✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कर्करोग स्तनांचा

स
सुबोध खरे यांनी
Wed, 02/13/2013 - 12:39  ·  लेख
लेख
कर्करोग स्तनांचा मध्य वयातील वादळ मध्यवयातील वादळ- पुढे ------------------------ हा एक महत्त्वाचा वाटणारा विषय मी मांडीत आहे.एक डॉक्टर म्हणून मला जे जे सांगायचे आहे ते.खालील लेख हा harrison's text book of medicine याचा संदर्भ घेऊन लिहिला आहे.हा लेख केवळ स्त्रियांसाठी नसून पुरुषांना सुद्धा आपल्या आई, बहिण बायको व मुलगी यांच्या स्वास्थ्यासाठी आणि आरोग्य शिक्षणासाठी उपयुक्त ठरेल असे वाटल्याने लिहित आहे. मी लष्कराच्या कर्करोग केंद्रात ७ वर्षे काम केल्याने आलेल्या अनुभवातून आणि केलेल्या अभ्यासातून लिहित आहे. त्यातील काही वर सध्या उलटसुलट चर्चा चालू आहेत यासाठी वरील संदर्भ देत आहे स्त्रियांच्या कर्करोगा पैकी ३३% कर्करोग हा स्तनांचा असतो.स्तनात येणाऱ्यागाठी पैकी फक्त १०% कर्करोगाच्या असतात.दुर्दैवाने कर्करोग हा न दुखणारा असल्याने स्त्रिया त्याकडे दुर्लक्ष करतात. शिवाय संकोच भीती आणि काळजी यामुळे रोग तपासणी करण्याऐवजी तो दडवून ठेवण्याकडे काळ असतो. परंतु वाळवी दडवून ठेवल्यावर जसे घर पोखरते तसेच कर्करोग आत वाढत जातो आणि शेवटी रुग्णाचा बळी जातो. प्रत्येक ३५ वर्षा पेक्षा जास्त वयाच्या स्त्रीने स्वतःच्या स्तनाची तपासणी दर महिन्याला करणे हे आवश्यक आहे. प्रत्येक स्त्रीच्या स्तनाची ठेवण (consistency )हि वेगळी असल्याने डॉक्टर ला त्याबद्दल माहिती असणे कठीण आहे. म्हणून प्रत्येक स्त्रीने स्वतः च्या शरीराची माहिती ठेवणे स्वतःच्या प्रकृतीच्या दृष्टीने आवश्यक आहे. वेळ नाही किंवा जमले नाही हि कारणे देऊन कोणाचा फायदा होईल? मासिक पाळीच्या ५-६ दिवसानंतर आंघोळीच्या वेळेस प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या स्तनाची तपासणी करावी आणि आपल्या घराच्या कैंलेन्डेर वर ओम किंवा बाण किंवा श्री अशी दुसर्याला लक्षात येणार नाही अशी खूण करावी म्हणजे प्रत्येक महिन्यात तपासणी झाली आहे कि नाही हे कळेल. जर आपण तपासणी करण्यास विसरला तर जेंव्हा लक्षात येईल तेंव्हा ती करावी.मासिक पाळी च्या ५-६ दिवसांनी करण्याचे कारण असे कि पाळी च्या अगोदर किंवा पाळीच्या दरम्यान स्तन सुजलेले किंवा दुखरे असतात त्यामुळे हि तपासणी व्यवस्थित होत नाही. रजोसमप्ति नंतर महिन्याच्या कोणत्याही दिवशी ठरवून आपण तपासणी करावी. Breast self examination www.slideshare.net/nashua_08/breast-self-examinationhttp://www.metacafe.com/watch/1310242/how_to_do_a_breast_self_examination/ स्तनाच्या कर्क रोगा बद्दल ची काही उपयुक्त माहिती -- १) बाळाला स्तनपान केल्याने कर्करोग होण्याची शक्यता बरीच कमी होते. २) गर्भ निरोधक गोळ्या (ORAL CONTRACEPTIVE PILLS) घेतल्याने स्तनाच्या कर्करोगाच्या शक्यतेत कोणतीही वाढ होत नाही. तसेच त्या गोळ्यांनी बीजांड कोश आणी गर्भाशय यांच्या कर्करोगाची शक्यता बरीच कमी होते.या गोळ्यांचे फायदे त्यांच्या तोट्यांपेक्षा नक्कीच खूप जास्त आहेत हे आता सिद्ध झाले आहे. ३) गर्भारपणात स्तनाच्या कर्करोगाची शक्यता १:३००० इतकी असते त्यामुळे त्याकाळात तयार झालेल्या स्तनाच्या गाठीकडे दुर्लक्ष करू नये. MAMMOGRAPHY हि चाचणी ४० वर्षे वयापासून दर वर्षी केल्यास कर्करोगापासून मृत्यूचे प्रमाण ३०टक्क्यांनी कमी होते. वयाच्या पन्नाशीनंतर तर नक्कीच करावी. यात स्तनाचे वरून खाली आणि डावीकडून उजवीकडे असे दोन एक्स रे काढले जातात आणि त्यानंतर सतांची सोनोग्राफी केली जाते या दोन्ही चाचण्या एकमेकांना पूरक अश्या आहेत या चा मुंबईतील खर्च २००० रुपये आहे इतर शहरात तो कमी असावा.या दोन्ही चाचण्यांनी कर्करोग सापडण्याची शक्यता ९०% पर्यंत असते एक महत्त्वाची गोष्ठ हि आहे कि कोणतीच चाचणी १००% नाही म्हणूनच स्वतपासणी काराने आवश्यक आहे. कर्क रोग लक्षात येण्याअगोदर आपल्या शरीरात साधारण ७ वर्षे असतो आणि mammogrphy केल्याने कर्करोग हा साधारण एक ते दीड वर्ष अगोदर लक्षात येतो आणि या वेळेस केवळ गाठ काढून टाकल्यावर रुग्ण पूर्ण बरा होऊ शकतो. जितका आपण उशीर लावू तितका तो रोग पसरण्याची शक्यता असते यासाठी गाठ लक्षात आल्यास ताबडतोब आपल्या कौटुंबिक डॉक्टर किंवा कर्करोग तज्ञाकडे जावे. अनुवांशिकता --कर्करोग हा बर्यापैकी अनुवांशिक आहे त्यामुळे ज्या स्त्रीयांची जवळच्या(first degree) नातेवाईक स्त्रीला (आई किंवा सख्खी बहिण) स्तनाचा कर्करोग झाला आहे तिला कर्करोग होण्याची शक्यता १० पटींनी वाढते आणि जिच्या जवळच्या दोन नातेवाईक स्त्रिया (आई आणि बहिण किंवा दोन्ही बहिणी )न कर्करोग झाला आहे त्यांना कर्क रोग होण्याची शक्यता १०० पटींनी वाढते. म्हणून जर आपल्या नातेवाईक ला (आई व बहिण)ज्या वयात कर्करोग होतो त्याच्या ५ वर्षे अगोदरपासून mammography करण्यास सुरुवात करावी.उदा. आई ला जर ४० वयाला कर्करोग निदान झाले तर त्या स्त्री ने ३५ व्या वर्षी हि तपासणी सुरु करावी. हे ज्ञान आपण आपल्या सर्व नातेवाईक मैत्रिणी मित्र यात वाटावे आणि कर्करोगावर विजय मिळवण्यात आपले सह्कार्य करावे हि विनंती. आपल्यास काही शंका असतील तर मी त्या यथा शक्ती त्यांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. कृपा करून (second opinion )विचारू नये.अपुर्या माहितीवर उत्तर देणे अशक्य आहे. आपला कृपाभिलाषी सुबोध खरे
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
48268 वाचन

