काजूची फुले

Primary tabs

अनन्न्या's picture
अनन्न्या in दिवाळी अंक
27 Oct 2013 - 9:16 am

साहित्यः
काजूगर एक वाटी
साखर अर्धी वाटी
पाणी अर्धी वाटी
खाण्याचे रंग.

कॄती: काजूगरांची पावडर करावी. साखर बुडेल इतके (साधारण अर्ध्या वाटीला थोडे कमी) पाणी घालून पाक करण्यास ठेवावा.साखर विरघळून बुडबुडे दिसू लागले की त्यात काजू पावडर मिसळावी. गुठळी होऊ देऊ नये. तीन-चार मिनिटे शिजू द्यावे. थोडे घट्ट होत आल्यावर मिश्रण खाली उतरून घोटावे.. गोळा तयार झाल्यावर आवडीनुसार खाण्याचे रंग मिसळावे. फुले करायला घेताना आधी छोटी गोळी करावी. त्याला लांबट गोल आकार द्यावा. त्याचा खालचा भाग तसाच ठेवून वरचा भाग चपटा करावा. मधला भाग कळीसारखा दिसेल असा गुंडाळावा. पुढे कडबोळ्यासारखे गुंडाळावे. एका वाटीत २५ फुले होतात.

ही फुले कोणाच्या वाढदिवसाला देता येतील किंवा दिवाळी / भाऊबिजेला भेट देता येतील.


दिवाळी अंक २०१३

प्रतिक्रिया

पियुशा's picture

1 Nov 2013 - 2:07 pm | पियुशा

व्वा सुरेख ! काय काय कला असत्तात बुवा लोकांच्या हातात :)

कुसुमावती's picture

1 Nov 2013 - 3:24 pm | कुसुमावती

काय मस्त दिसताहेत काजूची फुल.

प्यारे१'s picture

1 Nov 2013 - 3:50 pm | प्यारे१

क्यूट.... स्वीट... भारीच्च.

अगदी मलाही जमू शकेल असं वाटतं :-)
फक्त ही कलाकृती करून झाल्यावर फार काळ दृश्य राहील असं वाटत नाही, लगेचच फडशा पडणार सगळ्या फुलांचा!

प्रचेतस's picture

1 Nov 2013 - 4:54 pm | प्रचेतस

काय देखणी कलाकृती झालीय.

इतका नाविन्यपूर्ण प्रकार आहे हा! मस्तच! चित्रफीत दिल्याने सोयीचे झाले आहे.

पैसा's picture

1 Nov 2013 - 9:34 pm | पैसा

वेगळीच आणि छान! सोपी दिसतायत आणि पटकन संपणारी!

अजया's picture

1 Nov 2013 - 10:27 pm | अजया

फारच सुंदर!

सानिकास्वप्निल's picture

2 Nov 2013 - 4:00 pm | सानिकास्वप्निल

मस्तचं दिसत आहे , रंगही सुंदर आहे
+१

दिपक.कुवेत's picture

2 Nov 2013 - 5:14 pm | दिपक.कुवेत

पटकन उचलुन खावीशी वाटतायेत.

कवितानागेश's picture

3 Nov 2013 - 1:26 am | कवितानागेश

फार सुन्दर दिसतायत...

सुहास झेले's picture

3 Nov 2013 - 8:05 am | सुहास झेले

मस्तच... एकदम हटके :)

यशोधरा's picture

3 Nov 2013 - 8:10 am | यशोधरा

वा! मस्त!

मुक्त विहारि's picture

3 Nov 2013 - 8:24 am | मुक्त विहारि

झक्कास

इन्दुसुता's picture

5 Nov 2013 - 9:29 pm | इन्दुसुता

उत्कृष्ट.
अतिशय आवडली.

स्पंदना's picture

6 Nov 2013 - 3:16 am | स्पंदना

कित्ती सुरेख कल्पना आहे कोणताही पदार्थ या फुलांनी सजवून अगदी कमर्शीयल लेव्हलचा वाटेल.
करायलाही सोपी वाटताहेत. रंग सुद्धा सुरेखच!

किती दिवस टिकतात म्हणे?

अनन्न्या's picture

7 Nov 2013 - 7:08 pm | अनन्न्या

काजू कतली प्रमाणे ५-६ दिवस टिकतात, शिल्लक राहिली तर!

पद्मश्री चित्रे's picture

8 Nov 2013 - 3:13 pm | पद्मश्री चित्रे

किती छान आणि गोड आहेत फ़ुलं !

मधुरा देशपांडे's picture

8 Nov 2013 - 5:03 pm | मधुरा देशपांडे

खूपच सुरेख

त्रिवेणी's picture

9 Nov 2013 - 5:30 pm | त्रिवेणी

अशक्य सुंदर दिसतायत फुले.

अनन्न्या's picture

9 Nov 2013 - 6:28 pm | अनन्न्या

करा, खा आणि खिलवा!

विशाखा राऊत's picture

8 Dec 2013 - 9:03 pm | विशाखा राऊत

एकदम मस्त

मस्तच...नविन व सोपा प्रकार.

ह्या दिवाळीला करुन पहायला हरकर नाही. :)

अत्रुप्त आत्मा's picture

22 Oct 2014 - 4:36 pm | अत्रुप्त आत्मा

वाह्ह! ये तो येक नंबर दिखरैला हे। :)