१ प्रश्न विचारला गाजराला - तोंड तुझे जमिनीत तरी घेतोस कसा तू श्वास?.
उत्तर अगदी सरळ आहे जसा बाळाचा आईच्या नाळेतून प्रवास .
मग प्रश्न विचारला त्याच्याच पानाला - हाथावरती रेष्या एवढ्या तुझ्या,तुझ्या भविष्याचे काय रे?
पाऊस आला तर भिजायचं , वारा आला तर झुलायचं बाकी असं काहीच नाय रे.
१ प्रश्न नारळाला - पोटात एवढे पाणी तुझ्या , तुला जलोदर नाही का होत?
वेड्या.... पाण्यासाठीच जन्मलोय मी, फुगवून माझे पोट.
मग प्रश्न विचारला मी झाडाच्या तु-याला - तू इतका नाजूक दिसतोस रे पण काजळाची मला कमतरता जाणवते?
अरे मुद्दामच लावत नाही मी कारण काजळाने नेहमी डोळे पानावते.
मग मी प्रश्न विचारला थेंबाला - एवढ्या जोरात वरून पडतोस मार नाही का बसत काही?
मांजरासाराखेच माझे काहीसे - उभा राहतो मी दोन पायी.
आळुला १ प्रश्न - का तू जखडून ठेवतोस दवबिंदुला आपल्या या शरीरावरती?
अरे मला हि खाज सुटते रे - खाजवतो तो माझ्या कानाभोवती.
शेवटी प्रश्न रोपट्याचा दाण्याला - एवढास जीव तुझा,तू पेलावतोस कसे रोपटे?
तू प्रश्नच चुकीचा विचारलास - आपलाच भर आपल्याला नसतो रे
प्रतिक्रिया
19 Jul 2013 - 2:10 pm | नित्य नुतन
छान छान , किती इनोसन्स , अहाहा..
19 Jul 2013 - 3:37 pm | वैभव कुलकर्नि
आभरी आहे ;)
19 Jul 2013 - 2:40 pm | कवितानागेश
आपलाच भर आपल्याला नसतो रे>
सुंदर! :)
19 Jul 2013 - 4:06 pm | अत्रुप्त आत्मा
वा...वा...वा... मस्त!
एवढास जीव तुझा,तू पेलावतोस कसे रोपटे?
तू प्रश्नच चुकीचा विचारलास-आपलाच भर आपल्याला नसतो रे>>> टाळ्या!!!