गृहिणी
गृहिणी गृहिणी दार उघड
थांब माझ्या बाळाला अंघोळ घालू दे.
गृहिणी गृहिणी दार उघड
थांब माझ्याबाळालातीट लावू दे.
गृहिणी गृहिणी दार उघड
थांब माझ्या बाळ झोपवू दे.
चिमणे चिमणे दार उघडची आठवण आली ना? काय? माझे चुकले असे वाटते का? बघा त्रयस्थ नजरेने. आले ना लक्षात? क्षणात कसे बरे ती `गृहिणी तुमच्यासाठी दार उघडेल!
कामात असे ना ती? अगदी चोवीस तास! हो नशीब तिचे की तिच्यासाठी, तिच्या विश्रांतीसाठी नियतीने केलेली सोय म्हणू या हवे तर, की रात्र होते.
घरातल्या लोकांच्या काळजीपोटी ही बिचारी झोपते न झोपते, तिचा डोळा लागतो ना लागतो, तोच फटफटीत सकाळ उजाडते.
तिने कितीही ठरवले तरी मॉर्निंग वॉक काही तिच्या नशिबी नसतो. सकाळचा दोन-चार वेळा होणारा चहा, नाष्टा, सकाळ चा `टिफिन, रोजची कटकटच ती. काय करू? काय करू? नी काय करू?
दुपारच्या जेवणाची व्यवस्था भांडी, धुणी, खरकटी `रांधा, वाढा, उष्टी काढा हेच तिच्या नशिबी असते की काय? अंघोळ, देवपूजा, पेपरवाचन, टीव्ही की झाली संध्या, रहाटगाडगे चालूच. नाष्टा, चहा, पुन्हा ऑफिसमधून येणाण्यांची वेळ व तिची भाजी आणायची वेळ एकच. पुरती त्या संसाराच्या चाकात अडकून जाते. जीव मेटाकुटीला येतो. वाटते, सर्व साखळदंड क्षणात तोडून दूरवर धावत सुटावे. क्षितिजाला, आकाशाला गवसणी घालावी, उंच भरारी घ्यावी.
निसर्गाची, संध्याकाळ ची मजा लुटावी, सुर्यास्ताची छबी, घरी परतणारी पाखरे, गुरेढोरे, तो छानसा संधीप्रकाश अनुभवावा, पण छे! `भाजीत लक्ष असते ना? थोडया मैत्रिणींशी गप्पाटप्पांची देवाणघेवाण होते. त्यातही गप्पांचे विषय काही साहित्यिक, मजेशीर, काव्यात्म, असे नसतातच आज काय मेनू? हे कसे बनवतात? आज काय कामवालीच आली नाही? कामवालीने ते काम नीट केले नाही? आज काय भांडीच जास्त होती, मशीनच लावायचे राहून गेले? आज काय पाणीच आले नाही, इत्यादी. एव्हांना संध्याकाळ संपलेली असते. आवडत्या टीव्ही मालिका बघत बघत रात्रीचा स्वयंपाक, उद्याची प्राथमिक तयारी, पुन्हा तीच तीच आवराआवर, की झाली रात्र! काम काम आणि काम; कामाच्या रगाडयातूनच स्त्री-जन्मा केव्हा रे बाबा तुझी सुटका होणार? देव जाणे!
नोकरी करणाण्या स्त्रीची तारेवरची कसरत तर विचारूच नका, पण तिला `स्वऽची जाणीव असते. ती `कमवती म्हणून तिची जागा जरा वरच्या पोस्टवर असते. गृहिणी काय? काय काम असते, घरीच तर असते? केले सर्वांसाठी तर काय बिघडले? गृहिणीला योग्य मान मिळत नाही. विचार करा. घरातली `गृहिणी ही तुमचीच कोणीतरी असते. बायको, आई, बहीण, आजी, मावशी, तिलाही काही स्थान आहे. ती कायमची संपावर गेली तर काय होईल? विचार करा. तुमचे हाल होऊ नये, म्हणून ती वेळेवर सर्व करते. प्रत्येकाचे मन सांभाळते, आरोग्य सांभाळते , प्रत्येकाच्या आवडीचे करून खाऊ घालते, योग्य संस्कार, चांगल्या, वाइटाची जाण, आल्यागेल्याचे स्वागत, त्यांच्यासाठी काहीतरी, मग विचार करा, `ती जर इतके करते तर तिला आपण कामात मदत केली पाहिजे. तिला योग्य `मान व योग्य `मानधनही पाहिजे. ते तिचे स्वतःच्या हक्काचे असेल. त्यातून ती आपली आवडनिवड करू शकेल. (काही लोक या गोष्टीसाठी सहमत होत नाहीत का ते माहीत नाही.)
