✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पुस्तक खरेदी - मदत

च
चिगो यांनी
Wed, 04/17/2013 - 21:52  ·  लेख
लेख
येत्या १९, २० आणि २१ तारखेला मी मुंबईत आहे. त्यावेळी काही मराठी पुस्तकांची खरेदी करण्याचा विचार आहे. मिपाकरांना कृपया मुंबईत जरा बर्यापैकी सवलत देणार्या पुस्तकांच्या दुकानांची माहिती द्यावी, ही विनंती.. तसेच काही चांगल्या मराठी पुस्तकांची नावेही सुचवावीत. फ्लिपकार्टवर हवी तशी मराठी पुस्तके मिळत नाहीत, असे मला वाटते.. :-( चारोळी धाग्यासाठी क्षमस्व..
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14820 वाचन

💬 प्रतिसाद (47)

प्रतिक्रिया

तुम्हांला कशा प्रकारची

यशोधरा
Wed, 04/17/2013 - 21:55 नवीन
तुम्हांला कशा प्रकारची पुस्तके आवडतात हे लिहिलेत तर काही सुचवता येतील. काय वाचायला आवडते?
  • Log in or register to post comments

आवड

चिगो
Wed, 04/17/2013 - 22:06 नवीन
कादंबर्या, ललित/ विनोदी लेखन, पुलंची पुस्तके, कथा.. अनुवादीत पुस्तकांत फारसा रस नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

पटकन आठवणारे

यशोधरा
Wed, 04/17/2013 - 22:27 नवीन
ललित - दुर्गा भागवत, रविंद्र पिंगे, पुल, सुनीताबाई, महेश एलकुंचवार कथा/ कादंबर्‍या- व्यंकटेश माडगुळकर, दळवी विनोदी - पुल अजून जशी भर टाकता येईल तशी भर टाकेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

पुस्तक खरेदी.

तर्री
Wed, 04/17/2013 - 22:20 नवीन
दादर , ठाणे आणि डोंबिवली मध्ये मॅजेस्टीक ची खरेदी दलाने आहेत. १० टक्के सवलत मिळेल. पुस्तके विषय आवडीनुसार सुचवता येतील.
  • Log in or register to post comments

मॅजेस्टिकचे मेम्बरशिपचे कार्ड

कवितानागेश
Wed, 04/17/2013 - 23:10 नवीन
मॅजेस्टिकचे मेम्बरशिपचे कार्ड घेतले तर १५% सवलतही मिळेल. मिलिन्द बोकिलांची पुस्तके मिळ्तील तिथे. वाचली नसल्यास नक्की वाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्री

रसिकच्या मेंबरशिपवर २०% सूट

यशोधरा
गुरुवार, 04/18/2013 - 00:01 नवीन
रसिकच्या मेंबरशिपवर २०% सूट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्री

मी स्वतः खालील साइट्स वरून

gaikiakash
Wed, 04/17/2013 - 22:41 नवीन
मी स्वतः खालील साइट्स वरून अनेक वेळा पुस्तके मागविली आहेत. उत्कृष्ठ सेवा व वाजवी किंमत. http://www.bookganga.com/ http://www.sahyadribooks.org/index.aspx http://www.mehtapublishinghouse.com/
  • Log in or register to post comments

+१

श्रीरंग_जोशी
Wed, 04/17/2013 - 23:12 नवीन
बुकगंगावरून मी देखील पुस्तक खरेदी केली आहे. त्याखेरीज खरेदी.मायबोली.कॉम चा अनुभव पण चांगला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: gaikiakash

http://www.erasik.com/

सुबोध खरे
Wed, 04/17/2013 - 22:42 नवीन
http://www.erasik.com/
  • Log in or register to post comments

