✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

गुलाबाचे फळ

र
रम्या यांनी
Sun, 01/12/2014 - 12:34  ·  लेख
लेख
गुलाब इतके सुंदर असतात कि ती फार वेळ झाडावर राहत नाहीत. लगेच तोडली जातात. पण यामुळेच गुलाबालाही फळं लागतात हे बर्‍याच जणांना ठाऊक नसते. ज्यांना ठाऊक असते त्यांनी ती पाहिलेली नसतात. काही दिवसांपुर्वी मी गावाहून एक गावठी (नेटिव्ह) जातीच्या गुलाबाची काडी मागवून घेतली. या नेटिव्ह जातींना सहज फळे धरतात. असंच एक फूल मी न तोडता झाडावरच राखून ठेवलं. फूल मावळल्यावर त्याच्या बुडाशी एक फळ धरले. पण या फळांना पिकण्यासाठी बरेच महिने जावे लगतात. मला तर सहा महिन्यंपेक्षा जास्त काळ जावा लागला. गुलाबाच्या पक्व फळा मध्ये व्हिटॅमीन सी प्रचंड प्रमाणात असतं अगदी संत्र्यापेक्षाही! चवीला याचा गर तसा आंबट होता. वाचकांसाठी या गुलाबाचे फोटो टाकत आहे. अधिक माहीती गुलाबाच्या नवीन जाती अशाच प्रकारे तयार केल्या जातात. त्यासाठी "आई" झाडावर गुलाबाचे फळ राखून ठेवायचे. ते पुर्ण उमलण्यापुर्वीच त्याच्या पाकळ्या काढून ते फूल एका प्लॅस्टीकच्या पिशवीने झाकून ठेवायचे जेणेकरून त्यावर नको असलेल्या "बाप" फुलाचे परागकण पडून नयेत.आई फूलाचे स्त्रीकेसर पुर्ण तयार झाल्यावर त्यावरची पिशवी सोडून ठरावीक अश्या जातिवंत "बाप" फुलाचे पराग कण टाकावेत. नशीब चांगले असल्यास "आई" फुलाला फळ धरेल. नशीब आणखी चांगले असल्यास ते फळ टिकेल नि पिकेल. नशीब आणखी आणखी चांगले असल्यास त्यापासून तयार झालेले बी उगवेल. आणि शेवटी नशीब अती उच्च असले तर एखादी नवीन जातिवंत फुलाची जात तुमच्या नावावर नोंद होईल. व्यवसाईक गुलाब उत्पादक "आई" आणि "बाप" फुलांचा जिनॅटीकल अभ्यास करून नवीन तयार होणार्‍या गुलाबाचा अंदाज बांधून कष्ट कमी करतात. उदा. हायब्रीड टी गुलाब हा टी गुलाब आणि परपेच्युअल गुलाबाच्या संकरातून तयार केला गेला आहे. या हायब्रीड गुलाबामध्ये सुद्धा रंग आणि इतर वैशिष्ट्या नुसार बरेच उपप्रकार आहेत. दुर्दैवाने भारतिय हायब्रीडायजर ची संख्या नगण्य आहे. कारण संशोधनासारखी फालतू कामं करणं आम्हा भारतियांच्या स्वभावात बसत नाही. मी सुद्धा शेवटी भारतियच म्हणून आपलं नुसतच गुलाबाचं फळ वाढू दिलं. आता बघू माझं नशीब कसं आहे ते. फळाच्या बुडाशी तयार झालेलं फळ raw fruit पक्व झालेल फळ rippen fruit rippen fruit पक्व फळाचा छेद फळाचा छेद फळातील बिया फळातील बिया
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
विज्ञान
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
8137 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

छान संशोधन आहे. त्या बियांची

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 01/12/2014 - 12:39 नवीन
छान संशोधन आहे. त्या बियांची झाडे झाली की जरूर कळवा... त्या बियांपासून कोणता गुलाबाचा प्रकार अपेक्षित आहे तेही लिहून ठेवा म्हणजे प्रयोग अंदाजाप्रमाणे झाला की नाही ते कळायला मदत होईल.
  • Log in or register to post comments

