कर्करोग स्तनांचा

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
13 Feb 2013 - 12:39 pm

कर्करोग स्तनांचा
मध्य वयातील वादळ
मध्यवयातील वादळ- पुढे

------------------------

हा एक महत्त्वाचा वाटणारा विषय मी मांडीत आहे.एक डॉक्टर म्हणून मला जे जे सांगायचे आहे ते.खालील लेख हा harrison's text book of medicine याचा संदर्भ घेऊन लिहिला आहे.हा लेख केवळ स्त्रियांसाठी नसून पुरुषांना सुद्धा आपल्या आई, बहिण बायको व मुलगी यांच्या स्वास्थ्यासाठी आणि आरोग्य शिक्षणासाठी उपयुक्त ठरेल असे वाटल्याने लिहित आहे. मी लष्कराच्या कर्करोग केंद्रात ७ वर्षे काम केल्याने आलेल्या अनुभवातून आणि केलेल्या अभ्यासातून लिहित आहे. त्यातील काही वर सध्या उलटसुलट चर्चा चालू आहेत यासाठी वरील संदर्भ देत आहे

स्त्रियांच्या कर्करोगा पैकी ३३% कर्करोग हा स्तनांचा असतो.स्तनात येणाऱ्यागाठी पैकी फक्त १०% कर्करोगाच्या असतात.दुर्दैवाने कर्करोग हा न दुखणारा असल्याने स्त्रिया त्याकडे दुर्लक्ष करतात. शिवाय संकोच भीती आणि काळजी यामुळे रोग तपासणी करण्याऐवजी तो दडवून ठेवण्याकडे काळ असतो. परंतु वाळवी दडवून ठेवल्यावर जसे घर पोखरते तसेच कर्करोग आत वाढत जातो आणि शेवटी रुग्णाचा बळी जातो. प्रत्येक ३५ वर्षा पेक्षा जास्त वयाच्या स्त्रीने स्वतःच्या स्तनाची तपासणी दर महिन्याला करणे हे आवश्यक आहे. प्रत्येक स्त्रीच्या स्तनाची ठेवण (consistency )हि वेगळी असल्याने डॉक्टर ला त्याबद्दल माहिती असणे कठीण आहे. म्हणून प्रत्येक स्त्रीने स्वतः च्या शरीराची माहिती ठेवणे स्वतःच्या प्रकृतीच्या दृष्टीने आवश्यक आहे. वेळ नाही किंवा जमले नाही हि कारणे देऊन कोणाचा फायदा होईल? मासिक पाळीच्या ५-६ दिवसानंतर आंघोळीच्या वेळेस प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या स्तनाची तपासणी करावी आणि आपल्या घराच्या कैंलेन्डेर वर ओम किंवा बाण किंवा श्री अशी दुसर्याला लक्षात येणार नाही अशी खूण करावी म्हणजे प्रत्येक महिन्यात तपासणी झाली आहे कि नाही हे कळेल. जर आपण तपासणी करण्यास विसरला तर जेंव्हा लक्षात येईल तेंव्हा ती करावी.मासिक पाळी च्या ५-६ दिवसांनी करण्याचे कारण असे कि पाळी च्या अगोदर किंवा पाळीच्या दरम्यान स्तन सुजलेले किंवा दुखरे असतात त्यामुळे हि तपासणी व्यवस्थित होत नाही. रजोसमप्ति नंतर महिन्याच्या कोणत्याही दिवशी ठरवून आपण तपासणी करावी. Breast self examination
www.slideshare.net/nashua_08/breast-self-examinationhttp://www.metacafe.com/watch/1310242/how_to_do_a_breast_self_examination/
स्तनाच्या कर्क रोगा बद्दल ची काही उपयुक्त माहिती --
१) बाळाला स्तनपान केल्याने कर्करोग होण्याची शक्यता बरीच कमी होते.
२) गर्भ निरोधक गोळ्या (ORAL CONTRACEPTIVE PILLS) घेतल्याने स्तनाच्या कर्करोगाच्या शक्यतेत कोणतीही वाढ होत नाही. तसेच त्या गोळ्यांनी बीजांड कोश आणी गर्भाशय यांच्या कर्करोगाची शक्यता बरीच कमी होते.या गोळ्यांचे फायदे त्यांच्या तोट्यांपेक्षा नक्कीच खूप जास्त आहेत हे आता सिद्ध झाले आहे.
