कोणाला त्वचेसाठी पोषक अशा घरगुती फेसपॅक ची माहीती आहे का? मला माहीत असलेले ३ फेसपॅक पुढीलप्रमाणे-
(१) कोरड्या त्वचेसाठी - व्यवस्थित फेटलेले अंडे + २ चमचे ओटमील हा फेसपॅक १०-१५ मिनीटे ठेवला तर अंड्यामुळे त्वचा छान ओढली जाते व एज-डिफाइंग क्रीमचा इफेक्ट मिळतो असा अनुभव.
(२) एक चमचा मध व साय न काढलेले नीरसे दूध - त्वचा मुलायम होते हा अनुभव
(३) लिंबाचा अथवा संत्र्याचा रस व मध - लिंबू/संत्र्याच्या रसाने त्वचा कोरडी झाली. हा फेसपॅक फारसा आवडला नाही.
या धाग्यावर आपण आरोग्याची अथवा त्वचेची अन्य कोणती व कशी काळजी घेता, केसांची निगा कशी राखता वगैरेबद्दल उहापोह होणे अपेक्षित जसे भरपूर पाणी पीते/पीतो. आठवड्यातून तीनदा व्यायाम करते/करतो वगैरे. कृपया आपण जे उपाय अमलात आणले असतील तेच विस्तृत रीतीने उधृत करावे.
छान छान टीप्स मिळतील अशी आशा करते.
*गृहशोभिका छाप लेख वाटल्यास क्षमस्व पण खरच मोलाच्या सल्ल्यांच्या अपेक्षेत.
वाचने
49592
प्रतिक्रिया
75
मिसळपाव
प्रतिक्रिया
@जेवढे नॅचरल तेवढे सारे >>>
In reply to हेहेहेहे by अभ्या..
दूरदर्शन
In reply to @जेवढे नॅचरल तेवढे सारे >>> by अत्रुप्त आत्मा
सोप्पंय
In reply to दूरदर्शन by श्रीरंग_जोशी
(No subject)
In reply to प्रेमात पडावं. आपोआप ग्लो by कवितानागेश
माझ्या एका जालीय मैत्रीणिने