पुस्तक खरेदी - मदत

चिगो's picture
चिगो in काथ्याकूट
17 Apr 2013 - 9:52 pm
गाभा: 

येत्या १९, २० आणि २१ तारखेला मी मुंबईत आहे. त्यावेळी काही मराठी पुस्तकांची खरेदी करण्याचा विचार आहे. मिपाकरांना कृपया मुंबईत जरा बर्यापैकी सवलत देणार्या पुस्तकांच्या दुकानांची माहिती द्यावी, ही विनंती.. तसेच काही चांगल्या मराठी पुस्तकांची नावेही सुचवावीत. फ्लिपकार्टवर हवी तशी मराठी पुस्तके मिळत नाहीत, असे मला वाटते.. :-( चारोळी धाग्यासाठी क्षमस्व..

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

17 Apr 2013 - 9:55 pm | यशोधरा

तुम्हांला कशा प्रकारची पुस्तके आवडतात हे लिहिलेत तर काही सुचवता येतील. काय वाचायला आवडते?

चिगो's picture

17 Apr 2013 - 10:06 pm | चिगो

कादंबर्या, ललित/ विनोदी लेखन, पुलंची पुस्तके, कथा.. अनुवादीत पुस्तकांत फारसा रस नाही.

यशोधरा's picture

17 Apr 2013 - 10:27 pm | यशोधरा

ललित - दुर्गा भागवत, रविंद्र पिंगे, पुल, सुनीताबाई, महेश एलकुंचवार
कथा/ कादंबर्‍या- व्यंकटेश माडगुळकर, दळवी
विनोदी - पुल

अजून जशी भर टाकता येईल तशी भर टाकेन.

तर्री's picture

17 Apr 2013 - 10:20 pm | तर्री

दादर , ठाणे आणि डोंबिवली मध्ये मॅजेस्टीक ची खरेदी दलाने आहेत. १० टक्के सवलत मिळेल.
पुस्तके विषय आवडीनुसार सुचवता येतील.

कवितानागेश's picture

17 Apr 2013 - 11:10 pm | कवितानागेश

मॅजेस्टिकचे मेम्बरशिपचे कार्ड घेतले तर १५% सवलतही मिळेल.
मिलिन्द बोकिलांची पुस्तके मिळ्तील तिथे. वाचली नसल्यास नक्की वाचा.

रसिकच्या मेंबरशिपवर २०% सूट आहे.

मी स्वतः खालील साइट्स वरून अनेक वेळा पुस्तके मागविली आहेत. उत्कृष्ठ सेवा व वाजवी किंमत.
http://www.bookganga.com/
http://www.sahyadribooks.org/index.aspx
http://www.mehtapublishinghouse.com/

श्रीरंग_जोशी's picture

17 Apr 2013 - 11:12 pm | श्रीरंग_जोशी

बुकगंगावरून मी देखील पुस्तक खरेदी केली आहे. त्याखेरीज खरेदी.मायबोली.कॉम चा अनुभव पण चांगला आहे.

सुबोध खरे's picture

17 Apr 2013 - 10:42 pm | सुबोध खरे
पैसा's picture

17 Apr 2013 - 11:04 pm | पैसा

दुकानात घेतली तर मराठी पुस्तके तशी महाग वाटतात रे! मॅजेस्टिक कडून घेणे उत्तम. हल्लीच मी त्यांच्या प्रदर्शनात १०% सवलतीने आणि काही खास जुन्या पुस्तकांवर ५०% सवलतीने पुस्तके विकत घेतलीत. मी मराठीचा राज जैन सुद्धा काही सवलतीने पुस्तक जत्रामधे पुस्तके देतो. चौकशी कर.

किलोच्या प्रमाणात पुस्तकविक्री झाली होती १-२ महिन्यापूर्वी .
पुन्हा तसेच प्रदर्शन सुरु झाले आहे असे ऐकून आहे .

प्रसाद गोडबोले's picture

18 Apr 2013 - 12:45 pm | प्रसाद गोडबोले

कन्फर्म करुन कळवता का जरा प्लीझ ?
आणि हा सुंदरा बाई हॉल कुठे आहे ?

कवितानागेश's picture

18 Apr 2013 - 12:48 pm | कवितानागेश

चर्चगेत स्टेशनजवळ. निर्मला निकेतनसमोर.