💬 प्रतिसाद (108)

प्रतिक्रिया

अजुन एक ईटरेस्टींग गोष्ट,

शैलेन्द्र
गुरुवार, 02/14/2013 - 13:43 नवीन
अजुन एक ईटरेस्टींग गोष्ट, आपण इंसुलीन चालु करतो, पण शेवटी इंसुलीन हे ग्रोथ हार्मोन आहे. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त, न वापरलेले इंसुलीन अपोप्टोसीस (पेशींचे नियंत्रित मरण) यात गडबड करते, ज्यामुळे कर्करोग होवू शकतो.. होता होईल तितका शरिराचा इंसुलीन प्रतिरोध कमी करणे चांगले या मताला हल्ली लोक पोहचतायेत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

एक मेथडॉलॉजी म्हणून पाहा

संजय क्षीरसागर
गुरुवार, 02/14/2013 - 14:19 नवीन
इन्सुलिन घेतल्यामुळे स्वादुपिंड निकामी होत नाही तर स्वादुपिंड निकामी झाल्यामुळे इन्सुलिन घ्यावे लागते. ज्यावेळी गोळ्यांचा पूर्ण डोस घेऊनही रक्तातील साखर नियंत्रणात राहत नाही तेंव्हा नाईलाजाने इन्सुलिन चालू करावे लागते
एकदा इंशुलिन घ्यायला सुरूवात केली की ग्रंथी अकार्यक्षम व्ह्यायला सुरूवात होते. कारण त्यांच काम एक्स्टर्नली घेतलेलं इंशुलिन करतं. इंशुलिनचा डोस वाढवत न्यावा लागतो आणि पुढे इंजेक्शनपर्यंत स्थिती येते. माझा अनुभव सांगतो. थकवा येतो म्हणून डॉक्टरनं मला ब्लडशुगर करायला सांगितली होती (हिस्ट्री होतीच). त्याऐवजी मी वज्रासनात बसून कपाळ जमीनीवर टेकवणे, कपालभाती सारखे प्राणायम आणि सुप्तवज्रासनात अ‍ॅबडॉमिनल मसाज (याचा मला कसा शोध लागला कल्पना नाही) एकदम नित्यनेमानं सुरू केलं. त्यातनं, रेस्पिरेशन, सर्क्युलेशन आणि डायजेशन या तीन प्रणाली उत्तम तर आरोग्य उत्तम हा शोध लागला. आज या घटनेला दहा/बारा वर्ष होऊन गेली. मी कोणतही पथ्य पाळत नाही. एकही टेस्ट करत नाही. उत्तम प्लेक्सिबिलीटीमुळे कायम उत्साह. प्राणायम, योगा आणि खेळामुळे जोमदार रेस्पिरिटी. त्यामुळे बीपी, हार्ट असल्या कोणत्याही भानगडीची शक्यता शून्य. आणि सर्वांचा परिणाम म्हणजे शरीर कायम स्वस्थ! आता या बॅकग्राऊंडवर माझे सगळे मित्र जे रेग्युलर चेक-अप वगैरेच्या नादी लागले ते कायमचे चेक-अप आणि औषधांच्या चक्रात अडकलेत. दोघांच्या तर बायपास झाल्यात. आता माझी पहिली कमेंट वाचा. गविनं त्याचा भलताच अर्थ (`कंपल्सरी मुलं जन्माला घालत राहून स्तनपान करवत राहणे') काढला आहे. वॉट आय मीन टू से, जसं पँकरीअस अकार्यक्षम न होऊ देणं (किंवा त्या पुन्हा कार्यक्षम करणं) हे इंशुलीन घेण्यापेक्षा श्रेयस आहे तसं ब्रेस्ट कॅन्सरच्या बाबतीत काही करता येईल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