मराठी पुस्तके महाग

पैसा
Wed, 04/17/2013 - 23:04 नवीन
दुकानात घेतली तर मराठी पुस्तके तशी महाग वाटतात रे! मॅजेस्टिक कडून घेणे उत्तम. हल्लीच मी त्यांच्या प्रदर्शनात १०% सवलतीने आणि काही खास जुन्या पुस्तकांवर ५०% सवलतीने पुस्तके विकत घेतलीत. मी मराठीचा राज जैन सुद्धा काही सवलतीने पुस्तक जत्रामधे पुस्तके देतो. चौकशी कर.
  • Log in or register to post comments

सुंदरबाई हॉलला भेट देऊन बघा ,

अभि
Wed, 04/17/2013 - 23:20 नवीन
किलोच्या प्रमाणात पुस्तकविक्री झाली होती १-२ महिन्यापूर्वी . पुन्हा तसेच प्रदर्शन सुरु झाले आहे असे ऐकून आहे .
  • Log in or register to post comments

हायला

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 04/18/2013 - 12:45 नवीन
कन्फर्म करुन कळवता का जरा प्लीझ ? आणि हा सुंदरा बाई हॉल कुठे आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभि

चर्चगेत स्टेशनजवळ. निर्मला

कवितानागेश
गुरुवार, 04/18/2013 - 12:48 नवीन
चर्चगेत स्टेशनजवळ. निर्मला निकेतनसमोर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

इन्कम टॅक्स ऑफिसच्या मागे...

आदूबाळ
Sun, 04/21/2013 - 20:35 नवीन
इन्कम टॅक्स ऑफिसच्या मागे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

धन्यवाद..

चिगो
Wed, 04/17/2013 - 23:21 नवीन
आतापर्यंत प्रतिसाद देणार्यांचे धन्यवाद..
दुकानात घेतली तर मराठ पुतके तशी महाग वाटतात रे!
मान्य आहे ताई.. पण आता मेघालयात दुसरा पर्याय नाही ना.. फ्लिपकार्टवरुन पुलंची काही पुस्तके, शाळा, शंकर पाटलांची पुस्तके घेतलीत काही. पण तिथेही 'जावे त्यांच्या देशा', अपुर्वाई' वगैरे नाही मिळाली. तसेही फ्लिपकार्ट मराठी पुस्तकांवर इंग्रजीसारखे डिस्काऊंट्स, स्पेशल आॅफर्स देत नाहीत..:-(
  • Log in or register to post comments

काही पुस्तके सुचवेन

आशु जोग
Wed, 04/17/2013 - 23:49 नवीन
काही पुस्तके सुचवेन पण मिळणे अवघडच नव्हे अशक्य आहे जय महाराष्ट्र - प्रकाश अकोलकर प्रभात चित्रे - बापू वाटवे पालावरचं जिणं - गिरीश प्रभुणे -- बाकी पुण्याची अपूर्वाई - डॉ. अवचट जोगिया - ग दि माडगूळकर शतदा प्रेम करावे - अरुण दाते आमचा बाप अन आम्ही - डॉ जाधव
  • Log in or register to post comments

मराठी पुस्तक खरेदी..

उपास
Wed, 04/17/2013 - 23:55 नवीन
किती पुस्तके घ्यायची त्यावर आहे पण पुस्तके एकदम प्रकाशकांकडून् घेतली तर बरीच स्वस्त पडतात. शिवाजी पार्कात अशा सगळ्या मराठी प्रकाशकांचं प्रदर्शन होतं मागे (मनसे तर्फे, हो तेच ज्यात सचिनने बाबांच्या काही कविता वाचल्या होत्या..), अशी ठिकाणे उत्तम. अन्यथा दुसरा मार्ग म्हणजे तुम्ही प्रकाशकांकडे जाणे. गिरगावात गेलात तर खटाववाडीत मौज, मेन रोड वर मॅजेस्टीक, भटवाडीत ढवळे (धार्मिक पुस्तकांसाठी) अशी बरीच ठिकाणे आहेत. दादरला आयडीयल आहेच एरवी. कुठली पुस्तके हे फार वैयक्तिक झाले ते इतर जण सांगतिलच :)
  • Log in or register to post comments

