाळा

आणि या वेळा पाळायच्या असतील :

रात्री 10 ते सकाळी 6 - झोप

तर हा आयटम :

मैत्रिणींबरोबर बाहेर जाणे, ....

त्यात बसणे नाही!

राजेंद्र मेहेंदळे's picture

22 Jan 2014 - 8:35 pm | राजेंद्र मेहेंदळे

अहो ते निजे उठे वगैरे सगळं ठिक आहे हो...पण आम्ही हपिसात येणार १ वाजता नि घरी जाणार रात्री १ वाजता
कसं जमायचं वो?

संजय क्षीरसागर's picture

23 Jan 2014 - 1:24 pm | संजय क्षीरसागर

`सकळा उठवी बळे' हा सदर लेखाचा पुढचा भाग आहे! वाट पाहा.

राजेश घासकडवी's picture

22 Jan 2014 - 9:18 pm | राजेश घासकडवी

मनात असलेले भारतीय संस्कृतीचे महत्व अजूनही वाढले.

यावरून भारतीय संस्कृतीचं महत्त्व कसं वाढलं हे कळत नाही. कारण इतर संस्कृतींमध्येही अशाच म्हणी आहेत.

Early to bed and early to rise makes a man healthy, wealthy, and wise.

चिरोटा's picture

23 Jan 2014 - 10:59 am | चिरोटा

महत्व मनात वाढलय.

हात्तेरेकी. अहो गुर्जी त्या इंग्रजांनी आपल्या इथूनच ती म्हण चोरली आहे. सांगतो कसं ते.

भारतात इंग्रज पहिल्यांदा बंगालात स्थिरावले. बंगाल पूर्वेला असल्याने तिकडे सूर्योदय आणि सूर्यास्त लवकर होतो. शिवाय बंगाल प्रांत सुपीकता आणि समृद्धीसाठी फेमस होता. म्हणून ती म्हण तशी तयार झाली. म्हणजे व्हा तुम्ही वेल्दी वैग्रे, आम्ही येतोच तुम्हाला लुटायला असं त्यात अभिप्रेत आहे ;)

पैसा's picture

28 Jan 2014 - 7:40 pm | पैसा

diary

चांगली सवय लावून घेतल्याबद्दल ही सप्रेम भेट. आता डायरी लिहायचीही सवय ठेवा.

आयुर्हित's picture

28 Jan 2014 - 8:50 pm | आयुर्हित

भेट आवडली.(स्वगत: पण मिपा सारखी दुसरी चांगली डायरी कुठे मिळणार नाही)
धन्यवाद.

प्यारे१'s picture

28 Jan 2014 - 9:10 pm | प्यारे१

___/\___

पैसातै!
द्या. सदस्यांना डायर्‍या द्या.

सुबोध खरे's picture

28 Jan 2014 - 9:13 pm | सुबोध खरे

http://www.firstpost.com/india/no-indian-standard-time-assam-will-turn-i....
लवकर उठल्यामुळे आणि लवकर निजल्यामुळे आपण सूर्याची उर्जा आणि प्रकाश फुकट घालवतो. जर हेच आपले घड्याळ एक तासाने पुढे केले तर विजेचा होणारा बराच अपव्यय टळेल. हे विशेषतः पुर्ण वेळ सूर्यप्रकाश असणार्या भारतासारख्या देशात आहे.
अमेरिकेत त्याचा फारसा फायदा होणार नाही असे त्यांचे आकडे दर्शवितात.
क्रमश

खूप चांगला पण वेगळा मुद्दा आहे! हा फक्त आसाम/पूर्वेकडच्या राज्यामध्ये लागू होऊ शकणारा day light saving चा मुद्दा आहे.

मी सांगतो तो मुद्दा: भारतीय संस्कृतीत सांगितल्या प्रमाणे लवकर उठल्यामुळे आणि लवकर निजल्यामुळे समस्त मानव जातीवर होणारे फायदे हे आरोग्यदायी, ज्ञानवर्धक व त्यामुळे संपत्तीवर्धक देखील आहेत.

याचा जर सर्वांनी फायदा घेतला तर पुढच्या १० वर्षात कमीत कमी २००कोटी लोकांचे होऊ घातलेले आजार टळतील.

आयुर्हित's picture

4 Jun 2014 - 12:50 pm | आयुर्हित

दलाई लामांचा आदर्श दिनक्रम (जे ठरवतिल त्या)सर्वान्नाच उपयुक्त ठरेल असा आहे.

दलाई लामा यांच्या त्या निर्मळ हास्याचा फॉर्म्युला