आता माझी पहिली कमेंट वाचा.

गवि
गुरुवार, 02/14/2013 - 15:15 नवीन
आता माझी पहिली कमेंट वाचा. गविनं त्याचा भलताच अर्थ (`कंपल्सरी मुलं जन्माला घालत राहून स्तनपान करवत राहणे') काढला आहे.
आँ? मला तर वाटलं की मी उलट छोटा सांकेतिक प्रतिसाद इंटरप्रीट करायला मदत करतो आहे. स्तनाचा नैसर्गिक उपयोग बाळासाठी दुग्धोत्पादन याकरिता असतो. अन्य कोणताही उपयोग केला तर तो नैसर्गिक उपयोग, अतएव "यूज इट ऑर लूज इट" तत्वाशी सुसंगत उपयोग ठरणार नाही अशी माझी समजूत आहे. उलट मुद्दा इंटरप्रीट करुन झाल्यावर त्यात तथ्य असू शकेल (पक्षी: स्तनपान न करवणार्‍या स्त्रियांमधे हा धोका अधिक असू शकतो हे कदाचित वैद्यकीय सत्य असू शकेल) हे मी मान्य करुन फक्त त्यातली अव्यवहार्यता सुचवली. स्तनपानासाठी स्तनाचा उपयोग एका बाळाच्या बाबतीत मर्यादित काळच करता येतो. अर्थात हा नैसर्गिक उपयोग दीर्घकाळ करायचा (सो दॅट डिसयूज डज नॉट एंड अप इन लॉस) तर ठराविक काळाने मूल जन्माला आले पाहिजे (स्वतःला मूल झाल्यावरच दुग्धनिर्मिती होत असल्याने दत्तक मुलांचा उपयोग नाही..) वगैरे.. अशी पुढे फक्त माझ्या मताची नोंद केली. भलताच अर्थ काढण्याचा उद्देश नाही. दीर्घ स्पष्टीकरण समाप्त.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

दीर्घ प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

संजय क्षीरसागर
गुरुवार, 02/14/2013 - 18:30 नवीन
पण उपाय प्रदीर्घ आहे इतकेच सांगून ११ शब्द संपवतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

धन्यवाद साहेब!

नगरीनिरंजन
Fri, 02/15/2013 - 07:54 नवीन
धन्यवाद साहेब! अनुवंशिकतेच्या तुमच्या मुद्द्याला अनुमोदन देणारी बातमी आजच आलीय पेपरमध्ये. आता लवकरात लवकर जीनथेरपीचे तंत्रज्ञान विकसित झाले पाहिजे म्हणजे अनुवंशिकतेतून येणारे हे गुणसूत्रांमधले दोष दूर करता येतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

प्रश्न असा आहे की आपण या

शैलेन्द्र
Fri, 02/15/2013 - 19:30 नवीन
प्रश्न असा आहे की आपण या सगळ्याशी किती खेळणार? मानवी शरीराच्या ब्ल्यु प्रिंटचेच संपादन करणे किंवा कट पेस्ट करणे अतिशय धोकादायक आहे.. सगळे आजार आपण बरे करु शकत नाही आणि मृत्यु ही अनिवार्यता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

मृत्यु ही अनिवार्यता आहे

नगरीनिरंजन
Sat, 02/16/2013 - 07:42 नवीन
मृत्यु ही अनिवार्यता आहे आहे असं उघडपणे म्हणू नका साहेब, नाहीतर मॉडर्न मेडिसिनच काय संपूर्ण मानवी सिव्हिलायझेशन जस्टिफाय करणे अवघड होऊन बसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

.. मृत्युपासुन तात्पुरती

शैलेन्द्र
Sun, 02/17/2013 - 18:31 नवीन
:) .. मृत्युपासुन तात्पुरती सुटका आपण कोणती किंमत मोजून करवून घेणार हा प्रश्न आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