इन्कम टॅक्स ऑफिसच्या मागे...

चिगो's picture

17 Apr 2013 - 11:21 pm | चिगो

आतापर्यंत प्रतिसाद देणार्यांचे धन्यवाद..

दुकानात घेतली तर मराठ पुतके तशी महाग वाटतात रे!

मान्य आहे ताई.. पण आता मेघालयात दुसरा पर्याय नाही ना.. फ्लिपकार्टवरुन पुलंची काही पुस्तके, शाळा, शंकर पाटलांची पुस्तके घेतलीत काही. पण तिथेही 'जावे त्यांच्या देशा', अपुर्वाई' वगैरे नाही मिळाली. तसेही फ्लिपकार्ट मराठी पुस्तकांवर इंग्रजीसारखे डिस्काऊंट्स, स्पेशल आॅफर्स देत नाहीत..:-(

आशु जोग's picture

17 Apr 2013 - 11:49 pm | आशु जोग

काही पुस्तके सुचवेन
पण मिळणे अवघडच नव्हे अशक्य आहे

जय महाराष्ट्र - प्रकाश अकोलकर
प्रभात चित्रे - बापू वाटवे
पालावरचं जिणं - गिरीश प्रभुणे

--

बाकी

पुण्याची अपूर्वाई - डॉ. अवचट
जोगिया - ग दि माडगूळकर
शतदा प्रेम करावे - अरुण दाते
आमचा बाप अन आम्ही - डॉ जाधव

उपास's picture

17 Apr 2013 - 11:55 pm | उपास

किती पुस्तके घ्यायची त्यावर आहे पण पुस्तके एकदम प्रकाशकांकडून् घेतली तर बरीच स्वस्त पडतात.
शिवाजी पार्कात अशा सगळ्या मराठी प्रकाशकांचं प्रदर्शन होतं मागे (मनसे तर्फे, हो तेच ज्यात सचिनने बाबांच्या काही कविता वाचल्या होत्या..), अशी ठिकाणे उत्तम.
अन्यथा दुसरा मार्ग म्हणजे तुम्ही प्रकाशकांकडे जाणे. गिरगावात गेलात तर खटाववाडीत मौज, मेन रोड वर मॅजेस्टीक, भटवाडीत ढवळे (धार्मिक पुस्तकांसाठी) अशी बरीच ठिकाणे आहेत. दादरला आयडीयल आहेच एरवी.
कुठली पुस्तके हे फार वैयक्तिक झाले ते इतर जण सांगतिलच :)

मृत्युन्जय's picture

18 Apr 2013 - 12:03 pm | मृत्युन्जय

पुण्यात येणार असलात तर सांगा योग्य त्या दुकानात घेउन जाइनच. खालील दुकाने लक्षात ठेवा:

१. पाथफाइंडर - नीलायम सिनेमा जवळ, पर्वती पूलाच्या अलीकडे. १००० च्या वरती खरेदीवर २०% सूट मिळेल.
२. अक्षरधारा - बाजीराव रोड, अत्रे सभागृहासमोर, सिल्व्हर लीफसमोर, सणस प्लाझा, टिळक रोडवरुन सरळ आलात की पंडित ऑटो आणि जयश्री हॉटेलच्या अलीकडच्या सिग्नलवरुन डावीकडे वळावे. लगेच समोर दिसेलच. वर्गणीदार झाल्यास सर्व पुस्तकांवर (काही वेचक वगळता) २०% सवलत मिळेल.
३. मेहता बूक एजन्सी - बाजीराव रोड, अक्षरधाराच्या समोरच्या गल्लीतुन आत गेल्यावर उजवीकडे वळल्यानंतर. अन्यथा गिरिजा हॉटेलच्या समोरच्या गल्लीत शिरुन देखील लागेल (वन वे आहे). ५ वर्षांचे सभासदत्व घेतल्यास ३०% सवलत मिळेल मेहतांच्या पुस्तकांवर. मेहताला बरेच लोक शिव्या घालतात बेक्कार अनुवाद मराठीत आणल्याबद्दल. पण त्यांची बरीच पुस्तके चांगली आहेत. उदा.: माडगुळकरांची सगळी, द. मा. मिरसदारांची सगळी, व पु काळ्यांची सगळी, रणजित देसाईंची सगळी, शिवाजी सावंतांची काही (मृत्युंजय नुकतेच प्रकाशित केलेले), विश्वास पाटलांची बरीच, शांताराम, हॅरी पॉटर कलेक्शन मराठीत (१५% सवलत), शांता शेळक्यांची काही, किरण बेदींची काही, सिडने शेल्डनचे अनुवाद आणि इतरही काहीए उत्तम अनुवाद.
४. रसिक.- अप्पा बळवंत चौक. किती सवलत देतील माहित नाही. मी फारशी तिथे खरेदी करत नाही. वरची ३ दुकाने मला जास्त सोईची आहेत येण्याजाण्याच्या दृष्टीने. पण रसिक मध्येही उत्तम पुस्तके आणि सवलत मिळते.

