काहि दिवसांपासुन मला (उगाचच) असे वाटत आहे कि मी सल्ले (प्रवचन?) छान देऊ शकते.उदा. ऑफीस चा ताण कमी कसा करावा, बॉसचा त्रास कसा टाळावा,मुलांबद्द्ल जास्त काळजी वाटल्यास काय करावे,आई रागवल्यास काय करावे? इ.
पण कसे आहे आपण दिलेला सल्ला लिखित रुपात राहिला तर्?असे मला वाटले म्हणुन इथे लिहित आहे.(खरं तर तसे मी सल्ले(मुलाच्या शब्दात प्रवचन ) खूप देत असते नवरोजींना.पण ते तुळ राशीचे असल्याने प्रतिक्रिया देत नाहीत.कदाचित त्यांना बॉस खूप त्रास देतो म्हणून माझे सल्ले काम करत नसतील.असो म्हणूनच इथे प्रतिकिया काय मिळतात ते पहायचे आहे!)
सल्ला १- काहि बॉस उगाचच रागवत असतात(आणि रोजच) . हे असेच का नाहि केले?हे का केले?वैगेरे . तर अशा वेळी काय करावे स्वत:ला १ मोबाइल समजावे आणि बॉसला दुसरा. आणि बॉस ब्लू टूथ ऑन करून आपल्याला नको नको ते सेंड(म्हणजे शिव्या, त्रास इ.) करत आहे असे समजावे मग आपण काय करावे आपला ब्लू टूथ ऑफ करून द्यावा म्हणजे आपल्याला त्रास होणार नाही .बॉस आपला एकटाच बडबडत राहील. (जर त्याचे बोलणे सहन होत नसेल तर सरळ माफी मागून केबिन बाहेर निघून जाने.)जो त्रास होतो तो बॉसलाच होईल .(असा मनात विचार करावा म्हणजे आपला त्रास आणखी कमी होईल.)कारण बॉसच्या त्रास जास्त असेल तर आपण निगेटीव्ह विचार जास्त करतो त्याने आपलेच नुकसान होते.आपण आपल्या कामाप्रती पोझीटीव्ह विचार करावा.काही चुकले तर (जास्त)वाईट वाटून घेऊ नये .
सल्ला २:- [माझ्या मुलासाठी मी हा सल्ला दिला आहे जेव्हा मी खूप रागवत असते तेव्हा ]
आई रागवत असेल तर शांत राहावे(ध्यानमुद्रा करावी). आईचे रागावून झाले कि मग सांगावे कि अशी चूक पुन्हा करणार नाही मग आईपण खुश होते राग विसरून जाते.
सल्ला ३:- या जगात प्रत्येकाला दु:ख (कमी -जास्त )असतं. पण आपण ठरवायचे कि या दु:खाचा त्रास करून घ्यायचा कि त्यात सुख शोधन्याचा प्रयत्न करायचा? कोणी आपल्याला काही वाईट म्हटले कि आपण सारखा विचार करतो कि माझ्यात काय कमी आहे?मला असेच का म्हटले?मी खरच वाईट आहे का? पण असा विचार करण्या पेक्षा आपल्याला कोणी वाईट म्हटले हे विसरणे जास्त चांगले (सोपे) आहे ना? जेव्हा मनात नकारात्मक विचार येतात तेव्हा सकारात्मक गाणी ऐकावी,चांगले लेख वाचावे. (मी तर उगाचच विनोद करते, किंवा स्वत: गाणी गाते ).एक नेहमी लक्षात ठेवावे जर छोटासा नकारात्मक विचार आपल्या मनात आला आहे जेव्हा आपल्याला वाटते तेव्हाच त्याला मनातून काढून टाकावा.आणि नेहमी सकारात्मक विचार करावा.
महत्वाची सूचना :-वरील सल्ले ज्याने त्याने आपल्यानुसार घ्यावे. नाही आवडले तर सोडून द्यावे.जास्त विचार करू नये.तसेच सल्ले गंभीर आहेत कि विनोदी हे स्वत:च ठरवावे.
विनंती :- मिपावर लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न आहे. तरी सर्वांच्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत. काही चुकल्यास माफी असावी.(असे लिहायचे असते हो कि नाही?)
वाचने
5456
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुमच्या मुलाने पहिला सल्ला
मी तुला राशिचा असल्याने
***
+१११ कंपुशिवाय पर्याय नाही..
In reply to *** by जेपी
आनन्द्यत्रि ........
(No subject)
मोफत सल्ला केंद्र काढा
चांगले सल्ले आहेत...
छान आहेत सल्ले पण...
आवडले….
मिपावर स्वागत
धन्यवाद......
माफ करा..
मी तर सदासुखी हा पुरुषाचा
सदासुखी आणि पुरुष ??
In reply to मी तर सदासुखी हा पुरुषाचा by खटपट्या
खी खी खी का नाही??
In reply to सदासुखी आणि पुरुष ?? by अभ्या..
अभ्याचे बरोबर आहे.
In reply to खी खी खी का नाही?? by नित्य नुतन
हं..
सल्ला १ बद्दल: (१) अभ्यास
(३) आपल्याला राँग नंबर आल्यास
In reply to सल्ला १ बद्दल: (१) अभ्यास by काळा पहाड
ह्यावर एक किस्सा आठवला.....
In reply to (३) आपल्याला राँग नंबर आल्यास by मोदक
दंडवतच !! __/\__
In reply to ह्यावर एक किस्सा आठवला..... by ज्ञानव
सल्ला १ बद्दल: (१) बॉस नसताना
लई भारी भौ ....
In reply to सल्ला १ बद्दल: (१) बॉस नसताना by काळा पहाड