मृत्यू पासून सुटका

सुबोध खरे
Mon, 02/18/2013 - 00:08 नवीन
पिकले पान गळून पडणार हे कितीही सत्य असले तरी आपल्या आई आणि वडिलांच्या बाबतीत हे सत्य स्वीकारणे फार फार कठीण असते --ग दि माडगूळकर. आपल्या अत्यंत जवळच्या नातेवाईकाबद्दल कोणाचीही कितीही किंमत मोजण्याची तयारी असते. म्हणूनच कर्करोग झाल्यास वेळेत उपचार करून आपल्या आणि आपल्या कुटुंबाचा बचाव करावा.त्यासाठी त्याबद्दल ज्ञान वाटणे/पसरविणे हे महत्त्वाचे आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

डॉक्टरसाहेब, माझे उत्तर

शैलेन्द्र
Mon, 02/18/2013 - 18:53 नवीन
डॉक्टरसाहेब, माझे उत्तर तुम्ही चुकीच्या संदर्भात पाहताय. कॅन्सरचं नव्हे तर कोणत्याही रोगावर वेळेत व पुर्ण उपचार मिळणे हा मुलभूत मानवी अधिकार आहे. प्रश्न हा आहे की हे उपचार करताना मानवी शरीराची, ब्लुप्रिंट, म्हणजे त्याचा "जिनोम" त्याला छेडावे का? आपल्याला अजुन या रोगांमागचा त्यामागचा कार्यकरणभाव उमगत नाहीये, जे निव्वळ आनुवंशिकतेतून पसरतात. असं काय कारण असावं की निसर्गाने असे कॉम्बीनेशन्स उत्क्रांतीच्या प्रक्रियेतही तसेच ठेवले. कदाचित निसर्गाच्या दृष्टीने या चुका असाव्यात, व त्या पुढच्या पिढीत संक्रमित होवू नये म्हणुन निसर्ग त्या दुर करत असावा.. मानवी शरीरातला एकही रेणु विनाकारण नसतो हे तर तुम्हीही मान्य कराल, मग ही अशी चुक पेशीत का घडते? माझा विरोध जिन थेरपीला मुख्यतः दोन कारणांसाठी आहे, एक तर तुम्ही सोमॅटीक थेरपी द्याल तेंव्हा कुठलीतरी जिन (किंवा आर एन ए) तुम्ही मास्क कराल, पण फक्त तितकीच जीन मास्क होईल याचा काय भरवसा? जर्म लाईन ट्रीट्मेंट हा तर अजूनच मोठा घोळ आहे, कधितरी निवांत लिहील त्याबद्दल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

पेशंट स्त्रीयांना अशा चाचण्या

रेवती
Wed, 02/13/2013 - 23:22 नवीन
पेशंट स्त्रीयांना अशा चाचण्या करायला उत्तेजन देतात का? उत्तेजन देत नसावेत असे वरवर पाहता दिसते. मी दोन चार ओळखीच्या बायकांना विचारले तर त्यांना हा काय प्रकार असतो तेच माहित नव्हते. एवढेच नव्हे तर त्यांची बाळंतपणे होऊन गेल्यावर वर्षानुवर्षे त्यांच्या कोणत्याही चाचण्या झाल्या नाहीत, त्यांची गरज आहे का?/ का आहे? हेही त्यांना माहित नव्हते. या सगळ्या उच्चशिक्षित, उच्चमध्यमवर्गीय स्त्रीया आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

चाचण्या

सुबोध खरे
Wed, 02/13/2013 - 23:50 नवीन
दुर्दैवाने आपले कुटुंबाचे डॉक्टर आजच्या आपल्या ज्ञानास अद्ययावत ठेवण्याचे फारसे प्रयत्न ठेवीत नाहीत हे कटू परंतु सत्य आहे. सैन्यात आम्हाला दर सात वर्षांनी २ किंवा ३ आठवड्याचा उजळणी कोर्स करण्यासाठी ए एफ एम सी पाठवत असत तेथे आतापर्यंत काय काय नवीन ज्ञान उपलब्ध आहे ते शिकवले जात असे आणि त्यानंतर त्याची परीक्षा घेतली जाते. या परीक्षेतील गुण हे आपल्या पुढच्या बढती साठी मोजले जातात त्यामुळे सैन्यात डॉक्टराना ज्ञान अद्ययावत ठेवणे भाग पडते.सैन्यातून निवृत्त झाल्यावर बाहेर अशा तर्हेची कोणतीही पद्धत रूढ दिसत नाही त्यामुळे फक्त तज्ञ डॉक्टर आपापल्या विषयाचे ज्ञान अद्ययावत करताना आढळतात आणि त्यामुळे त्यानच्या आणि फामिली डॉक्टरांच्या ज्ञानातील तफावत वाढताना दिसते. यामुळेच आज वरील परिस्थिती उद्भवताना दिसते. यावर सोपा उपाय मला आज तरी दिसत नाही. आपण आपल्या कारचा महिन्याचा हप्ता भारत असतो म्हणून त्याची वेळेवर तेलपाणी इ.(सर्विसिंग) केले जाते. आपल्या शरीराचा कोणताही हप्ता न भरल्याने (किंबहुना आपल्याला शरीर परमेश्वरा कडून फुकट मिळाल्यामुळे) त्याबद्दल चालढकल होत असते. मग स्त्रियाना हे संकोचाचे किंवा अडचणीचे वाटते. आणि जेवढे आवश्यक आहे तेवढाच विचार करावा या विचारसरणीमुळे काय करायचे आहे आपल्याला जेंव्हा गरज पडेल तेंव्हा बघू .या वृत्तीमुळे उच्च वर्गातील स्त्रिया सुद्धा या विषयात उदासीन दिसतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

थोडी माहिती.