३) गर्भारपणात स्तनाच्या कर्करोगाची शक्यता १:३००० इतकी असते त्यामुळे त्याकाळात तयार झालेल्या स्तनाच्या गाठीकडे दुर्लक्ष करू नये.
MAMMOGRAPHY हि चाचणी ४० वर्षे वयापासून दर वर्षी केल्यास कर्करोगापासून मृत्यूचे प्रमाण ३०टक्क्यांनी कमी होते. वयाच्या पन्नाशीनंतर तर नक्कीच करावी.
यात स्तनाचे वरून खाली आणि डावीकडून उजवीकडे असे दोन एक्स रे काढले जातात आणि त्यानंतर सतांची सोनोग्राफी केली जाते या दोन्ही चाचण्या एकमेकांना पूरक अश्या आहेत या चा मुंबईतील खर्च २००० रुपये आहे इतर शहरात तो कमी असावा.या दोन्ही चाचण्यांनी कर्करोग सापडण्याची शक्यता ९०% पर्यंत असते एक महत्त्वाची गोष्ठ हि आहे कि कोणतीच चाचणी १००% नाही म्हणूनच स्वतपासणी काराने आवश्यक आहे.
कर्क रोग लक्षात येण्याअगोदर आपल्या शरीरात साधारण ७ वर्षे असतो आणि mammogrphy केल्याने कर्करोग हा साधारण एक ते दीड वर्ष अगोदर लक्षात येतो आणि या वेळेस केवळ गाठ काढून टाकल्यावर रुग्ण पूर्ण बरा होऊ शकतो. जितका आपण उशीर लावू तितका तो रोग पसरण्याची शक्यता असते यासाठी गाठ लक्षात आल्यास ताबडतोब आपल्या कौटुंबिक डॉक्टर किंवा कर्करोग तज्ञाकडे जावे.
अनुवांशिकता --कर्करोग हा बर्यापैकी अनुवांशिक आहे त्यामुळे ज्या स्त्रीयांची जवळच्या(first degree) नातेवाईक स्त्रीला (आई किंवा सख्खी बहिण) स्तनाचा कर्करोग झाला आहे तिला कर्करोग होण्याची शक्यता १० पटींनी वाढते आणि जिच्या जवळच्या दोन नातेवाईक स्त्रिया (आई आणि बहिण किंवा दोन्ही बहिणी )न कर्करोग झाला आहे त्यांना कर्क रोग होण्याची शक्यता १०० पटींनी वाढते. म्हणून जर आपल्या नातेवाईक ला (आई व बहिण)ज्या वयात कर्करोग होतो त्याच्या ५ वर्षे अगोदरपासून mammography करण्यास सुरुवात करावी.उदा. आई ला जर ४० वयाला कर्करोग निदान झाले तर त्या स्त्री ने ३५ व्या वर्षी हि तपासणी सुरु करावी.
हे ज्ञान आपण आपल्या सर्व नातेवाईक मैत्रिणी मित्र यात वाटावे आणि कर्करोगावर विजय मिळवण्यात आपले सह्कार्य करावे हि विनंती.
आपल्यास काही शंका असतील तर मी त्या यथा शक्ती त्यांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करीन.
कृपा करून (second opinion )विचारू नये.अपुर्या माहितीवर उत्तर देणे अशक्य आहे.
आपला कृपाभिलाषी
सुबोध खरे

मुक्तकविचार

प्रतिक्रिया

स्मिता चौगुले's picture

22 Feb 2013 - 9:54 am | स्मिता चौगुले

२०-२५ वय असणार्‍या स्त्रियाणंमधे स्तनाचा कर्करोग होण्याचे प्रमाण किति आहे?
मासिक धर्मादरम्यान कहि स्त्रियाना स्तनात जड्पणा किन्वा दुखणे म्ह्णजे कर्करोगचे कारण अथवा सुरुवात असु शकते का?
या त्रासाचा कालवधी(ज्यात धोका नाही)काय असतो?

हा त्रास होत असेल तर कोणत्या वैदयकीय चाचण्या करुन घ्याव्यात?

