घरगुती फेसपॅक व अन्य टीप्स

शुचि's picture
शुचि in जनातलं, मनातलं
31 Mar 2013 - 5:51 am

कोणाला त्वचेसाठी पोषक अशा घरगुती फेसपॅक ची माहीती आहे का? मला माहीत असलेले ३ फेसपॅक पुढीलप्रमाणे-

(१) कोरड्या त्वचेसाठी - व्यवस्थित फेटलेले अंडे + २ चमचे ओटमील हा फेसपॅक १०-१५ मिनीटे ठेवला तर अंड्यामुळे त्वचा छान ओढली जाते व एज-डिफाइंग क्रीमचा इफेक्ट मिळतो असा अनुभव.

(२) एक चमचा मध व साय न काढलेले नीरसे दूध - त्वचा मुलायम होते हा अनुभव

(३) लिंबाचा अथवा संत्र्याचा रस व मध - लिंबू/संत्र्याच्या रसाने त्वचा कोरडी झाली. हा फेसपॅक फारसा आवडला नाही.

या धाग्यावर आपण आरोग्याची अथवा त्वचेची अन्य कोणती व कशी काळजी घेता, केसांची निगा कशी राखता वगैरेबद्दल उहापोह होणे अपेक्षित जसे भरपूर पाणी पीते/पीतो. आठवड्यातून तीनदा व्यायाम करते/करतो वगैरे. कृपया आपण जे उपाय अमलात आणले असतील तेच विस्तृत रीतीने उधृत करावे.

छान छान टीप्स मिळतील अशी आशा करते.

*गृहशोभिका छाप लेख वाटल्यास क्षमस्व पण खरच मोलाच्या सल्ल्यांच्या अपेक्षेत.

समाजजीवनमानसल्ला

प्रतिक्रिया

सद्ध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि तेलकट त्वचेची उन्हाळ्यात जास्त काळजी घ्यावी लागते, त्यावर एक सोपा उपाय म्हणजे दिवसातून दोनवेळा बर्फ चेहर्‍यावरून फिरवावा, तसेच निदान चार पाच वेळा तरी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा. उन्हामुळे त्वचा काळवंडली(टॅन) असेल तर बटाटय़ाचा रस चेहर्‍यावर लावावा, चेहर्‍याची त्वचा उजळते कारण बटाटा हा नैसर्गिक ब्लिचिंग एजंट आहे.

नेहमीसाठी एक घरगुती आणि चांगला फेसपॅक म्हणजे चार चमचे काकडीच्या रसात, चार ते पाच थेंब लिंबाचा रस मिसळावा व बेससाठी आवश्यकएवढी मुलतानी माती ह्या मिश्रणात घालावी. हा पॅक चेहर्‍यावर साधारण १५-२० मिनिटे ठेवून चेहरा धुवावा. चेहर्‍याची त्वचा मऊ आणि चमक्दार होते.
तसेच चंदन, बदाम आणि आंबेहळद दुधात उगाळून चेहर्‍यावर लावल्यास चेहरा तजेलदार व उजळ होतो. पण आंबेहळदीचे प्रमाण ह्या लेपात बरेच कमी असावे.

चांगली माहिती शुचि आणि श्रिया.

साळसकर's picture

31 Mar 2013 - 2:03 pm | साळसकर

मी मुलगी नसल्याने फारसे प्रकार माहीत नाही पण हा बर्फाचा आयटम मी केलाय.

कॉलेजात असताना नुकतीच दाढी फुटलेली जी घरीच करायचो. आफ्टर शेव लोशन सारखे लाड चालायचे नाहीत. तर दाढी केल्यावर चेहर्‍यावर तुरटी फिरवून लगोलग त्यावर बर्फाचे तुकडे चोळायचे. कसला तजेला म्हणून येतो ते मी सांगण्यापेक्षा स्वताच पुरुषांनी अनुभवणे.

प्रतिज्ञा's picture

1 Apr 2013 - 10:26 am | प्रतिज्ञा

हो... बहुतेक जन हे करतात. याने त्वचा फ्रेश होते पण त्याचबरोबर ती कोरडी पण होते. बऱ्याच वेळा याने येणारा फ्रेशनेस तात्पुरता भासतो. आणि त्वचा नाजूक असेल तर तीचा समानपणा जातो. म्हणजे ती उंचसखल होते.
आफ्टर शेव नसेल वापरायच तर हे जरूर वापरून बघा........
* १ ग्लास गरम पाण्यात तुळशी चे २/३ पाने व पुदिना २/३ पाने ५ मिनिट टाकून झाकून ठेवा. ५ मिनिटांनी पाने पाण्यातून बाजूला काढून पाणी नॉर्मल होऊ द्या. नंतर त्यात ८/१० गुलाब पाकळ्या व कपूरची १ वडी टाकून हे पाणी रात्रभर फ्रिझमध्ये ठेवून द्या. सकाळी आफ्टर शेव न वापरता त्याजागी हे वापरा.
(आता यावर मी प्रतिक्रिया देन पुरुषांना अपेक्षित असेल कि नाही माहित नाही. पण तरी देते... :( )