आनंदी गोपाळ
Fri, 02/15/2013 - 19:51 नवीन
सैन्यातून निवृत्त झाल्यावर बाहेर अशा तर्हेची कोणतीही पद्धत रूढ दिसत नाही त्यामुळे फक्त तज्ञ डॉक्टर आपापल्या विषयाचे ज्ञान अद्ययावत करताना आढळतात आणि त्यामुळे त्यानच्या आणि फामिली डॉक्टरांच्या ज्ञानातील तफावत वाढताना दिसते. यामुळेच आज वरील परिस्थिती उद्भवताना दिसते. यावर सोपा उपाय मला आज तरी दिसत नाही.
डॉ. सुबोध, माफ करा, आपल्यातले काही आळशी लोक स्वतःचे ज्ञान अद्ययावत करण्याचे कष्ट घेत नसतील तर, सर्वच डॉक्टरांवर ज्ञान अद्ययावत करण्याचे 'कंपल्शन' ऑलरेडी करण्यात आलेले आहे, व ही चांगली गोष्ट आहे, हे आपल्या व येथील सर्वांच्याच माहीतीसाठी इथे देवू इच्छीतो. सैन्यातून निवृत्तीनंतर आपण महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलकडे नोंदणी केली आहे काय? सध्या मेडीकल काऊन्सिल च्या नोंदणी नूतनीकरणासाठी दर वर्षी ६ सीएमई क्रेडीट पॉईंट कंपल्सरी करण्यात आलेले आहेत. एक संपूर्ण दिवसाचा वर्कशॉप, ज्यात ६ तासांचे करंट मेडिकल एज्युकेशन (सीएमई) असलेले, व वक्ते अ‍ॅक्रेडिटेड बाय एमएमसी असतील तर १ सीएमई पॉइंट मिळतो. असे ६ पॉईंट प्रत्येक वर्षी हवेत. महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिल रजिस्ट्रेशन शिवाय महाराष्ट्रात वैद्यकीय व्यवसाय करता येत नाही. दर ५ वर्षी लायसेन्स रिन्यू with 30 CME points. गेल्या वर्षी ज्यांचे नूतनीकरण होते, त्यांना १२ पॉइंट आवश्यक होते. कारण २०१० पासून ही योजना कार्यान्वित झाली. -त्या आधी एम.एम.सी. (महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिल) प्रशासकाच्या ताब्यात असून डीफन्क्ट होती.- सदर नूतनी करण व सीएमई क्रेडीट सर्व प्रकारच्या मॉडर्न मेडिसिन डॉक्टरांसाठी अनिवार्य आहे. म्हणजेच शिकत रहाणे आवश्यक. सीसीआयएम - सेंट्रल काऊन्सिल फॉर इंडियन मेडिसिन, जिच्या अखत्यारीत आयुर्वेद व होमिओ, युनानी हे लोक येतात, त्यांनीही अशा प्रकारचा निर्णय घेतलेला असल्याचे ऐकिवात आले, परंतू इम्प्लिमेंटेशन पहाण्यात आलेले नाही. मॉडर्न मेडीसिनच्या कंटीन्यूड मेडीकल एज्युकेशन व रजिस्ट्रेशन रिन्युअल बद्दलची अधिक माहिती महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलच्या नव्या वेबसाईटवर पहायला मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

स्वयंसंपादन नसल्याने नवा पुरवणी प्रतिसाद :

आनंदी गोपाळ
Fri, 02/15/2013 - 19:55 नवीन
ता. क. : सीएमई क्रेडीटसाठी अटेंड केलेले वर्कशॉप, कॉन्फरन्स इ. जर फार्मा कंपनी कडून स्पॉन्सर असतील, तर त्या ठिकाणी कितीही उच्च शिक्षण घेतले, तर त्यास प्वाइंट मिळत नाहीत ;) म्हणजेच, कंपनीच्या खर्चाने ट्रिप करून आले अन खोटे खोटे सर्टिफिकेट घेतले असे करता येत नाही. याचे इम्प्लिमेंटेशन बरेच कडक आहे. - (आनंदी) डॉ. गोपाळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

नोंदणीकरण

सुबोध खरे
Fri, 02/15/2013 - 20:25 नवीन
डॉक्टर साहेब माझे महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलकडे १९८७ सालीच नोंदणीकरण आहे आणि त्यानंतर माझे अधिक पदवीचे क्षकिरण तज्ञ म्हणून सुद्धा नोंदणीकरण आहे. माझे नोंदणीकरण अद्ययावत असून ते २०१७ पर्यंत केलेले आहे. दर वर्षी मी IMA ची विविध विषयांची व्याख्यानाला जात असतो त्याशिवाय IRIA (इंडियन रेडियोलोजिकल असो) च्या ४ दिवसाच्या CME दर वर्षी जातो त्यामुळे पुनरनोंदणीकरणाच्या वेळेस माझ्याकडे १२ ऐवजी ३६ points होते.शिवाय मी जेव्हा वक्ता म्हणून जातो तेंव्हा त्याचे २ points वेगळे मिळतात. मुद्दा फक्त व्याख्यानाला हजर राहण्याचा नाही. त्याबरोबर देण्यात येणारे ज्ञान आत्मसात करण्याचा आहे. हि आधुनिक वैद्यकशास्त्राची परिस्थिती आहे. आयुष (आयुर्वेदिक, युनानी, सिद्ध आणि होमिओपथी) ला अशी कोणतीही आत नाही त्यामुळे त्यांची परिस्थिती बोलूच नये. या CME चा हेतू अत्यंत स्तुत्य आहे परंतु आपली भारतीय पद्धती पाहता लोक प्रत्यक्ष हजार असतात पण मानसिक दृष्ट्या फक्त ५०% तेथे असतात. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