स्मिता ताई ,
एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. कर्करोग कधीही दुखत नाही. दुर्दैवाने दुखत नाही म्हणून बहुसंख्य लोक डॉक्टर कडे जात नाही.स्तनात दुखत असेल तर तो कर्करोग नाही हे ९९.९% सत्य आहे तेंव्हा याची काळजी नसावी. राहता राहिली गोष्ट जड पणाची किंवा दुखण्याची.
हा त्रास आपल्या संप्रेरकांच्या(हॉरमोन्स) च्या असमतोला मुळे होणारा प्रश्न आहे. मासिक पाळीच्या अगोदर शरीरातील होर्मोन वाढलेली असतात आणि त्याची पातळी एकदम खाली आल्यामुळे आपणास पाळी येते हे नैसर्गिक चक्र आहे. त्यामुळे पाळीच्या अगोदर शरीरात बऱ्याच प्रमाणात पाणी आणि क्षार हे साठून राहतात त्यामुळे हे जडत्व येते (शरीरात आणि स्तनात) या क्षार आणि पाण्याचा पाळी च्या वेळी निचरा होतो म्हणून पाळी झाल्यानंतर २-३ दिवसांनी हा सर्व त्रास एकदम कमी होतो.याला
Premenstrual syndrome असे म्हणतात
या साठी सोपा उपाय म्हणजे पाळी सुरु होण्याच्या आसपास तेलकट तळलेले पदार्थ कमी करा, भरपूर पाणी प्या, रात्री झोप पूर्ण घ्या सोपा आणि नियमित अस व्यायाम करा.इ जीवनसत्वाच्या गोळ्या घेतल्यास (४०० मिग्रा दिवसात एकदा वा दोन वेळा जेवणानंतर) वरील त्रास कमी होण्यास बरीच मदत होते. इ जीवन सत्व हे evion , E cap इ नावानी मिळतात.कोणत्याही औषधाच्या दुकानात सहज मिळतील.
स्तनात दुखण्यासाठी--या काळात स्तनांना आधार देणे आवश्यक असते स्तनांना सूज आल्याने त्यांच्या आत असणाऱ्या cooper ligament वर ताण पडतो आणि जास्त दुखते. याकडे दुर्लक्ष्य केल्यास नंतर स्तन लोंबू लागतात(pendulous) एक म्हणजे व्यवस्थित फीट होणारी ब्रेसियर वापरणे अतिशय आवश्यक आहे कारण घट्ट किंवा नीट न बसणारी ब्रेसियर जास्त त्रास देऊ शकते.
जास्त दुखत असल्यास एक क्रोसिन किंवा अस्प्रो ची गोळी घेऊ शकता.
अधिक त्रास होत असेल तर त्या साठी आपल्या स्त्रीरोग तज्ञाकडून सल्ला घेणे.

अप्पा जोगळेकर's picture

25 Mar 2013 - 9:25 am | अप्पा जोगळेकर

काही प्रश्न -->
१. रिसेप्टर सेल ही काय भानगड आहे ? केमोथेरपीमधे ही सेल नष्ट झाली नसेल तर पुन्हा कॅन्सर होतो असे ऐकतो. म्हणजे काय ?
२. निरोगी स्त्रीनेसुद्धा वरचेवर जाउन वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी हे अर्थहीन वाटत नाही काय ?
अवांतर -
प्रजनन करत राहणे ही स्त्रीची नैसर्गिक प्रेरणा असल्यामुळे कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स खाणे म्हणजे चक्र उलटे फिरवणे असे ऐकतो आणि यामुळे स्त्रियांना मिश्या येतात हे खरे आहे काय ?