परिकथेतील राजकुमार's picture

31 Mar 2013 - 10:51 am | परिकथेतील राजकुमार

हो की नै शुचिमामी ? ;)

हिहिहि ... पर्रा ... अरे आधी ' साजन मेरा उस्पारे ... मिल्नेकू दिल्बेक्र्रार्र्ए ' असं हुतं ..;)
पण आत्ता कि नई शुचि मामी साजन के घ्र्मीचे म्ह्नुन तिला हे सर्वे नुस्के लाग्तायेत :D :P

शुचि कीपिट्गं बै ... मी वाच्तीये :)

अभ्या..'s picture

1 Apr 2013 - 2:16 am | अभ्या..

शुचिला काय गरज नैय्ये असल्या नुस्ख्याची. ;)
पूजा आन शुचि पक्क्या मॅनेजर हायेत. सगळं म्हैत असतं त्यांना. उगी लोकांना कामाला लावायचे आन मजा बघत बसायची.
दोघींच्या धाग्याचे प्रतिसाद बघा कंदीपन. ;)

आत्ता कि नई शुचि मामी साजन के घ्र्मीचे म्ह्नुन तिला हे सर्वे नुस्के लाग्तायेत

१००% खरं आहे. अगं मी घरातल्या सर्वांबरोबर बाहेर जातानाही ऑफीसचेच कपडे घालायचे आधी. कारण वेगळे फॅशनेबल कपडेही कधी घेतले नाहीत पण त्यानी होतं काय सर्वांना॑ ऑफीसचं रुप पहायचीच सवय लागते.... रुक्ष/फॉर्मल. परवाच ठरवलं फॉर्मल कपडे वेगळे ठेवायचे, घरगुती वेगळे अन नवर्‍याबरोबर फिरायला जाताना तर एकदम यंग दिसणारे निवडायचे. मग छानशा कॅप्री अन टी-शर्ट घेतल्या. घरी फेसपॅक लावायला लागले म्हणजे एकंदर घरच्यांना सॉफ्ट मॅनिप्युलेट करण्यासाठी.

परिकथेतील राजकुमार's picture

1 Apr 2013 - 12:50 pm | परिकथेतील राजकुमार

माझ्या डोळ्यासमोर चित्रच आले.

शुचिमामी संगणकासमोर बसली आहे. संगणकावरती कुठलेतरी तत्वज्ञानी इंग्रजी पुस्तक उतार भाषांतरासाठी उघडलेले आहे, शेजारच्या टॅबमध्ये संजोपरावांचा जुना लेख आहे, मांडीवरती दासबोध अथवा तत्सम पोथी पुराण आहे आणि एका हाताने फेसपॅक बनवणे सुरु आहे.

मुलंसुद्धा (पक्षी पुरुष) फेसप्याक वगैरे लावतात हे क्वालेजमध्ये गेल्यावर कळलं. हॉस्टेलवर परप्रांतिय (खासकरून उत्तरभारतीय) मुलं विकांताला 'बावगा' होउन बसलेली असतं. 'कर्त्रूत्व हेच पुरुषांचं सौंदर्य' अशी शिकवण (स्वगतः कोळसा उगाळण्यात काय हशील ;) ) असल्याने फेसप्याक वगैरे कधी लावले नाहीत. पुढे, रुममेट असले प्रकार करायचा. त्यावेळी तो मुलतानी माती, त्यात हळद आणि चंदनाची पावडर टाकून लावत असे. काही जण 'कावेरी एंपोरिअम' मध्ये मिळणारा तयार चंदनाचा फेसप्याकमध्ये गुलाबपाणी घालून लावतात.

श्रीरंग_जोशी's picture

2 Apr 2013 - 2:10 am | श्रीरंग_जोशी

काही वर्षांपूर्वी माझा एक रुममेट होता. मूळचा दक्षिण कर्नाटकातला वर्णाने बराच सावळा होता. चाळिशीला पोचला तरी कमावलेली शरीरयष्टी राखून होता. अमेरिकेत येऊन पश्चिमी सभ्यतेचा लाभ घेण्यास उत्सुक होता.

पण स्वतःच्या रंगाविषयी न्युनगंड मात्र फारच होता. एकदा मी भाजीपाला घेऊन आल्यावर त्यातील स्ट्रॉबेरी व द्राक्षे पाहून म्हणाला "यु इट दीझ फ्रुट्स टू कीप युअर स्किन ग्लोइंग, राईट?"