+१

विकास
Fri, 02/15/2013 - 20:58 नवीन
सहमत. लोकशिक्षण देणे गरजेचे आहे. मला होत असेल का याची कल्पना नाही, पण जसे पुर्वी कुटूंबनियोजन, एल आय सी वगैरेच्या संदर्भात खूप चांगल्या जाहीराती सरकार सतत दाखवत असे, त्याचा अंशतः परीणाम झाला आहे. तसे काही या संदर्भात होते का? (वार्षिक चाचणी वगैरे?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

हम्म

विकास
Fri, 02/15/2013 - 21:02 नवीन
मॉडर्न मेडीसिनच्या कंटीन्यूड मेडीकल एज्युकेशन व रजिस्ट्रेशन रिन्युअल बद्दलची अधिक माहिती महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलच्या नव्या वेबसाईटवर पहायला मिळेल.
उत्साहाने ते संस्थळ बघायला गेलो आणि होमपेजवर महत्वपूर्ण वाक्य दिसले:

This site is now discontinued

:(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

कर्क रोग

अनिवासि
Wed, 02/13/2013 - 20:58 नवीन
खर तर धाग्याशी सरळ सम्बध नाही पण आजचा दिवसच असा निघाला आहे की लिहिल्याशिवाय राहवत नाही. माझ्या एका मैत्रीणिला ३ एक वर्षापुर्वी नेहिमिच्या रुटीन तपासणीत स्तनाचा कर्क रोग असल्य्याचे कळले आणि यथाअवकाश तो स्तन कापावा लागला. त्या वेळची आणि नतरची तिची स्थीति पाहुन वाईट वाटत होते पण कोण काय करणार? दोन आठवड्यापुर्वी ती परत hospital मध्ये तपासणीस गेली. काल निकाल येणार होते. रात्री व आज सकाळी तिचे फोन आले पण दुर्दैवानी मला घेता आले नाहीत. मशीन वर निरोपः गर्भाशयाचा कर्क रोग झाला आहे. सकाळ्पासुन फोन करावयाचा प्रयत्न करत आहे- बहुतेक hospital मध्ये, मिपावर आलो आणि हा धागा पाहीला आणि मन मोकळे करुन घेतले. सतत काळजी घेणे किती महत्वाचे आहे हे सुबोध रावानी सान्गितलेच आहे- follow करा
  • Log in or register to post comments

अतिशय स्पष्ट शब्दात अन

स्पंदना
गुरुवार, 02/14/2013 - 05:53 नवीन
अतिशय स्पष्ट शब्दात अन व्यवस्थीत लिहिलेला लेख! माहीती आवडली. विशेषतः कर्क रोग डिटेक्ट व्हायच्या आधी सात वर्षे आपल्या शरीरात असतो हे वाचुन तर उडालेच मी.
  • Log in or register to post comments

खुप छान माहीती !!!!

रुप्स
गुरुवार, 02/14/2013 - 07:48 नवीन
खुप छान माहीती !!!! ईथे सुद्धा (ऑस्ट्रेलियात) दर २ वर्षानी पॅस्पस्मिअर टेस्ट करायला सांगतात, म्ह्णजे तसं पत्रच येते घरी (रिंमायडर म्हणून).
  • Log in or register to post comments

अतिशय उत्त्तम लेख व तितकाच

शैलेन्द्र
गुरुवार, 02/14/2013 - 09:51 नवीन
अतिशय उत्त्तम लेख व तितकाच महत्वाचा विषय.. मॅमोग्राफी या थोड्याशा वेदनादायी व कठीण प्रकाराऐवजी www.breastlight.com हे उपकरण प्रत्येक स्त्रीरोग तज्ञाने जवळ ठेवायला हवे.. भारतात अवघ्या १०००० रुपयात हे उपलब्ध आहे..
  • Log in or register to post comments

breastlight

सुबोध खरे
गुरुवार, 02/14/2013 - 10:03 नवीन
साहेब breastlight हे mammography च्या ऐवजी वापरण्याचे उपकरण नसून ते स्वयं तपासणीला(breast self examination)ला पूरक असे आहे. ते उपकरण बनवणार्या कंपनीच्या वेबसाईट वर तसे स्पष्ट म्हणले आहे. कृपया या दोन मध्ये गल्लत करू नये. mammography हि बर्याच कालपासून सिद्ध झालेली चाचणी आहे आणि जोवर एखादी चाचणी त्यापेक्षा जास्त चांगली आहे हे सिद्ध होत नाही तोवर वापरणे धोक्याचे ठरू शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

मान्य.. ऐवजी या शब्दापेक्षा

शैलेन्द्र
गुरुवार, 02/14/2013 - 13:45 नवीन
मान्य.. ऐवजी या शब्दापेक्षा पुरक हा शब्द योग्य.. प्राथमिक तपासणीसाठी ही एक चांगली सोय ठरु शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

खुप छान लेख..