सुबोध खरे's picture

25 Mar 2013 - 1:52 pm | सुबोध खरे

अप्पा साहेब,
रिसेप्टर सेल(ग्रहणशील पेशी) या तुमच्या शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी असतात . आपल्या शरिरास होणाऱ्या संवेदना जाणून घेणे हे या पेशींचे कार्य आहे. म्हणजे त्वचेच्या आत असणाऱ्या स्पर्श ज्ञानाच्या किंवा तापमान जाणणार्या पेशी हे एक उदाहरण आहे पण त्याचा कर्करोगाशी काय संबंध आहे हे मी अजून कोठेही वाचलेले नाही. आपल्याजवळ त्याचा संदर्भ असल्यास कृपया कळवावा म्हणजे मलाही फायदा होईल
निरोगी स्त्रीने वैद्यकीय तपासणी करून घेणे एका विशिष्ट वयापूर्वी (चाळीशी च्या अगोदर) कदाचित उपयुक्त नाही परंतु त्यानंतर केवळ आपल्याला काही होत नाही म्हणून तपासणी न करणे हे धोक्याचे ठरू शकते. आपण वजन रक्तदाब, मधुमेह नियंत्रित ठेवून आणि नियमित व्यायाम करून आणि आहाराची काळजी घेऊन हृदय रोगापासून आपले मोठ्या प्रमाणात संरक्षण करू शकतो परंतु कर्करोगाबाबत दुर्दैवाने असे ठाम कोणतेही प्रतिबंधक उपाय आपल्याला योजता येत नाहीत.
तसेच सडपातळ, रक्तदाब व मधुमेह नसलेल्या आणि नियमित व्यायाम करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा हृदय रोग झालेले वारंवार आपल्या पाहण्यात येतात. त्यामुळे आपण प्रतिबंधक अशा चाचण्या करणे शहाणपणाचे ठरते असे आढळून आले आहे.
अभियांत्रिकी भाषेत दोन तर्हेची देखभाल(maintenance) असते. १)preventive maintenance (प्रतिबंधात्मक देखभाल ) आणि २) breakdown maintenance(सेवा खंडित झाल्यावर केलेली दुरुस्ती/देखभाल) यात कोणती अंतिमतः फायदेशीर ठरते ते आपण जाणताच.
मी लोकांना एकच म्हणतो.डोळे मिटून हम रस्ता(highway) पार करा शंभरात ९०-९५ वेळा आपण पार व्हालच पण ते सुरक्षित आहे कि नाही हे आपणच ठरवा.
गर्भ निरोधक गोळ्या मुळे चक्र उलटे फिरते हे बरोबर नाही. शरीरात जी संप्रेरके तयार होतात तीच संप्रेरके आपण गोळ्यांच्या माध्यमातून देतो त्यामुळे शरीराला संप्रेरके तयार करण्याचे काम थोडे कमी होते. त्याने मासिक पाळी नियमित तर होतेच परंतु गर्भाशयाच्या आणि बीजांड कोशाच्या कर्करोगापासून पण बचाव होतो.त्या गोळ्या घेऊन आपल्याला पाळी थोडीशी (५-६ दिवस) पुढे मागे सहज करता येते हे नियमन त्या स्त्रीच्या हातात राहते. (आपली पाळी नियमित येते हे काय सुख आहे हे स्त्रियांना विचारून पहा)पाळी च्या वेळेस होणारा रक्तस्त्राव खूप कमी झाल्यामुळे anemia (पंडुरोग) पण कमी होतो.
गर्भ निरोधक गोळ्यानचा मिशी येण्याशी काहीही संबंध नाही. ओठावर मिशी/ लव येणे हे स्त्री संप्रेरकांचे पुरुष संप्रेरकात रुपांतर झाल्याने हे होते. हे बहुतांश लठ्ठ स्त्रियांमध्ये दिसते (PCOS -polycystic ovarian syndrome) यामुळे हे होते. PCOS मुळे बर्याच स्त्रियांना मूल होत नाही सुरुवातीला आम्ही planning करीत आहोत असे त्या सांगतात नंतर गोळ्या घेतल्याने मूल होत नाही असे सांगतात त्यामुळे लोकांमध्ये गैरसमज पसरतात.
मूळ कारण लठ्ठ पणा आहे.वजन कमी केले तर पाळी नियमित होते आणि प्रसवशक्ति(fertility) पण सुधारते. पण वजन कमी करणे एवढे सोपे असते तर VLCC वगैरेंचा व्यवसाय एवढा फोफावला नसता.
No situation in life is so bad that it cant be blamed on some one else. .

अप्पा जोगळेकर's picture

25 Mar 2013 - 2:38 pm | अप्पा जोगळेकर

माझा आणि वैद्यक शास्त्राचा परिचय नाही. त्यामुळे रिसेप्टर सेल बद्दल ज्या डॉक्टर मित्राकडून ऐकले त्याच्याशी संपर्क करुनच मी उत्तर देउ शकेन.
बाकीच्या तपशीलवार माहितीबद्दल आभारी आहे. काही गैरसमज दूर झाले.

