शब्दात गुंफले तुला
मनातच नेहमी झूलवले तुला
खाष्ट या जगापासून
मनातच लपवले तुला
इवल्याश्या तुझया कल्पनेने
स्वप्नवादी बनवले मला
वैराण या जिण्याकडे
दुर्लक्ष करणे शिकवले मला
स्वप्नातल्या तुझया सुमधुर स्वराने
गाणे शिकवले मला
गाण्याच्या प्रत्येक रागाबरोबर
आयुष्याचे लेणे भेटले मला
कशी म्हणू मी तुला
माझी कल्पना
कारण तुझया विचरानेच
घडवले आज मला
प्रतिक्रिया
24 Oct 2013 - 5:36 pm | राजु भारतीय
बरी आहे. आनखी प्रयत्न करा, एक दिवस चांगली होइल कविता.