आता कुठली पुस्तके घ्याल ते:

१. मिरासदारी - द मा मिरासदार (आणि इतर बरीच. सगळीच चांगली आहेत. नाटके सोडुन. ती मला विशेष आवडली नाहित - विनोदी.
२. वेध महामानवाचा - सामंत - शिवाजी महाराजांवर
३. दुर्योधन -काका विधाते - दुर्योधनावर
४. नाझी भास्मासुराचा उदयास्त - वि सा वालिम्बे - हिटलरच्या जीवनावरील कादंबरी -
५.१८५७ ते १९४७ - वि सा वालिम्बे -
६.श्रीमान योगी - शिवाजी सावंत - शिवाजी महाराजांच्या जीवनावरील कादंबरी -
७. मृत्युंजय - शिवाजी सावंत - कर्णाच्या जीवनावरील कादंबरी
८. युगंधर - शिवाजी सावंत - श्रीकृष्णाच्या जीवनावरील कादंबरी
९. छावा - शिवाजी सावंत - संभाजी महाराजांच्या जीवनावरील कादंबरी
१०.पानीपत - विश्वास पाटिल - मराठे अणि अहमदशाह अब्दाली यांच्यातिल युद्धाची कथा
११.माझी जन्मठेप - स्वातंत्र्यवीर सावरकरांची आत्मकथा
१२. व्यक्ति अणि वल्ली - पु ल देशपांडे - व्यक्तिचित्रण
१३.जावे त्यांच्या देशा - पु ल देशपांडे - प्रवासवर्णन
१४. अपूर्वाई - पु ल देशपांडे - प्रवासवर्णन
१५. पूर्वरंग - पु ल देशपांडे - प्रवासवर्णन
१६. पावनखिंड - रणजीत देसाई - बाजीप्रभु देशपांडे यांच्या जीवनावरील कादंबरी
१७. महानायक - विश्वास पाटिल - नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावरील कादंबरी
१८. संभाजी - विश्वास पाटिल - संभाजी महाराजांच्या जीवनावरील कादंबरी
१९. गनिमी कावा - नामदेवराव जाधव
२०. स्वामी - माधवराव पेशव्यांच्या जीवनावरील कादंबरी
२१. नर्मदे हर हर - जगन्नाथ कुंटे
२२. हिमालयातील महात्म्यांच्या सान्निध्यात - स्वामी राम
२३. मनश्री - सुमेध वडावाला
२४. हेडहंटर - सुमेध वडावाला
२५. सर्वोत्कृष्ट मराठी ऐतिहासिक कथा - संपादक: राम कोलारकर (मिळाले तर २ सेट घ्या. मी बरेच दिवस शोधतो आहे. मिळत नाही आहे. १० पुस्तके आहेत)
२६. वाघ सिंह माझे सखे सोबती - दामू धोत्रे

अजुन बरीच आहेत. पण आता टंकायचा कंटाळा आला आहे. तुमच्याकडे असलेल्या पुस्तकांची सूची मिळाली तर अजुन काही उपाय सुचवता येतील.

विजय_आंग्रे's picture

23 Apr 2013 - 1:14 pm | विजय_आंग्रे

६.श्रीमान योगी - शिवाजी सावंत - शिवाजी महाराजांच्या जीवनावरील कादंबरी -

<<
हा बहुतेक टायपो असावा.
श्रीमान योगी या कादंबरीचे लेखक शिवाजी सावंत नसुन "रणजीत देसाई" हे आहेत.