प्रतिज्ञा's picture

31 Mar 2013 - 2:42 pm | प्रतिज्ञा

शुचि, मी र्सौदर्य राखण्यासाठी रोज काही गोष्टी नियमित करते.... मी स्वताला ती सवय लावली आहे. माझ्यामते सौदर्य राखण्यासाठी शरीराची बाहेरून तशीच आतून पण काळजी घ्यायला लागते. त्यात मी खालील गोष्टी नियमित करते.....
* रोज सकाळी १ ग्लास कोमात पाण्यात २ चमचा मध व अर्धा लीम्बुचा रस घालून पिते.
* रोज दिवसातून २० मिनिट चालण ...
* रोज १ तास योगा...
* सकाळी ५/६ पाण्यात भिजवलेले बदाम...
* रोज १ कप दुध
* रोज न चुकता २ वेळ नाश्ता व जेवण....
* रोज आंघोळ केल्यानंतर अंग थोड ओलसर असतानाच बॉडी लोशन लावते.
* रोज मेक अप दुधात भिजवलेल्या कापसाच्या बोल्यानेच काढते.....
* पोटातून रोज २ वेळ लालिमा ( LALIMA its a blood purifier for women by Himani ) नावाच एक सिरप घेते.
* फेसपॅक मध्ये मी रोज मध + हळद+ लीम्बुरस + निरस दुध एकत्र करून लावते...२० मिनिट ठेवून धुवून टाकते.
* चेहरा धुण्यासाठी मी रोज मसुरडाळ पावडर + चणाडाळ पावडर रोज वापरते...
* रोज रात्री झोपन्याआधी २ थेंब देशी घी चे तळहातावर घेवून पूर्ण चेहऱ्यावर स्ट्रोक्स देवून लावते....

दिपक.कुवेत's picture

31 Mar 2013 - 8:04 pm | दिपक.कुवेत

"* रोज रात्री झोपन्याआधी २ थेंब देशी घी चे तळहातावर घेवून पूर्ण चेहऱ्यावर स्ट्रोक्स देवून लावते.... " अरेच्च्या आधी 'घी' ह शब्द दिसलाच नाहि :P दोन थेंब देशी वाचुन पुढिल काहि दिसलच नाही. :D (कॄ.ह.घे)

रोज ५ ते ६ बदाम खाउन उष्ण नाहि पडत?

प्रतिज्ञा's picture

31 Mar 2013 - 10:37 pm | प्रतिज्ञा

हम्म.... पुरुषांना त्यांच्या कामाच बरोबर कळत. उगाच ध चा मा करू नका हो...... बदाम रात्री कोमट पाण्यात भिजवून सकाळी साल काडून खूप बारीक चावून खडीसाखर च्या एखाद्या दाण्याबरोबर खाल्ला तर नाही बाधेल. बदामाच्या सालीत फायबर खूप असतात पण ते पचायला खूप जड व चावायला खूप चिवट असतात. काही जणांना या सालीमुळे अतिसाराचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे ते टाळावेतच.

प्रतिज्ञा अगदी बरोबर बोललीस. बदाम भीजवून छान लागतात व पचतात. मेंदूला चांगले असतात असं ऐकून आहे.

एकच कप दूध का गं जरा वाढव की. आणि एक तुला माहीत आहे का की फक्त कॅल्शिअम घेऊन उपयोग नसतो तर व्हायटॅमिन डी देखील मिळालं पाहीजे. ड जीवनसत्वामुळे कॅल्शिअम शरीरात व्यवस्थित शोषलं जातं. ड जीवनसत्व अन्नात बर्‍याच कमी पदार्थात असतं त्यामुळे सकाळच्या कोवळ्या उन्हात त्वचा एक्स्पोझ करणं चांगलं. पहाटेचं कोवळं बरं का : ) नंतरचं नाही.

प्रतिज्ञा's picture

1 Apr 2013 - 9:47 am | प्रतिज्ञा

कारण माझ्याचप्रमाणे दूध कोणाला आवडत नसेल पण...तरी गरज म्हणून मी पिते. आणि हो... ड विटामिन सूर्या च्या किरणात असत.... पण त्याच बरोबर ते सर्व प्राण्यांमध्ये ( मांसाहारी पदार्थ ) पण असत. दुध व अंड्यात पण असत. प्राण्यांमध्ये ते माश्यात जास्त असत तर वनस्पती त ते असत पण खूप कमी प्रमाणात असत. याउलट ते पालेभाजित ते अजिबात नसत.
(मी तुला हे अवांतर यासाठी सांगितलं कि सूर्याकडून ड विटामिन घेण्यासाठी सकाळी उठाव लागत न..... सकाळी उठायचा जाम कंटाळा हे मला. माझ्यासारख्या ना बाकी source उपयोगात येतील :))

प्रतिज्ञा's picture

31 Mar 2013 - 2:51 pm | प्रतिज्ञा

दादा कोंडके.... अहो सौदर्य हा आजकाल स्री व पुरुष ह्या दोघांसाठीही तेवढाच महत्वाचा विषय आहे. आज पुरुषांनी पण या विषयावर बोलन आम्हा स्रियांना अपेक्षित आहे... आणि यात गैर ते अस काहीच नाही. सौदर्य म्हणण्यापेक्षा चेहऱ्याच आरोग्य म्हणा ना.... आरोग्य तर स्री व पुरुष दोघांना असतच. तेव्हा बोलन गरजेच आहेच. हो कि नाही मैत्रिनिनो ....?