+१११

अनिरुद्ध प
Mon, 01/13/2014 - 18:15 नवीन
+१११ इस्पीकचा एक्का शी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

आयला....बराच वेळ आहे सध्ध्या

टवाळ कार्टा
Sun, 01/12/2014 - 13:27 नवीन
आयला....बराच वेळ आहे सध्ध्या :) आरसा झाला का?
  • Log in or register to post comments

तुर्तास आम्हाला अनेक

रम्या
Sun, 01/12/2014 - 14:42 नवीन
तुर्तास आम्हाला अनेक झटक्यांपैकी एक असा बागकामाचा अट्याक आलेला आहे त्यामुळे आरशात पहायला वेळ नाही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

हाहा...चालुदे

टवाळ कार्टा
Sun, 01/12/2014 - 14:51 नवीन
हाहा...चालुदे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रम्या

भारीच की!

पैसा
Sun, 01/12/2014 - 14:16 नवीन
झाडे तयार झाली की नक्की कळवा बरं!
  • Log in or register to post comments

बर्याच वर्षापुर्वी घरातील

जेपी
Mon, 01/13/2014 - 18:06 नवीन
बर्याच वर्षापुर्वी घरातील गुलाबाला अस फळ आलत , चांगल सुपारी ऐवढ मोठ होत . पण नेमक काय ते कळाल नाही . पुढच्या वेळेस लक्ष देईन .
  • Log in or register to post comments

मस्तच आहे की.

कवितानागेश
Mon, 01/13/2014 - 18:10 नवीन
मस्तच आहे की. :)
  • Log in or register to post comments

छान माहिती.

सूड
Mon, 01/13/2014 - 18:11 नवीन
छान माहिती.
  • Log in or register to post comments

छान माहिती.

मुक्त विहारि
Mon, 01/13/2014 - 21:04 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments

उत्तम माहीती.

शुचि
Mon, 01/13/2014 - 21:34 नवीन
उत्तम माहीती.
  • Log in or register to post comments

फार छान फोटो .तुम्हा खरे

कंजूस
Tue, 01/14/2014 - 02:46 नवीन
फार छान फोटो .तुम्हा खरे जातीवंत झाड मिळाले आहे . गुलाबाचे फुल सुंदर टिकाऊ करण्याच्या प्रयत्नांत त्याचा सुगंधिपणा आणि फळ धरण्याचा गुण हरवला . अत्तर बनवण्यासाठी जो सुगंधि गुलाब लागतो (दमास्कस गुलाब )त्याला अशी फळे येतात .त्यापासून ही सहा महिन्याने रोपे करता येतात .या गुलाबाला फक्त एप्रिल मे मध्ये फुले येतात .फुले पहाटे चारला फुलतात आणि नऊच्या आत तोडावी लागतात .याची शेती कानपूरला होते . गुलाबाची संपूर्ण माहिती 'ROSE 'या नैशनल बुक ट्रस्टच्या पुस्तकात आहे .लेखक अमिताव ,किंमत रु २८ .
  • Log in or register to post comments

कंजूस, नवी माहिती

रम्या
Tue, 01/14/2014 - 05:00 नवीन
कंजूस, नवी माहिती दिल्याबद्द्ल धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

छान माहिती.

रेवती
Tue, 01/14/2014 - 03:18 नवीन
छान माहिती.
  • Log in or register to post comments

आल द बेस्ट!

बर्फाळलांडगा
Tue, 01/14/2014 - 03:22 नवीन
नशीब चमकुदे म्हणून.
  • Log in or register to post comments

मस्त माहीती !!!

खटपट्या
Tue, 01/14/2014 - 06:08 नवीन
मस्त माहीती !!!
  • Log in or register to post comments

हा आणि नवीनच प्रकार!!!

बॅटमॅन
Tue, 01/14/2014 - 14:54 नवीन
हा आणि नवीनच प्रकार!!! धन्यवाद हो नवीन माहिती दिल्याबद्दल. :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा