मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काजूची फुले

अनन्न्या · · दिवाळी अंक
साहित्यः काजूगर एक वाटी साखर अर्धी वाटी पाणी अर्धी वाटी खाण्याचे रंग. कॄती: काजूगरांची पावडर करावी. साखर बुडेल इतके (साधारण अर्ध्या वाटीला थोडे कमी) पाणी घालून पाक करण्यास ठेवावा.साखर विरघळून बुडबुडे दिसू लागले की त्यात काजू पावडर मिसळावी. गुठळी होऊ देऊ नये. तीन-चार मिनिटे शिजू द्यावे. थोडे घट्ट होत आल्यावर मिश्रण खाली उतरून घोटावे.. गोळा तयार झाल्यावर आवडीनुसार खाण्याचे रंग मिसळावे. फुले करायला घेताना आधी छोटी गोळी करावी. त्याला लांबट गोल आकार द्यावा. त्याचा खालचा भाग तसाच ठेवून वरचा भाग चपटा करावा. मधला भाग कळीसारखा दिसेल असा गुंडाळावा. पुढे कडबोळ्यासारखे गुंडाळावे. एका वाटीत २५ फुले होतात. ही फुले कोणाच्या वाढदिवसाला देता येतील किंवा दिवाळी / भाऊबिजेला भेट देता येतील.
दिवाळी अंक वर्ष

वाचने 12763 वाचनखूण प्रतिक्रिया 25

कुसुमावती 01/11/2013 - 15:24
काय मस्त दिसताहेत काजूची फुल.
अगदी मलाही जमू शकेल असं वाटतं :-) फक्त ही कलाकृती करून झाल्यावर फार काळ दृश्य राहील असं वाटत नाही, लगेचच फडशा पडणार सगळ्या फुलांचा!

पैसा 01/11/2013 - 21:34
वेगळीच आणि छान! सोपी दिसतायत आणि पटकन संपणारी!

सानिकास्वप्निल 02/11/2013 - 16:00
मस्तचं दिसत आहे , रंगही सुंदर आहे +१

स्पंदना 06/11/2013 - 03:16
कित्ती सुरेख कल्पना आहे कोणताही पदार्थ या फुलांनी सजवून अगदी कमर्शीयल लेव्हलचा वाटेल. करायलाही सोपी वाटताहेत. रंग सुद्धा सुरेखच!

पद्मश्री चित्रे 08/11/2013 - 15:13
किती छान आणि गोड आहेत फ़ुलं !