चिगो's picture

18 Apr 2013 - 12:11 pm | चिगो

धन्यवाद मृत्युंजया.. पुण्यास येणे जमणार नाही ह्यावेळी. ऎतिहासिक कादंबर्यांपैकी तुमच्या यादीतील काही वाचलीयत. 'मिरासदारी' पुर्वरंग आणि अपुर्वाई घेतलंय आताच..:-)

चिगो's picture

18 Apr 2013 - 12:11 pm | चिगो

धन्यवाद मृत्युंजया.. पुण्यास येणे जमणार नाही ह्यावेळी. ऎतिहासिक कादंबर्यांपैकी तुमच्या यादीतील काही वाचलीयत. 'मिरासदारी' पुर्वरंग आणि अपुर्वाई घेतलंय आताच..:-)

एम.जी.'s picture

18 Apr 2013 - 1:09 pm | एम.जी.

"क्लोरोफॉर्म" : डॉ. अरुण लिमये
उपलब्ध आहे का कुठे ?

उदय's picture

19 Apr 2013 - 9:04 pm | उदय

माझ्या माहितीप्रमाणे ते बर्‍याच वर्षांपासून दुर्मिळ झाले आहे. तुम्हाला PDF चालत असेल तर २-३ दिवसात मी तशी बनवून पाठवू शकेन.

पांथस्थ's picture

25 Apr 2013 - 10:47 am | पांथस्थ

इथे आहे उपलब्ध!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Apr 2013 - 8:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मूठमाती - भीमराव वाघचौरे
ढव आणि लख्ख उन - राजन गवस
जगी ऐसा बाप व्हावा- मुरहरी सोपान केळे
मुंबईचं वर्णन -गोविंद नारायण मडगांवरकर
फरिस्ता-नारायण धारप
आपण सारे अर्जून -व.पू.
यशवंतराव चव्हाण यांचं 'कृष्णाकाठ' मिळालं तर वाचायला विसरु नका.
बनगरवाडी वाचलंय का ?

बाकी कितीतरी सांगता येतील पण मिळाली पाहिजेत.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Apr 2013 - 8:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बनगरवाडी मिळालं नाही तर इथे निवांत पाहा. (डोकं कोरं असलं पाहिजे ही अट आहे)

-दिलीप बिरुटे

मस्त कलंदर's picture

19 Apr 2013 - 10:25 pm | मस्त कलंदर

वनवास-पंखा-झुंबर-शारदासंगीत--- प्रकाश नारायण संत
पाडस-- अनुवादित आहे, परंतु अत्युत्तम पुस्तक- राम पटवर्धन
अनुदिनी--दिलीप प्रभावळकर
चुडैल-- अभिराम भडकमकर-- वेगळाच कथासंग्रह आहे.
मी हिंदू झालो-- डॉ. रविन थत्ते
युगान्त--- इरावती कर्वे
गुलाम: स्पार्टाकस ते ओबामा---अच्युत गोडबोले
व्यासपर्व--दुर्गा भागवत
वीणा गवाणकरांची बरीचशी पुस्तके, डॉ आयडा स्कडर,लीट्झ माईटनर, एक होता कार्व्हर इ. इ.
शुभ्र काही जीवघेणे--अंबरीश मिश्र
अर्धी मुंबई--आनंद अवधाणे
झालंच तर मुंबई दिनांक, सिंहासन-- अरूण साधू

पाडसबद्दल दोन शब्द सांग ना मक!

मस्त कलंदर's picture

22 Apr 2013 - 3:56 am | मस्त कलंदर

जीव ओवाळून टाकावा असं पुस्तक. पहिली दोन पानं नुसतं वर्णन वाचून कंटाळायला झालं होतं, पण एकदा हाती घेतलं की खाली ठेववत नाही. त्यांची अन्नाची बेगमी करताना पाहून आपलं शाकाहारी मन पहिल्यांदा थोडं मळमळतं, नंतर त्या परिस्थितीशी एकरूप झालो की असं काही आहे असं जाणवतही नाही. बापलेकाच्या नात्याची एक छान गुंफण दाखवली आहे त्यात.
अनुवादाचा मापदंड म्हणून या पुस्तकाची चर्चा होते.