पिलीयन रायडर
गुरुवार, 02/14/2013 - 19:42 नवीन
खुप छान लेख.. एक प्रश्न.. आपण जर बर्‍याच हॉस्पिटल चे "फुल बॉडी चेक अप पॅकेजेस" पाहिले तर त्यात बर्‍याच अनावश्यक टेस्टही दिसतात. तर नक्की ३५-४० नंतर स्त्रियांनी कोण्-कोणत्या टेस्ट करुन घेणे आवश्यक आहे?
  • Log in or register to post comments

सुंदर धागा ... एकदम बॅलन्स्ड

जेनी...
गुरुवार, 02/14/2013 - 22:08 नवीन
सुंदर धागा ... एकदम बॅलन्स्ड चर्चा ... वाचतेय .... सगळ्यांना लेखनासाठी थँक्स ... :)
  • Log in or register to post comments

उपयुक्त धागा..

चिगो
Fri, 02/15/2013 - 18:45 नवीन
धन्यवाद, डॉक्टरसाहेब..
  • Log in or register to post comments

माहीतीपूर्ण धागा

आनंदी गोपाळ
Fri, 02/15/2013 - 20:06 नवीन
व सुंदर चर्चा. उपयुक्त माहीती देऊन चर्चा घडवून आणल्याबद्दल डॉ. सुबोध यांना धन्यवाद.
आपल्यास काही शंका असतील तर मी त्या यथा शक्ती त्यांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. कृपा करून (second opinion )विचारू नये.अपुर्या माहितीवर उत्तर देणे अशक्य आहे.
नेट-कन्सल्टेशन्स टाळल्याबद्दल डॉक्टरसाहेबांचे विषेश अभिनंदन.
  • Log in or register to post comments

उत्तम चर्चाविषय सुरू केल्याबद्दल डॉ. खर्‍यांचे अभिनंदन

बहुगुणी
Fri, 02/15/2013 - 22:23 नवीन
(डॉ. खरे: धागा पाहिल्यादिवशीच आपल्याला व्य नि पाठवला होता, आपण पाहिलेला नसावा असं वाटतं म्हणून इथे कळवतो आहे, जमल्यास उत्तर द्या.)
  • Log in or register to post comments

.

सुबोध खरे
Sat, 02/16/2013 - 19:13 नवीन
.
  • Log in or register to post comments

सुबोधजी उत्तम विषयावर लेखन केले आहे.

सुकामेवा
Mon, 02/18/2013 - 01:56 नवीन
आमच्या मातोश्रीना सुद्धा स्तनाचा कर्करोग झाला होता व त्यामुळेच तिचे निधन झाले. स्वत: कडे दुर्लक्ष केल्यामुळे आईला फार त्रास झाला, मला आणि माझ्या भावाला , तो तिला होणारा त्रास बघून जो त्रास झाला तो शब्दात सांगता येणार नाही. तरी सर्वाना नम्र विनंति कि या कडे दुर्लक्ष न करता, स्वत:वर वेळेत उपचार करून घेऊन आपला जीव व पैसे दोन्ही वाचवावेत .
  • Log in or register to post comments

@ शैलेंद्र

सुबोध खरे
Mon, 02/18/2013 - 21:00 नवीन
मानवी शरीरात एकही रेणू अनुपयुक्त नसतो हे सत्य नाही. जर आपण हे पहिले कि ८०% फलित बीजांडे नाहीशी होतात आणि फक्त २०% बीजांडाची वाढ होऊन गर्भ तयार होतो. ज्यावेळी गुण सुत्रांचे विभाजन होते तेंव्हा त्यात बऱ्याच चुका होतात. यातल्या ज्या चुका लहान असतात त्या पुढच्या पिढीत उतरतात ज्या चुका गंभीर असतात ते गर्भ जगत नाहीत आणि म्हणूनच ८०% गर्भ हे पडून जातात(गर्भपात होतो) स्तनांच्या कर्करोगावर आपण सध्या करतो ती जीन थेरेपी नाही आपण फक्त शस्त्रक्रिया, केमोथेरपी किंवा रेडियो थेरेपी आहे.
  • Log in or register to post comments

स्तनांच्या कर्करोगावर आपण

शैलेन्द्र
Tue, 02/19/2013 - 00:49 नवीन
स्तनांच्या कर्करोगावर आपण सध्या करतो ती जीन थेरेपी नाही आपण फक्त शस्त्रक्रिया, केमोथेरपी किंवा रेडियो थेरेपी आहे.
बरोबर, पण माझं उत्तर हे जीन थेरपीच्या संदर्भात होतं.
ज्यावेळी गुण सुत्रांचे विभाजन होते तेंव्हा त्यात बऱ्याच चुका होतात. यातल्या ज्या चुका लहान असतात त्या पुढच्या पिढीत उतरतात ज्या चुका गंभीर असतात ते गर्भ जगत नाहीत
गुणसुत्रांचे नुस्तेच विभाजन नव्हे तर पुनर्मीलन होताना जास्त चुका होतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

