सारखे शिंकीत जाशी ...

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
7 Jul 2008 - 3:25 pm

राजा बढे यांच्या चांदणे शिंपीत जाशी...  या गीताने आम्हाला पुर्वी एकदा प्रेरणा दिली होती तेव्हा चाळ ही हदरून जाते ची निर्मिती झाली होती आज आम्हाला पुन्हा एकदा ह्याच गीताने प्रेरणा दिली सारखे शिंकीत जाशी का असे तू चंचले वेंधळी पाहून मुर्ती हासती सारी मुलेवाहते नाकात गंगा ना कटी रूमाल ही  मोकळे नाका करोनी हात पदरा पूसीलेशिंकूनी जीव हा बेजार की पायी हिच्या मी अशा शिंकेवरी, सर्दीवरी वैतागले घे जरा वाफा घशाला झाक अन काया तुझीपाहू दे सर्दीविण मज नाक तूझे मोकळे

विडंबन

प्रतिक्रिया

अमोल केळकर's picture

7 Jul 2008 - 3:30 pm | अमोल केळकर

एकदम छान !
शिंकूनी जीव हा बेजार की पायी हिच्या
मी अशा शिंकेवरी, सर्दीवरी वैतागले

या ओळी मस्त बसल्यात

अमोल

प्राजु's picture

7 Jul 2008 - 3:49 pm | प्राजु

काय जबरा आहे विडंबन.... भन्नाट..!

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

वरदा's picture

7 Jul 2008 - 9:39 pm | वरदा

खूप दिवसानी आलात
मस्तच विडंबन...
सारखे शिंकीत जाशी का असे तू चंचले
वेंधळी पाहून मुर्ती हासती सारी मुले

सह्ही..
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

सर्किट's picture

7 Jul 2008 - 11:16 pm | सर्किट (not verified)

वृत्तातल्या काही क्षुल्लक चुका वगळता, आवडले.

- सर्किट

विसोबा खेचर's picture

7 Jul 2008 - 11:22 pm | विसोबा खेचर

केश्या, झक्कास विडंबन रे..!

मस्त मजा आली वाचताना... :)

बेसनलाडू's picture

8 Jul 2008 - 1:51 am | बेसनलाडू

(वेगळा)बेसनलाडू

पिवळा डांबिस's picture

9 Jul 2008 - 10:03 pm | पिवळा डांबिस

चालू राहू द्या, गुरुदेव!

केशवसुमार's picture

8 Jul 2008 - 5:31 pm | केशवसुमार

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
(आभारी) केशवसुमार

विजुभाऊ's picture

8 Jul 2008 - 5:41 pm | विजुभाऊ

केशुभाई लै दिवसानी फॉर्मात आलाय.....
अवांतरः आर्यांच्या देशात बस्तान नीट बसलेलं दिस्तंय
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

कौस्तुभ's picture

9 Jul 2008 - 4:11 pm | कौस्तुभ

मस्तच जमले आहे! मजा आली