असो.. दोन शब्द लिही म्हणालीस, पण त्यामुळं एक दुखरी आठवण परत जागी झाली. मनोगतावरच्या अदितीनं या पुस्तकाचा उत्तम परिचय लिहून ठेवला आहे. ही दुष्ट माणसं स्वतः जातात आणि आपल्याला जीवाला चटका लागतो.
इथे वाच तो परिचयः http://www.pustakvishwa.com/content/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%B8-0

येत्या भारवारीत घेणार हे पुस्तक! तुझी नको ती आठ्वण जागी केल्याबद्दल क्षमस्व!
दुव्यावरील पुस्तक परिचय सुरेख झालाय.
धन्यवाद.

ऋषिकेश's picture

23 Apr 2013 - 12:13 pm | ऋषिकेश

+१ खपली निघाली :(
बाकी पाडस बद्दल काय लिहिणार! ते शब्दातीत आहे या भावनेशी सहमत!

कोमल's picture

23 Apr 2013 - 12:30 pm | कोमल

+१

प्रीत-मोहर's picture

23 Apr 2013 - 1:50 pm | प्रीत-मोहर

+१ मस्तच आहे हे पुस्तक

चिगो's picture

21 Apr 2013 - 7:31 pm | चिगो

सगळ्यांचे धन्यवाद.. प्रा.डाॅ., बनगरवाडी वाचले आणि संग्रहात आहे. सुंदराबाई हाॅलला जाऊन आलो. साने गुरुजी, दातारशास्त्री, नाथमाधव , गोपाळ गोडसे आणि गुरुनाथ नाईक आवडणार्यांची चंगळ आहे. पण मुख्य म्हणजे इंग्रजी कादंबर्या आणि पुस्तकांची आवड आणि पारख असणार्यांसाठी तर खजाना आहे, पन्नास आणि शंभर रुपयांत..

तुम्ही कोणती पुस्तके घेतलीत?

चिगो's picture

23 Apr 2013 - 4:35 pm | चिगो

एक शुन्य मी (पुलं), फटकेबाजी, मखलाशी (शिरीष कणेकर) सो कुल (ही फूटपाथवरची खरेदी.. ;-)) पुलंची पुर्वरंग आणि जावे त्यांच्या देशा, दमांची मिरासदारी, सुशिंच्या काही कादंबर्‍या (माझ्यासाठी मस्ट ;-)).. सुंदराबाई हॉलमधून वामन होवाळ आणि महादेव मोरेंची काही पुस्तके ( मला हे दोन्ही लेखक नवे आहेत. जरा चाळल्यावर बरी वाटली म्हणून घेतली.) शापित राजहंस (अनंत तिबिले), कालिकामुर्ती (दातारशास्त्री), Omerta (Mario Puzho), Unzipped (Anonymous) Havana.. बाकी मुंबईतही फार भटकायला न जमल्याने आणि विमानात जादा वजनखर्च द्यायचा मुड नसल्याने एवढीच.. :-)

यशोधरा's picture

23 Apr 2013 - 4:36 pm | यशोधरा

जोरात झाली खरेदी :)

वेल्लाभट's picture

22 Apr 2013 - 7:12 am | वेल्लाभट

असे प्रश्न खरडायच्या फळ्यावर विचारावेत असं म्हणणं आहे काही जणांचं. आणि असे प्रश्न पोस्ट मधे टाकल्यावर पोस्ट डिलीट करण्यात येतात.

लीमाउजेट
Mon, 08/04/2013 - 20:59

कृपया माहिती खरडफळ्यावर विचारा. किंवा जमीन किती आहे, झाडे लावण्यासाठी बजेट काय, पाणी किती आहे, याची नीट माहिती दिलीत तर सदस्य नक्की काहितरी सुचवू शकतील.
तुम्हाला केलेल्या लागवडीतून उत्पादनाची अपेक्षा आहे का हेदेखिल स्पष्ट करा.

Add comment

आता कुठे गेला हो तो नियम? का इथलीच काही मंडळी म्हणतात त्या प्रमाणे 'एका विशिष्ट ग्रूप मधल्या माणसांना इथे सगळे नियम माफ वगैरे असतात...?'

