वाढणी:
३-४ जणांना
पाककृतीला लागणारा वेळ:
३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
अर्धा किलो भेंडी, ३ कांदे, १ मोठा टोमॅटो, २ हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा लसूण पेस्ट
१ चमचा गरम मसाला, १ चमचा धणे पूड, १ चमचा लिंबाचा रस, तिखट-मीठ
तळणासाठी तेल
क्रमवार मार्गदर्शन:
प्रथम भेंडी स्वच्छ धुवून व पुसून घ्या. पाव इंच लांबीचे तुकडे करून तेलात तळून घ्या.
कांदे, टोमॅटो, मिरची सर्व बारीक चिरून घ्या. थोड्या तेलात कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या.
त्यात लसूण, मिरची व टोमॅटो परतून घ्या. त्यात गरम मसाला व धणेपूड घाला. तेल सुटेपर्यंत
मसाला परता.नंतर त्यात तळलेली भेंडी, लिंबाचा रस व मीठ घाला. चांगले मिक्स करा व
गरमागरम वाढा.
माहितीचा स्रोत:
कुठेतरी वाचली होती.
अधिक टीपा:
ही भाजी दिसायला व चवीला छान असते. जीरा राईस, दाल फ्राय बरोबर मस्त बेत जमतो.
प्रतिक्रिया
9 Jul 2008 - 3:19 pm | गिरिजा
पण "स्मिता चावरे" का आहे शेवटी?
कोण ह्या?
--
गिरिजा..
लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग
-----------------------
10 Jul 2008 - 3:01 am | टारझन
अहो प्रियाली ताई ... ते पाककृतीचं नाव असावं
जसं गोळ्याची आमटी तात्या सरपंच,ऊकडलेलं रताळं चंपाकली वगैरे वगैरे...
खाली म्हटल्याप्रमाणे) मसालेदार वांगं कुबड्या खविस
http://picasaweb.google.com/prashants.space
10 Jul 2008 - 3:34 am | प्रियाली
प्रश्नकर्तीचे नाव प्रियाली नाही गिरिजा आहे.
स्मिता चावरे या मनोगताच्या सदस्या आहेत आणि त्यांनी मागे ही पाककृती टाकली होती हे मला माहित आहे. त्यामुळे मला वरील प्रश्न पडलेला नाही.
10 Jul 2008 - 3:42 am | टारझन
प्रश्नकर्तीचे नाव प्रियाली नाही गिरिजा आहे.
नावच्या चुकीबद्दल जाहीर माफी.
स्मिता चावरे या मनोगताच्या सदस्या आहेत आणि त्यांनी मागे ही पाककृती टाकली होती हे मला माहित आहे. त्यामुळे मला वरील प्रश्न पडलेला नाही.
आम्हाला तुम्हाला ऊद्देशायचेच नव्हते. असो... स्मिता चावरे या कुठल्याही सदस्य असो त्यांचा अवमान हा हेतू नव्हता ... टायटल च्या नावातला विनोद आम्ही कंटिन्यु केला इतकंच
http://picasaweb.google.com/prashants.space
9 Jul 2008 - 5:20 pm | प्रियाली
ओंकार या सदस्याकडून एकाच दिवसात मनोगतावरील लेखन मिपावर उतरवलेले दिसत आहे. ही बाब आताच लक्षात आल्याने संपादक या नात्याने या पुढे या व्यक्तीकडून मनोगतावरून उचललेले सर्व लेखन अप्रकाशित करण्यात येईल याची पूर्वकल्पना देत आहे.
यापूर्वी टाकलेल्या लेखांना सदस्यांनी प्रतिसाद दिल्याने त्याबाबत काय करावे याचा निर्णय जनरल डायरांनी घ्यावा.
धन्यवाद,
प्रियाली.
यापूर्वी टाकलेल्या लेखांना सदस्यांनी प्रतिसाद दिल्याने त्याबाबत काय करावे याचा निर्णय जनरल डायरांनी घ्यावा.