पुण्यात येणार असलात तर सांगा

मृत्युन्जय
गुरुवार, 04/18/2013 - 12:03 नवीन
पुण्यात येणार असलात तर सांगा योग्य त्या दुकानात घेउन जाइनच. खालील दुकाने लक्षात ठेवा: १. पाथफाइंडर - नीलायम सिनेमा जवळ, पर्वती पूलाच्या अलीकडे. १००० च्या वरती खरेदीवर २०% सूट मिळेल. २. अक्षरधारा - बाजीराव रोड, अत्रे सभागृहासमोर, सिल्व्हर लीफसमोर, सणस प्लाझा, टिळक रोडवरुन सरळ आलात की पंडित ऑटो आणि जयश्री हॉटेलच्या अलीकडच्या सिग्नलवरुन डावीकडे वळावे. लगेच समोर दिसेलच. वर्गणीदार झाल्यास सर्व पुस्तकांवर (काही वेचक वगळता) २०% सवलत मिळेल. ३. मेहता बूक एजन्सी - बाजीराव रोड, अक्षरधाराच्या समोरच्या गल्लीतुन आत गेल्यावर उजवीकडे वळल्यानंतर. अन्यथा गिरिजा हॉटेलच्या समोरच्या गल्लीत शिरुन देखील लागेल (वन वे आहे). ५ वर्षांचे सभासदत्व घेतल्यास ३०% सवलत मिळेल मेहतांच्या पुस्तकांवर. मेहताला बरेच लोक शिव्या घालतात बेक्कार अनुवाद मराठीत आणल्याबद्दल. पण त्यांची बरीच पुस्तके चांगली आहेत. उदा.: माडगुळकरांची सगळी, द. मा. मिरसदारांची सगळी, व पु काळ्यांची सगळी, रणजित देसाईंची सगळी, शिवाजी सावंतांची काही (मृत्युंजय नुकतेच प्रकाशित केलेले), विश्वास पाटलांची बरीच, शांताराम, हॅरी पॉटर कलेक्शन मराठीत (१५% सवलत), शांता शेळक्यांची काही, किरण बेदींची काही, सिडने शेल्डनचे अनुवाद आणि इतरही काहीए उत्तम अनुवाद. ४. रसिक.- अप्पा बळवंत चौक. किती सवलत देतील माहित नाही. मी फारशी तिथे खरेदी करत नाही. वरची ३ दुकाने मला जास्त सोईची आहेत येण्याजाण्याच्या दृष्टीने. पण रसिक मध्येही उत्तम पुस्तके आणि सवलत मिळते. आता कुठली पुस्तके घ्याल ते: १. मिरासदारी - द मा मिरासदार (आणि इतर बरीच. सगळीच चांगली आहेत. नाटके सोडुन. ती मला विशेष आवडली नाहित - विनोदी. २. वेध महामानवाचा - सामंत - शिवाजी महाराजांवर ३. दुर्योधन -काका विधाते - दुर्योधनावर ४. नाझी भास्मासुराचा उदयास्त - वि सा वालिम्बे - हिटलरच्या जीवनावरील कादंबरी - ५.१८५७ ते १९४७ - वि सा वालिम्बे - ६.श्रीमान योगी - शिवाजी सावंत - शिवाजी महाराजांच्या जीवनावरील कादंबरी - ७. मृत्युंजय - शिवाजी सावंत - कर्णाच्या जीवनावरील कादंबरी ८. युगंधर - शिवाजी सावंत - श्रीकृष्णाच्या जीवनावरील कादंबरी ९. छावा - शिवाजी सावंत - संभाजी महाराजांच्या जीवनावरील कादंबरी १०.पानीपत - विश्वास पाटिल - मराठे अणि अहमदशाह अब्दाली यांच्यातिल युद्धाची कथा ११.माझी जन्मठेप - स्वातंत्र्यवीर सावरकरांची आत्मकथा १२. व्यक्ति अणि वल्ली - पु ल देशपांडे - व्यक्तिचित्रण १३.जावे त्यांच्या देशा - पु ल देशपांडे - प्रवासवर्णन १४. अपूर्वाई - पु ल देशपांडे - प्रवासवर्णन १५. पूर्वरंग - पु ल देशपांडे - प्रवासवर्णन १६. पावनखिंड - रणजीत देसाई - बाजीप्रभु देशपांडे यांच्या जीवनावरील कादंबरी १७. महानायक - विश्वास पाटिल - नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावरील कादंबरी १८. संभाजी - विश्वास पाटिल - संभाजी महाराजांच्या जीवनावरील कादंबरी १९. गनिमी कावा - नामदेवराव जाधव २०. स्वामी - माधवराव पेशव्यांच्या जीवनावरील कादंबरी २१. नर्मदे हर हर - जगन्नाथ कुंटे २२. हिमालयातील महात्म्यांच्या सान्निध्यात - स्वामी राम २३. मनश्री - सुमेध वडावाला २४. हेडहंटर - सुमेध वडावाला २५. सर्वोत्कृष्ट मराठी ऐतिहासिक कथा - संपादक: राम कोलारकर (मिळाले तर २ सेट घ्या. मी बरेच दिवस शोधतो आहे. मिळत नाही आहे. १० पुस्तके आहेत) २६. वाघ सिंह माझे सखे सोबती - दामू धोत्रे अजुन बरीच आहेत. पण आता टंकायचा कंटाळा आला आहे. तुमच्याकडे असलेल्या पुस्तकांची सूची मिळाली तर अजुन काही उपाय सुचवता येतील.
  • Log in or register to post comments