तिचे मन सांभाऊले पाहिजे, व्यवहार, बाहेरचे जग, दुसरे देश, तिच्या मनाचा होणारा कोंडमारा, तिचे स्वास्थ्य जे सर्वांत महत्त्वाचे आहे. तिची शारीरिक ,. क्षमता ... का ती एखाद्या वेळी चिडचिड करते? तिचेही काही प्रॉब्लेम्स आहेत का? तिच्या भावनांची कदर खरेच घरातल्या सर्वांना आहे का? सर्वांनी मानसिकता का बदलू नये? ती न संपणारे, न थांबणारे यंत्र आहे का? ती तुमच्यासारखीच हाडामांसाची बनलेली आहे. तिला (गृहिणीला) नीट समजावून घ्या. तिला सर्व दृष्टीने आधार द्या. ती तुमच्यावर प्रेम करते, मदत करते. तुमच्यासाठी त्याग करते, काय नाही करत ती तुमच्यासाठी? तुम्हीही तिला प्रेम, माया द्या. कामाची वाटणी करा. मग बघा, प्रत्येक जीवन कसे निकोप होते ते. तिच्या आरोग्याची काळजी घ्या. मायेने, आस्थेने तिची विचारपूस करा. तिला सर्व दृष्टीने, आर्थिक, मानसिक, कायिक, वाचिक तिची आवड, छंद जोपासा, त्याचे कौतुक करा. तिला आधार वाटेल असे करा. तिचे आशीर्वाद तुम्हांला मोठे करतील यात शंका नाही. एक कविता सुचत आहे
`गृहिणी
सर्वांना ती घरी हवी हवी,
(सर्वांच्या) सेवेला ती तत्पर ऐन वेळी,
त्याग करिते `स्व जीवनाचा॥
`गृहिणी सर्वांत उच्च तुझे हे पद,
नकोस मानू ते तू दुय्यम स्थान,
तूच मोठा आधार या सदनाला
`गृहिणी तुझे आशीर्वाद लाभू दे सर्वांना।
लक्ष्मी तू या घरची,
वाचवते पै पै तू कष्ट करूनी,
नाही जाणार हे कष्ट वाया तुझे,
तुझेच ना ग हे लाडके घरटे?।
भक्कम आधार बनून रहा तू येथेच,
नको लेखू स्वतःला कमी।
सत्य काय ते तुलाच ठाऊक
घराचे मंदिर करण्यास तू सदैव आतुर॥
प्रतिक्रिया
7 Sep 2013 - 12:51 pm | दत्ता काळे
- सहमत.
7 Sep 2013 - 5:51 pm | मुक्त विहारि
त्रिकालाबाधित सत्य...
9 Sep 2013 - 11:32 pm | टक्कू
कसं बोललात!
7 Sep 2013 - 10:05 pm | kalpana joshi
धन्यवाद.
8 Sep 2013 - 12:37 am | अग्निकोल्हा
अतिशय सुंदर चित्र उभे केलेत एका सुखि परिवाराचे. उत्तम गृहिणी असणे हे एक मौल्यवान कौशल्य आहे त्याचा यथोचित गौरव हवाच!
8 Sep 2013 - 9:24 am | पैसा
सुरुवातीचा भाग आवडला.
8 Sep 2013 - 10:02 am | रुमानी
छान.
8 Sep 2013 - 11:33 am | kalpana joshi
धन्यवाद सर्वाना तुमच्या सुभेच्छा व आशिर्वाद पाठीशी आहेत ,वाचून खूप आनंद वाटला . माझे नवीन पुस्तक आहे . त्यातील हा
लेख आहे. समुपदेशक लेख ,कविता ,गोष्टी ,संस्कार इत्यादी त्यात आहे. मुले व पालक यांच्यासाठी लिहिण्याचा माझ्या परीने
प्रयत्न्न केला आहे.
8 Sep 2013 - 11:38 am | विटेकर
आअवडले
8 Sep 2013 - 6:18 pm | सुबोध खरे
जरा जास्तच कौतुक होत आहे असे वाटते
त्याग काय फक्त गृहिणी करते का? घर हे नवरा आणी बायको दोघांचे असते आजच्या जमान्यात नवरे बायकांना बर्यापैकी मदत करताना दिसतात उलट आज जर नवरा एकटा नोकरी करत असेल तर ती नोकरी टिकवण्यासाठी सकाळी आठ ते रात्रि आठ काम करताना दिसतात आणी त्यांच्या बायका बरीच सुख साधने असल्याने आयुष्य मजेत काढताना दिसतात.
काय पुरुषांना नोकरी करताना आपला मानसन्मान खुंटीला टांगावा लागत नाही? कि काम करताना जीव मेटाकुटीला येत नाही. असे शंभर टक्के नोकरी करणाऱ्या माणसाला(आणी स्त्रीला सुद्धा) वाटत नाही का झक मारली ती नोकरी? सोडून द्यावी.
आपली अर्थव्यवस्था खाली गेल्यापासून कित्येक घरात नवर्यांची जायची वेळ नक्की आहे पण यायची वेळ कितीही उशिराची आहे. पण त्यांना त्यातून पर्याय नाही.