आम्ही या बाबतीतले सर्वाधिकार प्रियाली यांच्याकडेच देत आहोत. त्यांना काय तो निर्णय घ्यायची मुभा आहे!
-- जनलर डायर.
9 Jul 2008 - 7:10 pm | सुचेल तसं
ह्याचा अर्थ इतर संकेतस्थळांवर प्रकाशित केलेले लेख मिपावर प्रकाशित करु शकत नाही?
उपक्रम ला वरील नियम आहे हे माहित होतं पण मिपालापण हाच नियम लागू आहे का?
http://sucheltas.blogspot.com
9 Jul 2008 - 7:47 pm | टारझन
आयला कुठून काय आलयं याबाबद खाजवत बसण्यापेक्षा जे लिहून आलंय ते करा आणि खा...
पाकक्रुती कुठून ना कुठून आलेलीच असते.. मग एखाद्या संकेतस्थळावरून आली तर का आटापिटा?
हे माझे वैयक्तिक मत आहे ..वाद घालणे हा हेतु नव्हे.
जिभेचे चोच्ले हव्या त्या (चांगल्या) मार्गाने पुरवणारा ) कु. ख. ऊर्फ प्रशांत (दामले नव्हे)
http://picasaweb.google.com/prashants.space
9 Jul 2008 - 7:52 pm | प्रियाली
एखादे लेखन आपले स्वतःचे असेल आणि ते इतरत्र प्रकाशित झाल्यावर मिपावरही प्रकाशित करायचे असेल तर त्यासाठी कोणतीही हरकत नाही. आपल्या मित्र-मैत्रिणींचे लेखन त्यांच्या पूर्वपरवानगीने प्रकाशित करायचे असेल तरीही हरकत नाही परंतु इतरत्र कुठूनही दुसर्यांचे लेखन लेखक/लेखिकेच्या पूर्वपरवानगीशिवाय इथे चिकटवत जाणे अयोग्य ठरावे. मिपाने यासंबंधात यापूर्वीच असा निर्णय घेतलेला आहे.
9 Jul 2008 - 9:39 pm | सुचेल तसं
प्रियाली,
शंकानिरसनाबद्दल धन्यवाद.
http://sucheltas.blogspot.com
9 Jul 2008 - 9:39 pm | पिवळा डांबिस
या पाककृतीपेक्षा तिचं शीर्षकच (मराठीत "टायटल") जास्त आवडलं!!!
;)
10 Jul 2008 - 2:55 am | टारझन
(मराठीत "टायटल") =)) =))
पिडा काका तुमालाच एक टायटल (इंग्रजीत "बक्षिस") द्याया पायजे
मी पण एक पाककृती लिहीन म्हणतोय.... "ऊकडलेले अंडे"
मसालेदार वांगं कुबड्या खविस
http://picasaweb.google.com/prashants.space
10 Jul 2008 - 2:56 am | चतुरंग
इतका 'मसालेदारपणा' बरा नव्हे ह्या वयात. त्रास होईल हो तब्बेतीला! ;)
(स्वगत - डांबिसकाकूंना कळवायला हवं फार मसालेदार खातात म्हणून!)
चतुरंग
6 Aug 2008 - 5:54 pm | हायकायनायकाय
;) पाक्क्रुतीपेक्शाचर्चाजास्तझकासजमलीआह्र
6 Aug 2008 - 7:35 pm | विजुभाऊ
सदर सदस्याने यापूर्वी सुद्धा असेच लिखाण चिकटवले होते.
इतरांचे लिखाण इथे का चिकटवले जाते.
स्मिता चावरेना मिपा ने सदस्यत्व नाकारले आहे का?
संपादक मंडळाने कृपया लौकर दखल घ्यावी
ही विनन्ती
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
6 Aug 2008 - 7:37 pm | चतुरंग
वरती प्रियालीताईंची कॉमेंट आहे पहा.
चतुरंग
6 Aug 2008 - 7:41 pm | विजुभाऊ
वो क्के
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
7 Aug 2008 - 1:29 am | विष्णु
काराल चोरि तर खूटेल दोरि