हा बहुतेक टायपो असावा.

विजय_आंग्रे
Tue, 04/23/2013 - 13:14 नवीन
६.श्रीमान योगी - शिवाजी सावंत - शिवाजी महाराजांच्या जीवनावरील कादंबरी -
<< हा बहुतेक टायपो असावा. श्रीमान योगी या कादंबरीचे लेखक शिवाजी सावंत नसुन "रणजीत देसाई" हे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

धन्यवाद..

चिगो
गुरुवार, 04/18/2013 - 12:11 नवीन
धन्यवाद मृत्युंजया.. पुण्यास येणे जमणार नाही ह्यावेळी. ऎतिहासिक कादंबर्यांपैकी तुमच्या यादीतील काही वाचलीयत. 'मिरासदारी' पुर्वरंग आणि अपुर्वाई घेतलंय आताच..:-)
  • Log in or register to post comments

धन्यवाद..

चिगो
गुरुवार, 04/18/2013 - 12:11 नवीन
धन्यवाद मृत्युंजया.. पुण्यास येणे जमणार नाही ह्यावेळी. ऎतिहासिक कादंबर्यांपैकी तुमच्या यादीतील काही वाचलीयत. 'मिरासदारी' पुर्वरंग आणि अपुर्वाई घेतलंय आताच..:-)
  • Log in or register to post comments

"क्लोरोफॉर्म" : डॉ. अरुण

एम.जी.
गुरुवार, 04/18/2013 - 13:09 नवीन
"क्लोरोफॉर्म" : डॉ. अरुण लिमये उपलब्ध आहे का कुठे ?
  • Log in or register to post comments

माझ्याकडे आहे.

उदय
Fri, 04/19/2013 - 21:04 नवीन
माझ्या माहितीप्रमाणे ते बर्‍याच वर्षांपासून दुर्मिळ झाले आहे. तुम्हाला PDF चालत असेल तर २-३ दिवसात मी तशी बनवून पाठवू शकेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एम.जी.

इथे आहे उपलब्ध!

