Skip to main content

१ प्रश्न

लेखक वैभव कुलकर्नि यांनी शुक्रवार, 19/07/2013 या दिवशी प्रकाशित केले.
१ प्रश्न विचारला गाजराला - तोंड तुझे जमिनीत तरी घेतोस कसा तू श्वास?. उत्तर अगदी सरळ आहे जसा बाळाचा आईच्या नाळेतून प्रवास . मग प्रश्न विचारला त्याच्याच पानाला - हाथावरती रेष्या एवढ्या तुझ्या,तुझ्या भविष्याचे काय रे? पाऊस आला तर भिजायचं , वारा आला तर झुलायचं बाकी असं काहीच नाय रे. १ प्रश्न नारळाला - पोटात एवढे पाणी तुझ्या , तुला जलोदर नाही का होत? वेड्या.... पाण्यासाठीच जन्मलोय मी, फुगवून माझे पोट. मग प्रश्न विचारला मी झाडाच्या तु-याला - तू इतका नाजूक दिसतोस रे पण काजळाची मला कमतरता जाणवते? अरे मुद्दामच लावत नाही मी कारण काजळाने नेहमी डोळे पानावते. मग मी प्रश्न विचारला थेंबाला - एवढ्या जोरात वरून पडतोस मार नाही का बसत काही? मांजरासाराखेच माझे काहीसे - उभा राहतो मी दोन पायी. आळुला १ प्रश्न - का तू जखडून ठेवतोस दवबिंदुला आपल्या या शरीरावरती? अरे मला हि खाज सुटते रे - खाजवतो तो माझ्या कानाभोवती. शेवटी प्रश्न रोपट्याचा दाण्याला - एवढास जीव तुझा,तू पेलावतोस कसे रोपटे? तू प्रश्नच चुकीचा विचारलास - आपलाच भर आपल्याला नसतो रे
लेखनविषय:

वाचने 1303
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

वा...वा...वा... मस्त! एवढास जीव तुझा,तू पेलावतोस कसे रोपटे? तू प्रश्नच चुकीचा विचारलास-आपलाच भर आपल्याला नसतो रे>>> टाळ्या!!!