आजकाल असे आहे...
खेळाडू "अभिनय" करत आहेत *(मँच फिक्सिंग)
खेळाडू अभिनय करत आहेत *(बॉलीवूड मध्ये प्रवेश करून, जाहिरातीत)
आजकाल हे असे आहे...
अभिनेते राजकारणात शिरत आहेत
अभिनेते "राजकारण" करत आहेत
आजकाल हे असे आहे...
राजकारणी जनतेच्या सेवेचा "अभिनय" करत आहेत
राजकारणी सत्तेच्या रणांगणावरचे "खेळाडू" बनत आहेत
आजकाल हे असे आहे...
बातम्या मनोरंजनाचा वारसा चालवत आहेत
मनोरंजन रक्तरंजीत अपराधी झाले आहे * (गुन्हेगारी सिरियल्स)
आजकाल हे असे आहे...
माणुसकी सैतानाच्या तावडीत सापडली आहे!
माणुसकी माणसांच्या शोधात भटकते आहे!
आजकाल हे असे आहे...
गरीबी श्रीमंती यातला पूल जीर्ण झाला आहे
गरीबी श्रीमंती यातली दरी खोल झाली आहे
आजकाल हे असे आहे...
दहशत हाच सुसंवाद झाला आहे
संवाद विसंवादाच्या गर्तेत हरवला आहे
आजकाल हे सगळे असे आहे...कारण
पैशाने सत्ता मिळवली आहे.
आणि सत्तेने पैसा गिळला आहे.
सुख पैशाला चिकटले आहे
आणि पैसा सुखाला चटावला आहे.
हे सगळे घडत आहे..
आणि आपल्या हातात काय आहे?
आपल्या हातात डोक्यातले जागृतीचे विचार आहेत!
आपल्या हातात डोळ्यातला सकारात्मक दृष्टीकोन आहे!
आणि त्याद्वारे जागा भुललेल्या सर्वांना
आपापली "जागा" दाखवायचा निर्धार आहे!
तर हे सगळे असे आहे!....
पण काय ते आपल्याला बदलायचे आहे!?
प्रतिक्रिया
23 Oct 2013 - 1:24 pm | विजुभाऊ
आजकाल हे असे आहे
कवी गद्य लिहीत आहे. ( जशी ही कविता)
गद्य काव्य बनत आहे( प्रतिसाद)
गंभीर इनोदी वाटतय( मोकलाया दाही दिश्य.)
इनोदी वाचून रडावेसे वाटते. ( अनासपुरेचे इनोद)
आजकाल हे असे होत आहे
23 Oct 2013 - 6:06 pm | निमिष सोनार
विजुभाऊ शी पुर्णपणे सहमत !