बाजारभाव (४-११-२००९)

Bhagwanta Wayal's picture
Bhagwanta Wayal in जे न देखे रवी...
10 Apr 2013 - 1:27 pm

ऑफिसमध्ये बायका मारत होत्या गप्पा
महगाईचा विषय होता साधा आणि सोपा

काल बाई जेंव्हा मी मार्केटला गेले
भाज्यांचे भाव बघुन हैराणच झाले

पंधरा रुपयाला एक होती मेथीची जुडी
एक रुपयाला एक कोथिंबीरीची काडी

एक रुपयाचे लिंबू पाच रुपयाला झाले
कांदे व बटाटे पंचविस रुपयावर गेले

बारा रु.पाव किलो वांगी व कारले
फ्लॉवर कोबी बघुन डोकेच फिरले

वीस पंचवीस रुपये किलो होते तेथे गहू
तंदुळ म्हणाला मला हातच नका लाऊ

शंभर रु.किलो झाली तुरीची डाळ
भडकलेले होते हरभरे आणि वाल

साखरेचा भाव तर पस्तीसवर गेला
तेलाचा डबा पण किती महाग झाला

दुध झाले महाग चाळीस रुपये लिटर
विचारायलाच नको चीज आणि बटर

सगळीकडेच भडकली अशी ही महागाई
गरीबाच्या जीवनाचा कोणी वाली नाही

गुढीपाड्व्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!

कविता