पांथस्थ
गुरुवार, 04/25/2013 - 10:47 नवीन
इथे आहे उपलब्ध!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदय

माझी सुचवणी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 04/19/2013 - 20:25 नवीन
मूठमाती - भीमराव वाघचौरे ढव आणि लख्ख उन - राजन गवस जगी ऐसा बाप व्हावा- मुरहरी सोपान केळे मुंबईचं वर्णन -गोविंद नारायण मडगांवरकर फरिस्ता-नारायण धारप आपण सारे अर्जून -व.पू. यशवंतराव चव्हाण यांचं 'कृष्णाकाठ' मिळालं तर वाचायला विसरु नका. बनगरवाडी वाचलंय का ? बाकी कितीतरी सांगता येतील पण मिळाली पाहिजेत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

अरे हो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 04/19/2013 - 20:34 नवीन
बनगरवाडी मिळालं नाही तर इथे निवांत पाहा. (डोकं कोरं असलं पाहिजे ही अट आहे) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माझे दोन पैसे..

मस्त कलंदर
Fri, 04/19/2013 - 22:25 नवीन
वनवास-पंखा-झुंबर-शारदासंगीत--- प्रकाश नारायण संत पाडस-- अनुवादित आहे, परंतु अत्युत्तम पुस्तक- राम पटवर्धन अनुदिनी--दिलीप प्रभावळकर चुडैल-- अभिराम भडकमकर-- वेगळाच कथासंग्रह आहे. मी हिंदू झालो-- डॉ. रविन थत्ते युगान्त--- इरावती कर्वे गुलाम: स्पार्टाकस ते ओबामा---अच्युत गोडबोले व्यासपर्व--दुर्गा भागवत वीणा गवाणकरांची बरीचशी पुस्तके, डॉ आयडा स्कडर,लीट्झ माईटनर, एक होता कार्व्हर इ. इ. शुभ्र काही जीवघेणे--अंबरीश मिश्र अर्धी मुंबई--आनंद अवधाणे झालंच तर मुंबई दिनांक, सिंहासन-- अरूण साधू
  • Log in or register to post comments

पाडसबद्दल दोन शब्द सांग ना मक

रेवती
Mon, 04/22/2013 - 03:02 नवीन
पाडसबद्दल दोन शब्द सांग ना मक!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

जीव ओवाळून टाकावा असं पुस्तक.

मस्त कलंदर
Mon, 04/22/2013 - 03:56 नवीन
जीव ओवाळून टाकावा असं पुस्तक. पहिली दोन पानं नुसतं वर्णन वाचून कंटाळायला झालं होतं, पण एकदा हाती घेतलं की खाली ठेववत नाही. त्यांची अन्नाची बेगमी करताना पाहून आपलं शाकाहारी मन पहिल्यांदा थोडं मळमळतं, नंतर त्या परिस्थितीशी एकरूप झालो की असं काही आहे असं जाणवतही नाही. बापलेकाच्या नात्याची एक छान गुंफण दाखवली आहे त्यात. अनुवादाचा मापदंड म्हणून या पुस्तकाची चर्चा होते. असो.. दोन शब्द लिही म्हणालीस, पण त्यामुळं एक दुखरी आठवण परत जागी झाली. मनोगतावरच्या अदितीनं या पुस्तकाचा उत्तम परिचय लिहून ठेवला आहे. ही दुष्ट माणसं स्वतः जातात आणि आपल्याला जीवाला चटका लागतो. इथे वाच तो परिचयः http://www.pustakvishwa.com/content/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%B8-0
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

येत्या भारवारीत घेणार हे

रेवती
Mon, 04/22/2013 - 04:53 नवीन
येत्या भारवारीत घेणार हे पुस्तक! तुझी नको ती आठ्वण जागी केल्याबद्दल क्षमस्व! दुव्यावरील पुस्तक परिचय सुरेख झालाय. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

+१ खपली निघाली

ऋषिकेश
Tue, 04/23/2013 - 12:13 नवीन
+१ खपली निघाली :( बाकी पाडस बद्दल काय लिहिणार! ते शब्दातीत आहे या भावनेशी सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

+१

कोमल
Tue, 04/23/2013 - 12:30 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

+१ मस्तच आहे हे पुस्तक

प्रीत-मोहर
Tue, 04/23/2013 - 13:50 नवीन
+१ मस्तच आहे हे पुस्तक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

धन्यवाद..