दादा कोंडके's picture

31 Mar 2013 - 2:58 pm | दादा कोंडके

आज पुरुषांनी पण या विषयावर बोलन आम्हा स्रियांना अपेक्षित आहे... आणि यात गैर ते अस काहीच नाही. सौदर्य म्हणण्यापेक्षा चेहऱ्याच आरोग्य म्हणा ना.... आरोग्य तर स्री व पुरुष दोघांना असतच. तेव्हा बोलन गरजेच आहेच. हो कि नाही मैत्रिनिनो ....?

ही मात्र गृहशोभिका टाईप प्रतिक्रिया झाली. ;)

प्रतिज्ञा's picture

31 Mar 2013 - 3:32 pm | प्रतिज्ञा

असू शकते बुवा.... अजून कुठल्या मासिकात लिहित नाही मी..

बॅटमॅन's picture

1 Apr 2013 - 12:08 am | बॅटमॅन

+१००००००००.

खंप्लीट सहमती =))

गेले ते दिवस मायला ;)

दादा कोंडके's picture

1 Apr 2013 - 1:26 am | दादा कोंडके

गेले ते दिवस मायला ;)

हा हा. खरंय. :)

-(काही निवडक पानं बघणारा आणि गृहशोभिकेचा सल्ला वाचणारा) दादा

काही निवडक पानं बघणारा आणि गृहशोभिकेचा सल्ला वाचणारा

तंतोतंत!! :)

सुबोध खरे's picture

31 Mar 2013 - 3:07 pm | सुबोध खरे

लिंबाचा अथवा संत्र्याचा रस व मध हा फेसपॅक आपली त्वचा तेलकट असेल तर तेल कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. आणि सुदृढ शरीराच्या स्त्रियांसाठी( ज्यांच्या शरीरात चरबी जास्त आहे)अशांसाठी.
कोरडी त्वचा असेल तर दुधावरची साय त्यात थोडीशी हळद घालून रात्रभर लावून ठेवा म्हणजे त्वचेचे चांगले पोषण आणि दुरुस्ती(repair) होते.यात हळद मसाल्याच्या डब्यातील वापरू नये त्यात मिसळलेले मसाले त्वचेला दाहक ठरू शकतात. तसेच हळदीचे प्रमाण हलके पिवळे येईल इतकेच असावे अन्यथा दुसर्या दिवशी त्वचेला पिवळा रंग येतो. यात बदामाचे किंवा चंदनाचे तेल २-३ थेंब टाकले तर उत्तम
हा फेसपॅक रोज नवा करून लावावा कारण आदल्या दिवशीची साय वापरल्यास त्यातील लक्टोजचे लैक्तिक आसीड मध्ये होऊन त्वचेला दाह होतो.(कालचा फेसपॅक टाकून द्यावा)

मी लिंबाच्या रसाचे थेंब टाकलेले पाणी नॅपकिन्वर घेउन तो फ्रिजमध्ये ठेवते, अन मग बाहेरुन्घरी आले की दोन मिनिट चेहर्यावर टाकुन स्वस्थ बसते. फार फ्रेश वाटत.

कसला रिफ्रेशींग , मस्त उपाय आहे. मला खरच कौतुक वाटतं ज्या मुली/बायका असे छोटे छोटे क्रिएटीव्ह क्षण निर्माण करतात, आनंद लुटतात त्यांचा.

परा सोडून सर्वांचे आभार ;)
@श्रिया = बटाटाच्या रसाची आयडीया खरच माहीत नव्हती. वाचलेलं पण विसरले :(. मुलतानी मातीने माझा चेहरा कोरडा पडत असे. कदाचित साय घालून नाहीही होणार पण घरात फॅट्-फ्री दूध वापरत असल्याने सायीची वानवाच आहे.
@प्रतिज्ञा- मीदेखील लोशन अंग ओलसर असतानाच लावते. त्याने मॉइश्चर लॉक होते. चणाडाळीचा अर्थात बेसनाच्या फेसपॅकने माझी त्वचा फार कोरडी पडते.
@सुबोध खरे - रात्री हळद-साय लावून झोपले तर हळदीने उशांचे अभ्रे पिवळे पडतीलसे वाटते.