माझी स्वतःची आई माझ्या दहावी पर्यंत घरी होती त्या काळात तिने आपले शिक्षण पूर्ण केले नंतर तिने नोकरी केली आणी मुख्याध्यापिका म्हणून शेवटी निवृत्त झाली. तिने कधीही असे म्हटले नाही कि माझे आयुष्य कष्टात गेले. उलट ती हेच सांगत आली मुले सांभाळून आपले करियर जरूर करा. स्वतःच्या मुलांसाठी आणी काम करण्यात कोणतेही कष्ट होत नाहीत. तिच्या सुदैवाने सासुरवास कधीच झाला नाही कि इतर "खस्ता" खाऊन जीव मेटाकुटीला आला आहे. त्यमुळे तिने माझ्या बायकोला किंवा वहिनीला हाच सल्ला दिला कि उगाच गृहिणी चे उदात्तीकरण करू नका.
माझ्या कित्येक मित्रांच्या बायका आरामात चार चार बायका लावून मजेत राहताना दिसत आहेत कारण नवरा मर मर करून भरपूर पैसा कमावत आहे. त्या जर आनंदात राहत असतील तर त्यात काही गैर नाही पण आमचे आयुष्य किती कष्टात जात आहे असा टाहो काहीजणी फोडताना दिसल्या कि मात्र राहवत नाही.
वरील परिस्थिती हि कमी घरात असेल पण नगण्य मात्र नक्कीच नाही.
9 Sep 2013 - 1:42 am | बॅटमॅन
मार्मिक अन नेमके!!!!
10 Sep 2013 - 12:50 am | संजय क्षीरसागर
पती म्हणजे केवळ स्पॉन्सरर असा भाव लेखात आहे. पण वस्तुस्थिती तशी नाही. दोघं मिळून कार्यविभागणी करून घर चालवतात.
ही हाईट आहे. बहुतेक घरात हल्ली पुरूषाला रात्र आणि दिवस सारखाच अशी परिस्थिती आहे!
जोशीबाईंनी १८५७ ची स्टोरी लिहीलीये.
10 Sep 2013 - 4:52 pm | अग्निकोल्हा
बहुतेक घरातिल पुरूष घड्याळ अस्तित्वात नाहि वगैरे वगैरे भ्रम पोसत नसतात हे आवर्जुन लक्षात घ्यावे. ह नम्र विनंती.
11 Sep 2013 - 3:07 pm | दादा कोंडके
खरंय. जोशीबै कै तरी कंटेपररी लिहा आता.
11 Sep 2013 - 3:10 pm | अनिरुद्ध प
+१ सहमत.
11 Sep 2013 - 3:18 pm | सामान्य वाचक
अगदी हेच लिहायला आले होते. गृहिणी असणे यात कमीपणा वाटण्यासारखे काही नाही तसेच फार अभिमान वाटण्यासारखे पण काही नाही.
पूर्वी पासून आपल्याला सवयच लागली आहे, गृहिणी, आई यांना महान ठरवायचे, उदात्तीकरण करायचे आणि बाबा , नवरा यांना अनुल्लेखाने मारायचे
प्रत्येक जण आपापल्या परीने कष्ट, त्याग करत च असतो.
कुणाचा Glorify होतो, तर कुणाचा unnoticed जातो.
11 Sep 2013 - 3:27 pm | दादा कोंडके
नै, नै. यात खरी गोची अशी आहे की. चूल-मूल सांभाळणं, नवर्याची सेवा करणं, सणवार सांभाळणं, नवर्यासाठी-भावासाठी उपास-तपास करणं, एकनिष्ठ रहाणं, नवर्यानं बाहेर शेण खाल्लं तर त्याला मोठ्या मनानं माफ करणं अश्या करवून घेण्यासाठी हे सगळं आहे हो.
11 Sep 2013 - 2:39 pm | सस्नेह
एक शंका...'गृहिणी' नावाची संस्था/संस्कृती आजही टिकून आहे ?
12 Sep 2013 - 6:20 am | स्पंदना
किती खर लिहील आहे.
बघ ना काल ना माझ्या यजमानांनी डिश वॉशरच नाही भरला. किती हाल होताहेत माझे..आता मी मिपावर टीपी कशी करणार?
आता जाव लागत त्याला नोकरीला...करावे लागतात प्रोजेक्ट पुर्ण...पाळाव्या लागतात डेड लाईन्स..पण म्हनुन काय डीश वॉशर लावायचा नाही?
त्याला मुल कधी हातात घेउन बसायला वेळ नाही मिळत, नुसत फोनवर आसुसुन ऐकत रहायचा आज काय केल ते...रोज रात्री जेवणाला वेळेवर पोहोचेलच ही खत्री नसायची...सण वार ...सगळे देवासमोर हात जोडले की होतात त्याचे...एव्हढ्या कष्टाने घेतलेले घर..आठव्ड्याचे पाच दिवस फक्त पाठ टेकायला..अन शनिवार रवीवार बायकोच्या बरोअबरीने स्वच्छ करायलाच घेतलय त्याने. किती किती सांगायच तरी.
12 Sep 2013 - 1:00 pm | निवेदिता-ताई
छानच