कवितानागेश's picture

22 Apr 2013 - 12:21 pm | कवितानागेश

तुमचा धागा विस्कळित होता. सुचवलेले बदल करुन तुम्हाला माहिती हवी असल्यास पुन्हा टाका.
नक्की कुठे, घराच्या बागेत्/कुंडीत/शेतजमिनीवर झाडे हवीत आहेत हे स्पष्ट करा. या तिन्हीसाठी वेगवेगळी झाडे असतात. झाडे लावणे अनि पुस्तके विकत घेणे यात पुष्कळ फरक आहे. नुसते आवडती पुस्तके सान्गा म्हटले तरी अनेक गंभीर आणि चांगले प्रतिसाद येतिल, कारन इथे अनेक पुस्तक्वेडे लोक आहेत. प
ण तुम्ही घेतलेल्या विषयाचे तसे नाही. तुम्ही नेमकी माहिती देउन नीट प्रश्न विचारलेत तर योग्य उत्तरे मिळतील आणि दन्गा होनार नाही. धागा जितका विस्कळित, तितका गुन्ता अधिक.
मी तुम्हाला योग्य तो सल्ला दिला होता. तो न मानता, तुम्हाला गैरसमजच करुन घ्यायचे असतील तर तुमची मर्जी.

वेल्लाभट's picture

22 Apr 2013 - 12:57 pm | वेल्लाभट

अच्छा! म्हणजे मी माहिती विचारत होतो आणि सदर महोदय केवळ मत विचारत आहेत असं आहे. गैरसमज नाही हो; ते करून घ्यायची हौस नाही आम्हास. आक्षेप इतकाच आहे की नियम सोयीस्कर पणे लावला जातो. माझा प्रश्न व्हेग होता मान्य. मी दिली असती की माहिती मग! दिला असता सगळा तपशील ! पण माझा धागा 'माहिती खरडफळ्यावर विचारावी' म्हणून उडवला जातो आणि इथे तो नियम लावला गेला नाही. हेच खटकलं. बाकी 'तुमचीच' मर्जी.

कवितानागेश's picture

22 Apr 2013 - 1:02 pm | कवितानागेश

मी दिली असती की माहिती मग! दिला असता सगळा तपशील !>
तेच मी सुचवले होते.

वेल्लाभट's picture

22 Apr 2013 - 2:00 pm | वेल्लाभट

जाउ दे. निष्फळ वाद करण्यात मला स्वारस्य नाही.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

23 Apr 2013 - 12:27 pm | विश्वनाथ मेहेंदळे

मग नका घालू. माऊ तैंनी सुचवलेले बदल करून काढा धागा.

सद्ध्या संपादकांना झोडपायची फॅशन आहे, तुम्हांला माहिती नै?

कापूसकोन्ड्या's picture

23 Apr 2013 - 3:04 pm | कापूसकोन्ड्या

अच्युत गोड्बोले - बोर्ड रूम, किमयागार

इरसाल's picture

23 Apr 2013 - 3:45 pm | इरसाल

Yugandhar
Swami
Agnipath
Bakhar Antakalachi
Burmuda Triangle
Bhandarbhog
Bhutacha Janma
Bramhavart
Chandramukhi
Congo
Garambicha Bapu
Hiroshima
Jarila
Zhunj
Lajja
Lakshyavedh
Natarang
Nostradamouschi Bhavishyavani
Radhey
Rarang Dhang
Sinhasan
Surya
Upara
Yayati
chhava
Uchalya
Mrutyunjay
Jhool
Narmade har har
Adhapaat
Bandhudwesh
Kalikamurti
Shalivahan Shak
Indrabhuvan Guha
pray (Savaj)
Vilasmandir
The seventh secret
Bloodline
The firm
Madhyasta

चिगो's picture

23 Apr 2013 - 4:43 pm | चिगो

अरे बाबा.. काय ही यादी !? असो. ययाति, छावा, स्वामी, गारंबीचा बापु, उचल्या, द सेव्हन्थ सिक्रेट वाचली आहेत. माफ कर, पण मृत्युंजय संग्रही आहे आणि तिच्या शब्दबंबाळतेमूळे आता सावंतांच्या इतर पुस्तकांवर खर्च करायला जीव कचरतो.. :-( 'शालिवाह्न शक' प्रदर्शनात होती, पण म्हटलं आधी एक वाचून बघू (पक्षी :कालिकामुर्ती), आवडल्यास बाकिची घेता येतील. 'द सेव्हन्थ सिक्रेट'ही वाचलंय.. यादीसाठी धन्यवाद, मित्रा..