का उदास, आज वाटे मला
श्वास श्वासात, जीव हा कोंदला ll १ ll
हृद्य आठवांचा, काय हा उमाळा
नेत्रातूनी अश्रूंचा, हाय तोल गेला ll २ ll
विराण स्मृती, करिती मनी गलबला
का दिशा नित्य, गवसेना पाखराला ll ३ ll
जुनाच गुंता, न सोडवी मनाला
मिळे संकेत, असा नव्या वादळाला ll ४ ll
अडकलो पुन्हा, जुन्या कड्या कपारीला
बुजेना चिरा, जो जो मी सांधला ll ५ ll
मागतो आधार, फिरुनी त्या अंबराला
मज दाखवी, नव्याने निरभ्र चांदण्याला ll ६ ll
- सार्थबोध