प्रतिज्ञा's picture

31 Mar 2013 - 10:59 pm | प्रतिज्ञा

अग राणी शुचि, मी म्हटल कि मी चेहरा धुण्यासाठी मसुरडाळ पावडर+चणाडाळ पावडर वापरते. फेसप्याक म्हणून नाही. आणि तुला कधी १० मिनिट पण मिळाले तरी विचार न करता सरळ मध लावत जा. त्यात दुध + हळद + लीम्बुरस नाही घातला तरी चालेल. फक्त मध लावल्यावर ( आणि कुठलाही प्याक लावल्यावर सुद्धा ) चेहरा शक्यतोवर जैसे थे ठेवायचा. आणि प्याक ( प्रतेक प्याक ) नैसर्गिक रित्या सुकू द्यावा व नंतर कोमात पाण्याने धुवून टाकावा. व नंतर गार पाण्याचे हबके मारावेत. व चेहरा थोडा ओलसर असतानाच बॉडी लोशन लावून टाकायचं.मग चेहरा बघ जादू.......

अभ्या..'s picture

31 Mar 2013 - 11:09 pm | अभ्या..

कोमात पाण्याने धुवून टाकावा

डायरेक्ट कोमात जाते का माणूस या पॅकने? ;)

मग चेहरा बघ जादू.

=)) =)) =)) कोई मिल गया वाला?

प्रतिज्ञा's picture

31 Mar 2013 - 11:24 pm | प्रतिज्ञा

मोठ्या कष्टाने मराठी टायपिंग शिकतेय. त्यात तुम्ही लोक शाळा घेतात माझी.... अजून सगळे शब्द नाही न टाईप करता येत. तेपण शिकेन हळूहळू...

अभ्या..'s picture

31 Mar 2013 - 11:46 pm | अभ्या..

माफ करा :(
पण शिकाल लवकरच :) सोप्पेय एकदम

बॅटमॅन's picture

1 Apr 2013 - 12:10 am | बॅटमॅन

ते कोमात वाचूण माझादेखील क्षणभर ऊर्ध्व का काय तो लागला होता ;)

हं शक्य आहे की डाळीच्या पीठानी तुझी त्वचा कोरडी पदत नसेल पण माझी पडते गं. अगदी २ मिनिटात चेहरा धुतला तरी. नैसर्गिक तेल काढून टाकलं जातं. :(

प्रतिज्ञा's picture

31 Mar 2013 - 11:20 pm | प्रतिज्ञा

शुचि, तू मला तुझ्या त्वचेचा नेमका प्रकार सांगितलास तर मी जास्त चांगल सांगू शकेल. कारण येथे ज्या प्रतिक्रिया येतील त्या मिश्र असतील म्हणून तू (व इतर भगिनींनी सुद्धा ) स्वतावर सरसकट वापरू नकोस. चेहऱ्याची त्वचा खूप संवेदनशील असते. आधी आपण आपल्या चेहऱ्याचा प्रकार ठरवा. व त्यानुसार चेहऱ्याला ट्रीट करा. एक चुकीचा प्याक पण आपल्या चेहऱ्याची कधीही न भरून येणारी हानी करू शकतो. माझा या विषयावर भरपूर अभ्यास आहे..... ज्याचा मी माझ्या आयुष्यात पुरेपूर उपयोग करते. आणि तुलापण याचा लाभ झाला तर मला आनंदच आहे.
(अवांतर.... यात कोना भगिनीने सांगितलेली टिप्स अथवा प्याक चुकीचे आहेत अस अजिबात नाही....

आनन्दिता's picture

1 Apr 2013 - 12:10 am | आनन्दिता

पी + शिफ्ट इ = पॅ :)
पॅक...

माझी त्वचा खूप तेलकट होती पण वयोमानानुसार आता मिश्र झालेली आहे. अगदी ठक्क कोरडी नाही पण तेलकटही नाही. मी रॉक चं एज-डिफाइंग क्रीम लावते कारण मला अन्य सूट होत नाहीत. कसलं टेरिफीक क्रीम आहे गं ते .... सॉलीड मस्त आहे.
ओटमील + अंड पॅक मला चांगला सुट होतो. मध +मुलतानी माती ने त्वचा कोरडी पडत असे. दही+बेसन ने तर भयंकरच कोरडी पडे.

वामन देशमुख's picture

31 Mar 2013 - 8:29 pm | वामन देशमुख

उन्हाळ्यात कोरड्या त्वचेची काळजी कशी घ्यावी घ्यावी हे सांगा.

(कोरड्या त्वचेच्या समस्येने त्रस्त असलेला )
वामन

अवांतरः सौंदर्य हे स्त्रीचे सामर्थ्य असते अणि सामर्थ्य हे पुरुषाचे सौंदर्य असते असे म्हणतात!

माझ्या वरच्या प्रतिसादात काकडीच्या रसाचा उल्लेख आहेच. पण त्वचा कोरडी असेल तर त्यात मुलतानी माती न घालता, काकदीचा रस आणि दूध ह्यांचे मिश्रण चेहर्‍याला लावले तर नक्कीच फायदा होईल. कारण काकडीचा रस त्वचेला लावल्याने त्वचेची आर्दता वाढते.
तसेच बदाम हि त्वचेसाठी पोषक असतात, रात्री झोपण्यापूर्वी बदामतेल त्वचेला लावलं तर त्वचा मृदू होण्यास मदत होईल.