चिगो
Sun, 04/21/2013 - 19:31 नवीन
सगळ्यांचे धन्यवाद.. प्रा.डाॅ., बनगरवाडी वाचले आणि संग्रहात आहे. सुंदराबाई हाॅलला जाऊन आलो. साने गुरुजी, दातारशास्त्री, नाथमाधव , गोपाळ गोडसे आणि गुरुनाथ नाईक आवडणार्यांची चंगळ आहे. पण मुख्य म्हणजे इंग्रजी कादंबर्या आणि पुस्तकांची आवड आणि पारख असणार्यांसाठी तर खजाना आहे, पन्नास आणि शंभर रुपयांत..
  • Log in or register to post comments

तुम्ही कोणती पुस्तके घेतलीत?

यशोधरा
Sun, 04/21/2013 - 19:33 नवीन
तुम्ही कोणती पुस्तके घेतलीत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

खरेदी..

चिगो
Tue, 04/23/2013 - 16:35 नवीन
एक शुन्य मी (पुलं), फटकेबाजी, मखलाशी (शिरीष कणेकर) सो कुल (ही फूटपाथवरची खरेदी.. ;-)) पुलंची पुर्वरंग आणि जावे त्यांच्या देशा, दमांची मिरासदारी, सुशिंच्या काही कादंबर्‍या (माझ्यासाठी मस्ट ;-)).. सुंदराबाई हॉलमधून वामन होवाळ आणि महादेव मोरेंची काही पुस्तके ( मला हे दोन्ही लेखक नवे आहेत. जरा चाळल्यावर बरी वाटली म्हणून घेतली.) शापित राजहंस (अनंत तिबिले), कालिकामुर्ती (दातारशास्त्री), Omerta (Mario Puzho), Unzipped (Anonymous) Havana.. बाकी मुंबईतही फार भटकायला न जमल्याने आणि विमानात जादा वजनखर्च द्यायचा मुड नसल्याने एवढीच.. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

जोरात झाली खरेदी

यशोधरा
Tue, 04/23/2013 - 16:36 नवीन
जोरात झाली खरेदी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

वा रे वा !

वेल्लाभट
Mon, 04/22/2013 - 07:12 नवीन
असे प्रश्न खरडायच्या फळ्यावर विचारावेत असं म्हणणं आहे काही जणांचं. आणि असे प्रश्न पोस्ट मधे टाकल्यावर पोस्ट डिलीट करण्यात येतात.
लीमाउजेट Mon, 08/04/2013 - 20:59 कृपया माहिती खरडफळ्यावर विचारा. किंवा जमीन किती आहे, झाडे लावण्यासाठी बजेट काय, पाणी किती आहे, याची नीट माहिती दिलीत तर सदस्य नक्की काहितरी सुचवू शकतील. तुम्हाला केलेल्या लागवडीतून उत्पादनाची अपेक्षा आहे का हेदेखिल स्पष्ट करा. Add comment
आता कुठे गेला हो तो नियम? का इथलीच काही मंडळी म्हणतात त्या प्रमाणे 'एका विशिष्ट ग्रूप मधल्या माणसांना इथे सगळे नियम माफ वगैरे असतात...?'
  • Log in or register to post comments

तुमचा धागा विस्कळित होता.

कवितानागेश
Mon, 04/22/2013 - 12:21 नवीन
तुमचा धागा विस्कळित होता. सुचवलेले बदल करुन तुम्हाला माहिती हवी असल्यास पुन्हा टाका. नक्की कुठे, घराच्या बागेत्/कुंडीत/शेतजमिनीवर झाडे हवीत आहेत हे स्पष्ट करा. या तिन्हीसाठी वेगवेगळी झाडे असतात. झाडे लावणे अनि पुस्तके विकत घेणे यात पुष्कळ फरक आहे. नुसते आवडती पुस्तके सान्गा म्हटले तरी अनेक गंभीर आणि चांगले प्रतिसाद येतिल, कारन इथे अनेक पुस्तक्वेडे लोक आहेत. प ण तुम्ही घेतलेल्या विषयाचे तसे नाही. तुम्ही नेमकी माहिती देउन नीट प्रश्न विचारलेत तर योग्य उत्तरे मिळतील आणि दन्गा होनार नाही. धागा जितका विस्कळित, तितका गुन्ता अधिक. मी तुम्हाला योग्य तो सल्ला दिला होता. तो न मानता, तुम्हाला गैरसमजच करुन घ्यायचे असतील तर तुमची मर्जी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

