काळजातली धग विझु देउ नकोस.......

पंडित मयुरेश नागेश्वरम देशपांडे's picture
पंडित मयुरेश ना... in जे न देखे रवी...
9 Jan 2014 - 7:02 pm

एक प्रश्न विचारावासा
वाटतो देवा तुला
असा कसा संसाराचा
गाडा तु उभा केला

कुणी न जिंकती कुणी न हारती
कुणी न हसती कुणी न रडती
सारेच अभिमन्यु इथे
नशिबाच्या चक्रव्युहात अडकती

पैजांचा असतो डाव
तीन पत्त्यांत रंगतो खेळ
इथे कुणाचे कुणीच नसती
फक्त असतो हाता-तोंडाचा मेळ

क्षितीजाच्या वाटेवरती
डोळे सारेच लावुन बसतात
तोच सूर्योदय पुन्हा सूर्यास्त
मनातल्या मनात हसत राहतात

ठिणग्यांची कमतरता इथे
अगदीच आहे असे नाही
पण सारे रानच पेटुन उठावे
असे काही घडतच नाही

अद्याप घंटानाद होतोय
गाभारी देवा तुझ्या
अद्याप आस लावुन बसलोय
पायरीशी देवा तुझ्या

तुच आता ओढुन आण
लाट वादळांची एखादी
मुठी वळु दे नसा तापु दे
होउन जाउ दे लढाई एखादी

आम्हीच कर्ण आम्हीच अर्जुन
तरी अपुरे तुझ्या सारथ्थ्या वाचुन
उमेद अमुची ढळुन देउ नकोस
काळजातली धग विझु देउ नकोस.......

- कवि म.ना.दे.

कविता

प्रतिक्रिया

नवशिक्या's picture

9 Jan 2014 - 7:08 pm | नवशिक्या

जय भोले टोले .....

आयुर्हित's picture

9 Jan 2014 - 7:54 pm | आयुर्हित

खूप सुंदर भावार्थ आहे. व्वा, काय सुंदर कविता लिहिता आपण.

नशिबाच्या चक्रवव्युहाला दोष देत,देवापुढे आस लावुन बसल्यानंतर का होईना "होउन जाउ दे लढाई एखादी...." असे वाटणे म्हणजे मर्द असल्याचे लक्षण आहे.

मला एक छान व प्रसिद्ध कविता आठवली.

वाचन: अमिताभ बच्चन
कविता (Kavita – Poem) : अग्निपथ (Agnipath- You)
कवि (Kavi – Poet): हरिवंश राय बच्चन (Harivansh Rai Bachchan)

वृक्ष हों भले खड़े
हों घने, हों बड़े
एक पत्र छाँह भी
मांग मत! मांग मत! मांग मत!
अग्निपथ! अग्निपथ! अग्निपथ!

Trees may have been standing,
May they be dense, may they be big,
even a shade of single leaf,
don’t ask! don’t ask! don’t ask!
(Keep walking on) Agnipath (the path of fire)!, Agnipath!, Agnipath!

तू न थकेगा कभी
तू न थमेगा कभी
तू न मुड़ेगा कभी
कर शपथ! कर शपथ! कर शपथ!
अग्निपथ! अग्निपथ! अग्निपथ!

you won’t ever tired,
you won’t ever stop,
you won’t ever turn back,
take this oath! take this oath! take this oath!
(Keep walking on) Agnipath (the path of fire)!, Agnipath!, Agnipath!

यह महान दृश्य है
चल रहा मनुष्य है
अश्रु-स्वेद-रक्त से
लथ-पथ! लथ-पथ! लथ-पथ!
अग्निपथ! अग्निपथ! अग्निपथ!

This view is great,
the man is walking,
in teardrop, sweat, and blood,
soaked! soaked! soaked!
(Keep walking on) Agnipath (the path of fire)!, Agnipath!, Agnipath!

आपला मिपास्नेही : आयुर्हीत

पंडित मयुरेश नागेश्वरम देशपांडे's picture

9 Jan 2014 - 8:15 pm | पंडित मयुरेश ना...

माझ्या कवितेमुळे तुमच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या असतील तर खुप छान............

खास करुन माझी कविता वाचुन तुम्हाला हि कविता आठवली हे मझे भाग्यच......

आवडली. भापो.(भावना पोचल्या)

पंडित मयुरेश नागेश्वरम देशपांडे's picture

9 Jan 2014 - 8:26 pm | पंडित मयुरेश ना...

स्व रचित असेल तर आणखिनच खास.......

अत्रुप्त आत्मा's picture

9 Jan 2014 - 8:29 pm | अत्रुप्त आत्मा

मलाही एक (अशीच ) कविता अठवली. जळता निखारा!

पंडित मयुरेश नागेश्वरम देशपांडे's picture

9 Jan 2014 - 8:31 pm | पंडित मयुरेश ना...

म्हणजे मला आणि सगळ्यांनाच वाचता येईल