चंपाकळी

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in दिवाळी अंक
26 Oct 2013 - 10:16 am

.

साहित्यः
१ वाटी मैदा
१/४ वाटी तेल
१ टीस्पून कलौंजी
१ टीस्पून कुटलेली काळीमिरी
मीठ चवीप्रमाणे

.

पाकृ:

मैद्यात कलौंजी, काळीमिरी व मीठ घालून एकत्र करावे.गरम तेलाचे मोहन घालून, पीठ घट्ट भिजवावे.भिजवलेले पीठ तासभर झाकून ठेवावे.
मैदा चांगला मळून घ्यावा व त्याचे छोटे-छोटे गोळे तयार करुन घ्यावे.गोळ्याची पातळ पुरी लाटावी व त्यावर कातण्याने किंवा सुरीने कडेला न लावता चिर्‍या पाडाव्यात.अलगद पुरी दोन्ही बाजूंची टोके धरून गंडाळून घ्यावी व हलकी पिळून घ्यावी.
कढईत तेल गरम करायला ठेवावे.तेलात हलके सोडून तांबूस रंगावर तळावी.पूर्ण गार झाल्यावर हवाबंद डब्यात भरुन ठेवावे.

champa1

champa2

चंपाकळी गोडाचीही बनवतात. मैद्यात काही न घालता फक्त मोहन घालून घट्ट भिजवून घ्यावा. चंपाकळी तळताना तुपात तळावी व दोनतारी पाकात बुडवून काढावी.

दिवाळी अंक २०१३

प्रतिक्रिया

भारिये हा प्रकार अन करायलाही सोपा वाटतो आहे करुन बघेन :)

परिंदा's picture

1 Nov 2013 - 2:49 pm | परिंदा

आम्हीही हा प्रकार करतो. करंज्या केल्यावर मळलेला मैदा उरला की त्याचा असा सदुपयोग करता येतो.

प्यारे१'s picture

1 Nov 2013 - 3:14 pm | प्यारे१

कुडुम कुडुम... मॉस्तॉच्च!

कुसुमावती's picture

1 Nov 2013 - 4:40 pm | कुसुमावती

चंपाकळी सुंदर झालिय. सानिकाताई, चंपाकळी पिठीसाखरेत घोळवतात का हो गोड व्हावी म्हणून?

अनन्न्या's picture

1 Nov 2013 - 5:07 pm | अनन्न्या

ही गोड पाहिलीय रूचिरात!

हा प्रकार पहिल्यांदाच पाहतिये. वेगळा आणि छान आहे.

शिद's picture

2 Nov 2013 - 1:45 am | शिद

हेच लिहायला आलो होतो...छान दिसतोय पण प्रकार…सांगायला हवे घरी बनवण्यासाठी.

सानिकास्वप्निल's picture

1 Nov 2013 - 10:43 pm | सानिकास्वप्निल

कृतीच फोटो आलाच नाहिये :(

@ अनन्या हो चंपाकळी गोडाची ही बनवतात, मैद्यात फकत मोहन घालून घट्ट भिजवून घ्यावा. चंपाकळी तळताना तूपात तळावी व दोन तारी पाकात बुडवून काढावी.

मुक्त विहारि's picture

2 Nov 2013 - 8:04 am | मुक्त विहारि

फोटो बघीतलाच नाही.

मी तुमच्या पा.क्रु. वाचत नाही.

त्यामुळे जळजळ कमी होते.

प्रभाकर पेठकर's picture

2 Nov 2013 - 1:05 pm | प्रभाकर पेठकर

बिनगोडाचीच बरी.
'चंपाकळी' तोंडाला लागणे म्हणजे जरा रोमँटिकच म्हंटले पाहिजे.

दिपक.कुवेत's picture

3 Nov 2013 - 12:02 pm | दिपक.कुवेत

हिचं गोड व्हर्जन खाल्लायं आता तिखट बनवुन पहायला हरकत नाहि.

स्पंदना's picture

11 Nov 2013 - 6:54 am | स्पंदना

मस्तच!!

एस's picture

12 Nov 2013 - 11:56 pm | एस

अवांतर - ते चमचे आणि भांडीबिंडी लयच सुंदर हायत. स्वयंपाक आणि छायाचित्रण हे सेमच असतं. फक्त स्वयंपाक करणार्‍याला तुम्ही कोणती भांडी वापरली हा प्रश्न कोणी विचारत नाहीत. ;)