दर्शन -- भक्तिगीत

कौस्तुभ's picture
कौस्तुभ in जे न देखे रवी...
10 Jul 2008 - 12:02 pm

पांडुरंग पांडुरंग दर्शन दे रे
कधीचे प्राण माझे नयनी उभे रे ॥धृ॥

नाण्यावरी ठसा जसा, दिवा मंदिरात
तसा तूच सामावला माझ्या अंतरात
वितळू दे काया, तुझ्या मुर्तीत घे रे ॥१॥
पांडुरंग पांडुरंग ...

ऐकीयले जनाघरी जाते तू ओढीले
नरहरी सोनाराचे दागिने करीले
देई हाक येथ पहा, लेकरु तुझे रे ॥२॥
पांडुरंग पांडुरंग ...

जन म्हणे विठोबाच्या नादी खुळावला
दृष्टाळला जन्म सारा, संसार नासला
उत्तराया तूच नाथा, प्रकटोनी ये रे ॥३॥
पांडुरंग पांडुरंग ...

भक्तिगीत --कौस्तुभ

कविताप्रतिभा