साहित्यः
१ वाटी मैदा
१/४ वाटी तेल
१ टीस्पून कलौंजी
१ टीस्पून कुटलेली काळीमिरी
मीठ चवीप्रमाणे
पाकृ:
मैद्यात कलौंजी, काळीमिरी व मीठ घालून एकत्र करावे.गरम तेलाचे मोहन घालून, पीठ घट्ट भिजवावे.भिजवलेले पीठ तासभर झाकून ठेवावे.
मैदा चांगला मळून घ्यावा व त्याचे छोटे-छोटे गोळे तयार करुन घ्यावे.गोळ्याची पातळ पुरी लाटावी व त्यावर कातण्याने किंवा सुरीने कडेला न लावता चिर्या पाडाव्यात.अलगद पुरी दोन्ही बाजूंची टोके धरून गंडाळून घ्यावी व हलकी पिळून घ्यावी.
कढईत तेल गरम करायला ठेवावे.तेलात हलके सोडून तांबूस रंगावर तळावी.पूर्ण गार झाल्यावर हवाबंद डब्यात भरुन ठेवावे.
चंपाकळी गोडाचीही बनवतात. मैद्यात काही न घालता फक्त मोहन घालून घट्ट भिजवून घ्यावा. चंपाकळी तळताना तुपात तळावी व दोनतारी पाकात बुडवून काढावी.
अवांतर - ते चमचे आणि भांडीबिंडी लयच सुंदर हायत. स्वयंपाक आणि छायाचित्रण हे सेमच असतं. फक्त स्वयंपाक करणार्याला तुम्ही कोणती भांडी वापरली हा प्रश्न कोणी विचारत नाहीत. ;)
भारिये हा प्रकार अन करायलाही
आम्हीही हा प्रकार करतो.
कुडुम कुडुम... मॉस्तॉच्च!
मस्त
छान दिसतेय!
हा प्रकार पहिल्यांदाच पाहतिये
In reply to हा प्रकार पहिल्यांदाच पाहतिये by रेवती
+१
कृतीच फोटो
मी....
बिनगोडाचीच बरी.
छान दिसतेय....
मस्तच!!
लयच्च भारी