साहित्यः
काजूगर एक वाटी
साखर अर्धी वाटी
पाणी अर्धी वाटी
खाण्याचे रंग.
कॄती: काजूगरांची पावडर करावी. साखर बुडेल इतके (साधारण अर्ध्या वाटीला थोडे कमी) पाणी घालून पाक करण्यास ठेवावा.साखर विरघळून बुडबुडे दिसू लागले की त्यात काजू पावडर मिसळावी. गुठळी होऊ देऊ नये. तीन-चार मिनिटे शिजू द्यावे. थोडे घट्ट होत आल्यावर मिश्रण खाली उतरून घोटावे.. गोळा तयार झाल्यावर आवडीनुसार खाण्याचे रंग मिसळावे. फुले करायला घेताना आधी छोटी गोळी करावी. त्याला लांबट गोल आकार द्यावा. त्याचा खालचा भाग तसाच ठेवून वरचा भाग चपटा करावा. मधला भाग कळीसारखा दिसेल असा गुंडाळावा. पुढे कडबोळ्यासारखे गुंडाळावे. एका वाटीत २५ फुले होतात.
ही फुले कोणाच्या वाढदिवसाला देता येतील किंवा दिवाळी / भाऊबिजेला भेट देता येतील.






दिवाळी अंक वर्ष
वाचने
12766
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वा सुरेख ! काय काय कला
अप्रतिम
क्यूट.... स्वीट... भारीच्च.
कसली सोपी आणि सुंदर कलाकृती आहे!
व्वा.....!!!!!!!!!
इतका नाविन्यपूर्ण प्रकार आहे
मस्त!
फारच सुंदर!
सुंदर फुले
खुपच क्युट
फार सुन्दर दिसतायत...
मस्तच... एकदम हटके
वा! मस्त!
मस्त
उत्कृष्ट. अतिशय आवडली.
कित्ती सुरेख कल्पना आहे
किती दिवस टिकतात म्हणे?
ते खाणाय्रांवर अवलंबून!
वा
अप्रतिम
अशक्य सुंदर दिसतायत फुले.
सर्वांचे आभार!
काय मस्त आहेत
मस्तच...नविन व सोपा प्रकार.
वाह्ह! ये तो येक नंबर