प्रतिज्ञा's picture

1 Apr 2013 - 10:51 am | प्रतिज्ञा

- त्वचेवर चांगल्या दर्जाचे सनस्क्रिन लावा.
- डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी गॉगल घाला.
- दिवसभरातून जास्तीत जास्त वेळा चेहरा धुवा.
- भरपूर पाणी प्या, ताक प्या, नारळपाणी व कोकम सरबत प्या.
- प्लेन मधाचा प्याक सगळ्या त्वचेसाठी व सगळ्या ऋतूत फायद्याचा आहे. जर त्वचा खूप कोरडी असेल तर काकडी व बटाटा चेहऱ्यासाठी वगळा. कारण काकडी थंड वाटेल. बटाटा काळपट पणा दूर करेल. पण त्याचबरोबर त्वचा खूप कोरडी पण करेल.
- उन्हाने आलेला काळपट पण घालवण्यासाठी भरपूर पिकलेला टोमाटो अर्धा कापून करपलेल्या भागावर हळुवार घासा व १० मिनीटने धुवून टाका. १ आठवड्यातच त्वचेचा नैसर्गिक गुलाबी वर्ण परत यईल.
-त्वचेच्या थंड्प्नासाठी हिरव्या नारळातील पटली मलई स्मश करून त्याचा लेप लावा.
- चहापाकिट च्या चंदेरी व सोनेरी पिशव्या फ्रिझमध्ये गार करून त्या डोळ्यांवर १५ मिनिट तेवा.
- नैसर्गिक पाण्याचा जास्त अंश असलेली फळे खा.
- काकडीची चकत्या डोळ्यावर ठेवा.
- गुलाबपाण्याचा छीडकावा चेहऱ्यावर घेत जा.
-ताक + टोमाटो रस हा प्याक लावत जा..... (याने उन्हाणे करपून जर एखादी जखम झाली असेल तर ती लवकर भरून येते.)
- लिंबाच्या रसात साखर, ग्लिसरीन घालून ते गोलाकार पद्धतीने लावावे.
- उन्हात जास्त काळ राहणे टाळणे.
- हलक्या रंगाचे कपडे वापरावेत

jaypal's picture

31 Mar 2013 - 11:47 pm | jaypal

हिवाळ्यात = रात्री झोपताना दुधात(शक्यतो गाईच किंवा म्हशीच) बदाम उगाळुन ती पेस्ट चेह-यावर लाऊन रात्रभर ठेवावी. त्वचा जास्त कोरडी असल्यास उगाळताना थोडी साय मिसळावी
उन्हाळ्यात = मुलतानी माती + गुलाब पाणी किंवा चंदन (गोपी चंदन नव्हे) उगाळुन त्या मधे कापुरचुर्ण मिसळलेला पॅक वपरावा.

jaypal's picture

31 Mar 2013 - 11:49 pm | jaypal

हिवाळ्यात = रात्री झोपताना दुधात(शक्यतो गाईच किंवा म्हशीच) बदाम उगाळुन ती पेस्ट चेह-यावर लाऊन रात्रभर ठेवावी. त्वचा जास्त कोरडी असल्यास उगाळताना थोडी साय मिसळावी
उन्हाळ्यात = मुलतानी माती + गुलाब पाणी किंवा चंदन (गोपी चंदन नव्हे) उगाळुन त्या मधे कापुरचुर्ण मिसळलेला पॅक वपरावा.

येकच उपाय ... भरपूर पाणि प्या .... दुसरं कैच करावं लागत नै :)

प्रतिज्ञा's picture

1 Apr 2013 - 9:51 am | प्रतिज्ञा

सहमत....

आदूबाळ's picture

1 Apr 2013 - 2:10 am | आदूबाळ

तूच आहेस तुझ्या त्वचेचा शिल्पकार...

जेनी...'s picture

1 Apr 2013 - 2:26 am | जेनी...

हेय डुड =))

अत्रुप्त आत्मा's picture

1 Apr 2013 - 1:58 pm | अत्रुप्त आत्मा

@तूच आहेस तुझ्या त्वचेचा शिल्पकार... =)) वा काय मन आहे राव पैकिच्या पै कि मार्क दिले पाहिजेत. ;)

बॅटमॅन's picture

1 Apr 2013 - 2:27 pm | बॅटमॅन

बलीवर्दनेत्रभञ्जक!!!