अच्छा! म्हणजे मी माहिती

वेल्लाभट
Mon, 04/22/2013 - 12:57 नवीन
अच्छा! म्हणजे मी माहिती विचारत होतो आणि सदर महोदय केवळ मत विचारत आहेत असं आहे. गैरसमज नाही हो; ते करून घ्यायची हौस नाही आम्हास. आक्षेप इतकाच आहे की नियम सोयीस्कर पणे लावला जातो. माझा प्रश्न व्हेग होता मान्य. मी दिली असती की माहिती मग! दिला असता सगळा तपशील ! पण माझा धागा 'माहिती खरडफळ्यावर विचारावी' म्हणून उडवला जातो आणि इथे तो नियम लावला गेला नाही. हेच खटकलं. बाकी 'तुमचीच' मर्जी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

मी दिली असती की माहिती मग!

कवितानागेश
Mon, 04/22/2013 - 13:02 नवीन
मी दिली असती की माहिती मग! दिला असता सगळा तपशील !> तेच मी सुचवले होते.
  • Log in or register to post comments

जाउ दे. निष्फळ वाद करण्यात

वेल्लाभट
Mon, 04/22/2013 - 14:00 नवीन
जाउ दे. निष्फळ वाद करण्यात मला स्वारस्य नाही.
  • Log in or register to post comments

मग नका घालू. माऊ तैंनी

विश्वनाथ मेहेंदळे
Tue, 04/23/2013 - 12:27 नवीन
मग नका घालू. माऊ तैंनी सुचवलेले बदल करून काढा धागा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

सद्ध्या संपादकांना झोडपायची

यशोधरा
Tue, 04/23/2013 - 14:54 नवीन
सद्ध्या संपादकांना झोडपायची फॅशन आहे, तुम्हांला माहिती नै?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

अच्युत गोडबोले

कापूसकोन्ड्या
Tue, 04/23/2013 - 15:04 नवीन
अच्युत गोड्बोले - बोर्ड रूम, किमयागार
  • Log in or register to post comments

चिगो थोडी भर

इरसाल
Tue, 04/23/2013 - 15:45 नवीन
Yugandhar Swami Agnipath Bakhar Antakalachi Burmuda Triangle Bhandarbhog Bhutacha Janma Bramhavart Chandramukhi Congo Garambicha Bapu Hiroshima Jarila Zhunj Lajja Lakshyavedh Natarang Nostradamouschi Bhavishyavani Radhey Rarang Dhang Sinhasan Surya Upara Yayati chhava Uchalya Mrutyunjay Jhool Narmade har har Adhapaat Bandhudwesh Kalikamurti Shalivahan Shak Indrabhuvan Guha pray (Savaj) Vilasmandir The seventh secret Bloodline The firm Madhyasta
  • Log in or register to post comments

अगागा..

चिगो
Tue, 04/23/2013 - 16:43 नवीन
अरे बाबा.. काय ही यादी !? असो. ययाति, छावा, स्वामी, गारंबीचा बापु, उचल्या, द सेव्हन्थ सिक्रेट वाचली आहेत. माफ कर, पण मृत्युंजय संग्रही आहे आणि तिच्या शब्दबंबाळतेमूळे आता सावंतांच्या इतर पुस्तकांवर खर्च करायला जीव कचरतो.. :-( 'शालिवाह्न शक' प्रदर्शनात होती, पण म्हटलं आधी एक वाचून बघू (पक्षी :कालिकामुर्ती), आवडल्यास बाकिची घेता येतील. 'द सेव्हन्थ सिक्रेट'ही वाचलंय.. यादीसाठी धन्यवाद, मित्रा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा