माझ्याच आसवांना मी रोखुनी पहावे
ह्रुदयात गुंफ़लेले ते गीत मी पुसावे
समजाविते मला मी, ते एक स्वप्न होते
काट्यात गुन्तलेले ते एक फ़ुल होते
माझ्यासमोरुनी तो मार्गस्थ सुर्य झाला
माझी दिशा तरिही तम होवुनीच उरली
फ़सवेच हे तरन्ग मी मानले जीवाचे
नजरेसमोर माझ्या,हे स्वप्न भग्न माझे
गुंतेल जीव असला मज वाटले ही नव्हते
खोटाच तो जिव्हाळा, ते बेगडीच नाते
का व्यर्थ दोष द्यावा, सारी अशीच नाती
ह्रुदयी विसावली ती , माझी कट्यार होती
उधळुनी स्वत्व आता, झाले रिती मनाने
तु वाट वेगळी ती ,बघ चालशी सुखाने
प्रतिक्रिया
30 Aug 2013 - 6:40 am | स्पंदना
काय म्हणु?
का व्यर्थ दोष द्यावा, सारी अशीच नाती
ह्रुदयी विसावली ती , माझी कट्यार होती
हे तर अफाट!
30 Aug 2013 - 11:12 am | मिसळलेला काव्यप्रेमी
फुलवातै साष्टांग __/\__!!
क्या बात, एक एक शेर जीवघेणा!! वरचा अगदीच खोल लागला.
30 Aug 2013 - 11:35 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडली रचना...!
30 Aug 2013 - 12:04 pm | निरन्जन वहालेकर
अतिशय सुन्दर गझल . आवडली.
5 Oct 2013 - 2:51 pm | राघव
मायो..
काय लिहिते ही.. बापरे.
राघव