=)) =))

प्यारे१'s picture

1 Apr 2013 - 2:40 am | प्यारे१

पराच्या मामीचा सल्ला.... ;)

हा हा हो हे सदर सुरु करणार आहे

बाय द वे - मर्लिन मन्रो म्हणे पायांचे सौंदर्य वाढण्यासाठी ,बीयर मध्ये पाय बुडवून बसायची .....ऐकीव माहीती. : )

अभ्या..'s picture

1 Apr 2013 - 3:48 am | अभ्या..

हेपण बायदवेच शुचितै, ;)
क्लीओपात्रा (आठवली का खरडफळ्यावरची ;) ) गाढवाच्या दुधाने आंघोळ करायची म्हणे. तिच्या अलौकीक सौंदर्यासाठी.
तिची भूमिका करणार्‍या लिझ टेलरने पण एकदा हा प्रयोग करुन बघितला होता (म्हणे)

प्यारे१'s picture

1 Apr 2013 - 3:54 am | प्यारे१

गाढविणीचे रे अभ्या!
तुझा बैल दूध देतो का?

आनन्दिता's picture

1 Apr 2013 - 3:59 am | आनन्दिता

=)) =))

दादा कोंडके's picture

1 Apr 2013 - 3:56 am | दादा कोंडके

क्लीओपात्रा (आठवली का खरडफळ्यावरची ;)) गाढवाच्या दुधाने आंघोळ करायची म्हणे.

बाबौ!

अभ्या..'s picture

1 Apr 2013 - 4:00 am | अभ्या..

हितल्या सगळ्या उपायापेक्षा गाढवाचे दूध हाच उपाय जास्त पॉसिबल आणि सोपा हाय ;)

जेनी...'s picture

1 Apr 2013 - 4:01 am | जेनी...

शिवं शिवं शिवं !
गंगाजल शिंपडारे कुण्णीतरी :-/

अभ्या..'s picture

1 Apr 2013 - 4:06 am | अभ्या..

गंगाजल पण त्वचेला फार भारी असते असे कोणीतरी रामदेव वगैरेंनी म्हणले असेलच की. शिंपडा शिंपडा.
नशीब गोमूत्र म्हणली नाय ही. ;)

=))

अब्या एक जालिम उपाय आहे पण शुचिला व्यनित सांगण्याजोगाये =))

अगं सांग इथे बिन्धास्त ;)

श्रीरंग_जोशी's picture

1 Apr 2013 - 7:51 am | श्रीरंग_जोशी

माफ करा मी स्वतः ठरवून अमलात न आणलेला उपाय सुचवतो.

काही महिन्यांपूर्वी एका मासिकात हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सलमा हायक हिची मुलाखत वाचली होती.

त्या मुलाखतीत तिने तिच्या त्वचेच्या सौंदर्यामागचे रहस्य सांगितले होते. ते असे की ती सकाळी उठल्या उठल्या लगेच चेहरा कधीच धुवत नाही. त्यामागचा उद्देश म्हणजे रात्रभर आपल्या त्वचेच्या सुक्ष्म छिद्रांमधून एक विशिष्ट प्रकारचे तेलकट द्रव्य झिरपत असते. त्याचा उद्देश असतो की त्वचेच्या बाह्य आवरणाचे पोषण करणे. अन आपण चेहर्‍यावर पाण्याचा मारा करून निसर्गाच्या या उपक्रमाला सुरूंग लावत असतो.

तिने पुढे असेही सांगितले होते की रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवावा जेणेकरून दिवसभरात चेहर्‍यावर साचलेले धुलीकण व इतर कण निघून जाऊन त्वचेची सुक्ष्म छिद्रे मोकळी होतील.

प्रतिज्ञा's picture

1 Apr 2013 - 10:05 am | प्रतिज्ञा

हो एकदम बरोबर.... त्यामुळेच तेलकट त्वचा असणाऱ्या ना लकी म्हटल जात. या लोकांना त्वचेत असलेल तेल कमी करता येत. ३० शी नंतर पण अशी त्वचा असणाऱ्या लोकांची त्वचा नैसर्गिकच खूप चांगली व तुकतुकीत राहते. याउलट कोरडी व सामान्य त्वचा असणाऱ्या व्यक्तींना त्वचेत तेल वाढवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. एवढ करुनपण त्या लोकांची त्वचा ३० नंतर लवकर सुटते. आणि म्हणून सकाळी उठल्या उठल्या टीशु पेपर ने चेहरा न टिपता हाताच्या बोटाच्या पेरांनी गोलाकार स्ट्रोक्स द्यायचे व ते तेल त्वचेतच जिरवायच. आणि कायम आधी कोमत पाण्याने चेहरा धुवून गार पाण्याचे हबके मारावेत. रात्री आपल्या प्रमाणेच आपली त्वचा सुद्धा श्वास घेत असते म्हणून रात्री झोपण्याआधी त्वचा स्वच्च धुवून त्वचेची रंध्रे श्वासासाठी मोकळी घ्यावीत.

शुचि's picture

1 Apr 2013 - 10:22 am | शुचि

हे नक्की करणार. सुरेख प्रतिसाद.

नाना चेंगट's picture

1 Apr 2013 - 12:42 pm | नाना चेंगट

हं वय झालं तर शुचिमामींच...