बहुगुणी's picture

2 Apr 2013 - 7:44 am | बहुगुणी

अप्पा जोगळेकरः

'केमोथेरपीमधे ही सेल नष्ट झाली नसेल तर पुन्हा कॅन्सर होतो' अशा वर्णनावरून आपल्याला रिसेप्टर सेल ऐवजी कर्करोगाच्या मूळ पेशी (cancer stem cell) अभिप्रेत असेल असं वाटतं, याविषयी आधिक माहिती इथे मिळेल. आपल्या इतर दोन प्रश्नांना डॉक्टर खर्‍यांनी यथोचित उत्तरे दिली आहेतच.

पिलीयन रायडर's picture

4 Feb 2016 - 6:42 pm | पिलीयन रायडर

मी म्हणणार होते की सरांनी हा धागा नजरेखालुन घालावा आणि सगळं नीट लिहीलय ना ते तपासुन घ्यावं.. पण सरच ते!

इतर पामरांसाठी वर आणतेय.. इथे चर्चा होऊ शकते ना सर?

संदीप डांगे's picture

4 Feb 2016 - 6:45 pm | संदीप डांगे

सनी लियोनच्या अस्तित्त्वाला उरोजाच्या कर्करोगाच्या विळख्यातून सोडवल्याबद्दल पिरातैचे जाहीर आभार

- शुभेच्छुक: मेगाबायटीप्रतिसादमंडळाचे सगळे सक्रिय कार्यकर्ते.

पिलीयन रायडर's picture

4 Feb 2016 - 6:50 pm | पिलीयन रायडर

तुमच्या धाग्याला एवढा वेळ वर ठेवला.. एवढा ट्यार्पी दिला त्याचं काही कौतुकच नाही तुम्हाला..!!

संपादक मंडळ.. तिकडची चर्चा इकडे हलवता येईल का? खरे काकांचा धागा पळवु आता आपण..

पण सर उत्तर का देत नसावेत..? आम्हा अज्ञानी जनांचे काय?

संदीप डांगे's picture

4 Feb 2016 - 7:40 pm | संदीप डांगे

ओ तै, धन्यवादच है की त्यो! तुम्ही कोणत्या तरी झाडाचा कसला तरी पाला खाऊ घातला, कूनीतरी गप्प बसण्यासाठी म्हणे! पेटंट घ्या त्येचं. .

ज्ञ कसा लिहितात राव ? हा तर कॉपि करुन आणलाय.

पिलीयन रायडर's picture

4 Feb 2016 - 6:51 pm | पिलीयन रायडर

jn - ज्ञ

ईश्वरसर्वसाक्षी's picture

4 Feb 2016 - 6:48 pm | ईश्वरसर्वसाक्षी

सुटलि बिचारी...

ईश्वरसर्वसाक्षी's picture

4 Feb 2016 - 6:50 pm | ईश्वरसर्वसाक्षी

हम तेरे दर पे सनम रोज आयेंगे
घंटी बजायेंगे और भाग जायेंगे :)

संक्षि नाहि येणार हिकड, लिहुन घ्या.

ईश्वरसर्वसाक्षी's picture

4 Feb 2016 - 7:08 pm | ईश्वरसर्वसाक्षी

ओ महर्षि...कुठ गेलासा...यावा कि

संक्षी एक गंभीर सल्ला - तुम्ही बोलला आहात ते पेपर्स पब्लिश करून सिद्ध करा.

एक नोबेल पुरस्कार नक्की मिळेल.

पिलीयन रायडर's picture

5 Feb 2016 - 12:00 pm | पिलीयन रायडर

पेपर? तिकडे साधे सोपे प्रश्न विचारलेत तर "माझे पेपर्स पब्लिश होण्यापेक्षा कुणाला स्वतःचं अंतर्गत द्वंद्व सोडवायला मदत झाली तर ते जास्त उपयोगी होईल" असं उत्तर दिलय...

पेपर वगैरे लिहायचे म्हणलं की हे सगळं सिद्ध करावं लागेल ना.. इथे बोलणं किती सोप्पं आहे.. कुणी जास्त प्रश्न विचारले की वैयक्तिक होऊ नका म्हणायचं.. मुळात विचारलेल्या प्रश्नाचेच उत्तर प्रतिसादात द्यायचे असा नियम नाही ना मिपावर..

पण तरीही एखाद दुसरा नोबेल द्यायला माझी ना नाही!

बास एक ?