रानपाखरं...

psajid's picture
psajid in जे न देखे रवी...
19 Aug 2013 - 11:57 am

बांधलं मचाण
वर गाण्यात गळा,
मधुरता मंधी
दुमला शेतमळा !!

येऊन चोर
जोंधळ्यात दडं,
शिवार टिपीत
चाललीत पुढं !!

भिरभिरली गोफण
सुटला दगड,
चोर जोंधळ्यात
त्येनं केलं उघड !!

का म्हून सतावता
सुखानं जगू द्याव,
किती सोसलं पिकासाठी
तुम्हा ते नाय ठावं !!

घरी तान्हं ठिवून
आलिया राखणीला,
सोनं ठिवलं तरच
वरीसभर पीठ भाकरीला !!
मला पीठ भाकरीला !!

श्री. साजीद यासीन पठाण

कविता

प्रतिक्रिया

वैभव कुलकर्नि's picture

19 Aug 2013 - 7:43 pm | वैभव कुलकर्नि

मस्त