मिपामामीने मिपाकाकवांसाठी काढलेला धागा ;)

कुहू's picture

1 Apr 2013 - 11:25 pm | कुहू

बदाम भिजत घालून त्याची टरफले काढून घ्यावित.. थोड्या दुधात बदाम रवाळ वाटून घ्यावेत ..चेहरा कोमट पाण्याने धुवून , किंवा वाफ घेउन नंतर हे स्क्रब गोलाकार चोळून चोळून चेहर्यावर लावावे ..१० मिनिटे तसेच ठेवावे..नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवावा ..या मुळे मृत त्वचा निघुन जाते आणि त्वचा मुलायम दिसते..

कोरफड : कोरफड हे एक उत्तम नैसर्गिक क्लिंन्जिग आहे ..ज्यांची त्वचा तेलकट आहे..त्यांनी कोरफडीचा गर चेहरयावर लावावा..तेलकटपणा कमी होतो..

एक समस्या :
ब्लॅकहेड्स घालवण्याचे घरगुती उपाय माहित आहेत का ??

शुचीतै, स्वारी, यावेळी कै प्रतिसाद देता येणार नै. सौंदर्यच नसल्याने वर्धनाचे उपाय कधी करून बघितले नाहीत. नाही म्हणायला एकदा हळद आणि मुलतानी मिट्टी कालवून चेहर्‍याला फासले होते. नंतर पेपर वाचनात गुंगल्याने क्लासला जायला उशीर झाला. तशीच निघाले आणि आईने ओढत घरात आणले. तोंड धुवून जाण्यास सांगितले पण हळदीचा पिवळा रंग जाता जायला तयार नाही. तशीच क्लासला गेले तर काहीजणांनी "काय झाले? अशी का दिसतीयेस? तुला कावीळ झालीये का?" असले अचरट प्रश्न विचारले. एकंदरीतच बाळपणी आईने तीट पावडर लावली असेल तेवढेच, बाकी काही नाही. तात्पर्य- आजवर वापरलेली प्रसाधने म्हणजे काजळाची तीट व जॉन्सन आणि जॉन्सनची बाळभुकटी.

कवितानागेश's picture

2 Apr 2013 - 12:27 am | कवितानागेश

प्रेमात पडावं. आपोआप ग्लो येइल चेहर्‍यावर! ;)
नाई जमलं तर डव्ह वापरावा,
आणि त्याचापण उपयोग नाही झाला तर दूध आनि मध वापरावं,
तरीसुद्धा अजून आपला चेहरा छान दिसत नाही असं वाटत असेल तर
चांगला फेस्वॉश वापरुन चेहर्‍याबरोबर आरसापण स्वच्छ धुवावा! ;)
तरिही समाधान मिळत नसेल तर पोजिटिव्ह थिन्किन्ग्ची पुस्तके वाचावीत ! :P

अर्धवटराव's picture

2 Apr 2013 - 1:55 am | अर्धवटराव

=))
तु दुधभाताशिवाय आणखी काय काय खातेस ??

अर्धवटराव

अत्रुप्त आत्मा's picture

2 Apr 2013 - 12:02 pm | अत्रुप्त आत्मा

@आणखी काय काय खातेस ??>>> मोदक नै मंजे आंम्ही पर्वा प्रत्यक्ष पाहिले. ;)

अभ्या..'s picture

2 Apr 2013 - 12:18 pm | अभ्या..

=)) =)) =))
आणि जेवढे नॅचरल तेवढे सारे आवडीने. ;)
होकीनै गुर्जी?

अत्रुप्त आत्मा's picture

3 Apr 2013 - 11:36 pm | अत्रुप्त आत्मा

@जेवढे नॅचरल तेवढे सारे >>> =)) तुला बर्‍या बातम्या लागतात रे........ :-p

श्रीरंग_जोशी's picture

3 Apr 2013 - 11:47 pm | श्रीरंग_जोशी

अ.आ. - त्यात काय विशेष? अभ्याकडे दूरदर्शन व्यवस्थित चालते... :-).

अभ्या..'s picture

4 Apr 2013 - 1:13 am | अभ्या..

तुला बर्‍या बातम्या लागतात रे

कुणीतरी डोळे मिटून काहीतरी पिते. त्याला वाटते जग आंधळेच आहे. असं काहीतरी म्हणतात ना गुरुजी? ;)
तुम्ही गुपचुप करा हो काहीपण. हमारे जासूस चारो ओर है. =)) =))

यशोधरा's picture

2 Apr 2013 - 6:55 am | यशोधरा

:D

माझ्या एका जालीय मैत्रीणिने एका फेसपॅकची रेसिपी दिली आहे, जी फक्स्त महिलांकरीता आहे, त्यातपण तरूण महिलांसाठी. तरीबी आपापल्या जाबाबदारीवर आजमवून बघावी.
अर्धी वाटी कांद्याची पेस्ट + १ चमचा लसूण पेस्ट एकत्र करावं आन त्वांडाला लावून धा मिन्टं ठेवावं. तोंड लई भारी होतयं म्हणे.