गुलाब इतके सुंदर असतात कि ती फार वेळ झाडावर राहत नाहीत. लगेच तोडली जातात. पण यामुळेच गुलाबालाही फळं लागतात हे बर्याच जणांना ठाऊक नसते. ज्यांना ठाऊक असते त्यांनी ती पाहिलेली नसतात.
काही दिवसांपुर्वी मी गावाहून एक गावठी (नेटिव्ह) जातीच्या गुलाबाची काडी मागवून घेतली. या नेटिव्ह जातींना सहज फळे धरतात. असंच एक फूल मी न तोडता झाडावरच राखून ठेवलं. फूल मावळल्यावर त्याच्या बुडाशी एक फळ धरले. पण या फळांना पिकण्यासाठी बरेच महिने जावे लगतात. मला तर सहा महिन्यंपेक्षा जास्त काळ जावा लागला. गुलाबाच्या पक्व फळा मध्ये व्हिटॅमीन सी प्रचंड प्रमाणात असतं अगदी संत्र्यापेक्षाही! चवीला याचा गर तसा आंबट होता.
वाचकांसाठी या गुलाबाचे फोटो टाकत आहे.
अधिक माहीती
गुलाबाच्या नवीन जाती अशाच प्रकारे तयार केल्या जातात. त्यासाठी "आई" झाडावर गुलाबाचे फळ राखून ठेवायचे. ते पुर्ण उमलण्यापुर्वीच त्याच्या पाकळ्या काढून ते फूल एका प्लॅस्टीकच्या पिशवीने झाकून ठेवायचे जेणेकरून त्यावर नको असलेल्या "बाप" फुलाचे परागकण पडून नयेत.आई फूलाचे स्त्रीकेसर पुर्ण तयार झाल्यावर त्यावरची पिशवी सोडून ठरावीक अश्या जातिवंत "बाप" फुलाचे पराग कण टाकावेत. नशीब चांगले असल्यास "आई" फुलाला फळ धरेल. नशीब आणखी चांगले असल्यास ते फळ टिकेल नि पिकेल. नशीब आणखी आणखी चांगले असल्यास त्यापासून तयार झालेले बी उगवेल. आणि शेवटी नशीब अती उच्च असले तर एखादी नवीन जातिवंत फुलाची जात तुमच्या नावावर नोंद होईल.
व्यवसाईक गुलाब उत्पादक "आई" आणि "बाप" फुलांचा जिनॅटीकल अभ्यास करून नवीन तयार होणार्या गुलाबाचा अंदाज बांधून कष्ट कमी करतात. उदा. हायब्रीड टी गुलाब हा टी गुलाब आणि परपेच्युअल गुलाबाच्या संकरातून तयार केला गेला आहे. या हायब्रीड गुलाबामध्ये सुद्धा रंग आणि इतर वैशिष्ट्या नुसार बरेच उपप्रकार आहेत.
दुर्दैवाने भारतिय हायब्रीडायजर ची संख्या नगण्य आहे. कारण संशोधनासारखी फालतू कामं करणं आम्हा भारतियांच्या स्वभावात बसत नाही.
मी सुद्धा शेवटी भारतियच म्हणून आपलं नुसतच गुलाबाचं फळ वाढू दिलं. आता बघू माझं नशीब कसं आहे ते.
फळाच्या बुडाशी तयार झालेलं फळ
पक्व झालेल फळ
पक्व फळाचा छेद
फळातील बिया
प्रतिक्रिया
12 Jan 2014 - 12:39 pm | डॉ सुहास म्हात्रे
छान संशोधन आहे. त्या बियांची झाडे झाली की जरूर कळवा... त्या बियांपासून कोणता गुलाबाचा प्रकार अपेक्षित आहे तेही लिहून ठेवा म्हणजे प्रयोग अंदाजाप्रमाणे झाला की नाही ते कळायला मदत होईल.
13 Jan 2014 - 6:15 pm | अनिरुद्ध प
+१११ इस्पीकचा एक्का शी सहमत.
12 Jan 2014 - 1:27 pm | टवाळ कार्टा
आयला....बराच वेळ आहे सध्ध्या :)
आरसा झाला का?
12 Jan 2014 - 2:42 pm | रम्या
तुर्तास आम्हाला अनेक झटक्यांपैकी एक असा बागकामाचा अट्याक आलेला आहे त्यामुळे आरशात पहायला वेळ नाही :)
12 Jan 2014 - 2:51 pm | टवाळ कार्टा
हाहा...चालुदे
12 Jan 2014 - 2:16 pm | पैसा
झाडे तयार झाली की नक्की कळवा बरं!
13 Jan 2014 - 6:06 pm | जेपी
बर्याच वर्षापुर्वी घरातील गुलाबाला अस फळ आलत , चांगल सुपारी ऐवढ मोठ होत . पण नेमक काय ते कळाल नाही .
पुढच्या वेळेस लक्ष देईन .
13 Jan 2014 - 6:10 pm | कवितानागेश
मस्तच आहे की. :)
13 Jan 2014 - 6:11 pm | सूड
छान माहिती.
13 Jan 2014 - 9:04 pm | मुक्त विहारि
धन्यवाद.
13 Jan 2014 - 9:34 pm | शुचि
उत्तम माहीती.
14 Jan 2014 - 2:46 am | कंजूस
फार छान फोटो .तुम्हा खरे जातीवंत झाड मिळाले आहे .
गुलाबाचे फुल सुंदर टिकाऊ
करण्याच्या प्रयत्नांत त्याचा सुगंधिपणा आणि फळ धरण्याचा गुण हरवला .
अत्तर बनवण्यासाठी जो सुगंधि गुलाब लागतो (दमास्कस गुलाब )त्याला अशी फळे येतात .त्यापासून ही सहा महिन्याने रोपे करता येतात .या गुलाबाला फक्त एप्रिल मे मध्ये फुले येतात .फुले पहाटे चारला फुलतात आणि नऊच्या आत तोडावी लागतात .याची शेती कानपूरला होते .
गुलाबाची संपूर्ण माहिती 'ROSE 'या नैशनल बुक ट्रस्टच्या पुस्तकात आहे .लेखक अमिताव ,किंमत रु २८ .
14 Jan 2014 - 5:00 am | रम्या
कंजूस, नवी माहिती दिल्याबद्द्ल धन्यवाद
14 Jan 2014 - 3:18 am | रेवती
छान माहिती.
14 Jan 2014 - 3:22 am | बर्फाळलांडगा
नशीब चमकुदे म्हणून.
14 Jan 2014 - 6:08 am | खटपट्या
मस्त माहीती !!!
14 Jan 2014 - 2:54 pm | बॅटमॅन
हा आणि नवीनच प्रकार!!! धन्यवाद हो नवीन माहिती दिल्याबद्दल. :)