एका शीघ्र कवितेचे दिर्घ काळाने विडंबन !

Primary tabs

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
29 Oct 2007 - 4:06 am

सखे........!
जा,आज प्रेमाला रंग चढेना,
आपले काय बिनसले ?
कधी तरी 'मुक्या'ने हे बोलणारच होतो,
वेदनेला अश्रुत जाळणार होतो.
सखे ....!
तु एकदा ये काय!
या शहरातून त्या शहरात,
माणसाच्या विचारांच्या वणव्यात,
मराठी शब्दांच्या भावविश्वात.
त्या संस्थळावरुन या संस्थळावर,
'केशवसुमार' लिहितो !! उभ्या उभ्या !!
मिसळपाववर
भांडण आपले रंगेना !
वाचून
आली तशी निघून जा!

विडंबन

प्रतिक्रिया

प्राजु's picture

29 Oct 2007 - 4:56 am | प्राजु

किमान या विडंबनात 'पिण्याविषयी ' नाही काही... हे ही नसे थोडके..!

- प्राजु.

सहज's picture

29 Oct 2007 - 8:12 am | सहज

एरवी सोपा वाटणार्‍या एखाद्या विषयाचा पेपर, एकदम अवघड आला की एक अनपेक्षीत धक्का बसतो, तसे झाले. शीघ्र व दीर्घ दोन्ही शेजारी शेजारी ठेवून वाचल्या. काही खास आकलन नाही...काहीच शब्द वेगळे....पण...

(कृपया राग मानू नका, तसेही काव्यसमज कमीच) हे विडंबन कमी, चौर्य जास्त वाटले.

जाऊ दे हे काव्य, गजल प्रकार मला तसे अगम्यच... कोणी समजवले तर उत्तम..

विसोबा खेचर's picture

29 Oct 2007 - 8:48 am | विसोबा खेचर

त्या संस्थळावरुन या संस्थळावर,
'केशवसुमार' लिहितो !! उभ्या उभ्या !!
मिसळपाववर
भांडण आपले रंगेना !
वाचून
आली तशी निघून जा!

मस्त...!

केशवा, तुझी बॅटिंग अगदी जोरात सुरू दिसत्ये! चालू दे....:)

आपला,
(केशवसुमाराचा आडनावबंधु) तात्या.