एक शंका

नगरीनिरंजन
Tue, 02/19/2013 - 07:25 नवीन
या विभाजन-पुनर्मीलनाच्या चुका माणसाच्या लक्षावधी वर्षांच्या अस्तित्वात पहिल्यापासून होतच आलेल्या असणार. मग त्यांचं प्रमाण वाढतंय किंवा वाढणार आहे असं म्हणण्यासाठी आधार काय? पूर्वी अशा चुका झालेले जीव टिकत नव्हते आणि आता आपण कृत्रिम उपायांनी त्यांना जगवतोय असं काही आहे काय? की पूर्वीही लोक कॅन्सरनेच मरायचे पण तेव्हा ते कॅन्सरने मेले हे कळत नव्हते? ही लिंक पाहा: Cancer Epidemic Infographic
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

जीन थेरपीवर माझा अगदी हाच

शैलेन्द्र
Tue, 02/19/2013 - 10:39 नवीन
जीन थेरपीवर माझा अगदी हाच आक्शेप आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

कृत्रिम उपाय

सुबोध खरे
Tue, 02/19/2013 - 19:26 नवीन
जवळजवळ ८० % गर्भ हे पहिल्या १० आठवड्यात नष्ट होत असतात त्यावर १९८०-९० या दशकात खूप मोठ्या प्रमाणात संप्रेरके(hormones) देऊन ते जीव जागवण्याचे प्रयत्न झाले परंतु हे सर्व जागवलेले जीव मोठ्या प्रमाणात व्यंग असलेले होते यामुळे १९९० नंतर हे प्रयत्न थांबवले गेले आणि जे गर्भ निकोप आहेत ते जगतील अन्यथा गर्भपात होईल ते होऊ द्यावे अस विचार पुढे आला. साध्या शब्दात आंबा सडका असेल तर तो पडू द्या झाडाला चिकटवण्याचा प्रयत्न करू नका. पूर्वी सुद्धा लोक कर्करोगाने मरत होते (इजिप्त च्या ममी मध्ये कर्करोग सापडले आहेत) पण तेंव्हा आपल्याला कारणे माहित नव्हती म्हणून वैर्याने मूठ मारली. अमक्याने कारणी केली आणि तो रक्त ओकून मेला असे समजत असत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

अतिशय महत्वाचा लेख !

वाहीदा
Wed, 02/20/2013 - 13:46 नवीन
बर्‍याचश्या गोष्टी आम्ही डॉक्टरांस सांगण्यासही लाजतो, विचारायचे कसे तेच कळत नाही अन गोंधळ आणखीन वाढतो. तुमच्या लेखाने मा़झे खुपसे गैरसमज दुर केले , धन्यवाद !! ~ वाहीदा
  • Log in or register to post comments

डॉक्टर खरे, नमस्कार ! आपण कदाचित व्यनी पाहीला नाही

वाहीदा
Wed, 02/20/2013 - 13:52 नवीन
डॉक्टर खरे, नमस्कार ! आपण कदाचित व्यनी पाहीला नाही म्हणून येथे टंकत आहे. कृपया व्यनीचे उत्तर देणे . ~ वाहीदा
  • Log in or register to post comments

क्षमस्व

सुबोध खरे
Wed, 02/20/2013 - 19:51 नवीन
वाहीदाताई, मी सिनेमाला गेलो होतो म्हणून आपला व्य नि पहिला नाही. उत्तर दिले आहे.आपण कोणताही प्रश्न निस्संकोच पणे विचारावा.डॉक्टर आणी वकीलापासून काहीही लपवू नये कारण त्याने आपलाच तोटा होतो. व्य नि पाठविला आहे
  • Log in or register to post comments

धन्यवाद !

वाहीदा
गुरुवार, 02/21/2013 - 10:41 नवीन
व्यनीत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले धन्यवाद ! ~ वाहीदा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

कर्करोगापासून बचाव आणि लोकजागृती

सुबोध खरे
गुरुवार, 02/21/2013 - 13:25 नवीन
काही लोकांच्या शंकांसाठी मी एक साधारण माहिती देत आहे स्तनातील प्रत्येक गाठ हि कर्करोगाची नसते. खर तर फक्त ५-६% गाठी या कर्करोगाच्या असतात. पण एखादी गाठ आपल्याला नवीन जाणवली असेल किंवा अगोदर असलेली गाठ जर मोठी झाली असेल तर जरूर डॉक्टर न दाखवावी. जर आपल्याला जास्त काळजी वाटत असेल तर माझा सल्ला असा आहे कि आपण टाटा कर्करोग रुग्णालयात जाऊन पूर्ण शरीराची तपासणी करून घ्या हि तपासणी सुमारे ७००-१४०० रुपयात होते आणी ती अनुभवी डॉक्टर कडून होत असल्याने जास्ती खात्रीची असते.त्याची माहिती https://tmc.gov.in/medical/departments/popup/css.htm येथे मिळेल. त्यांचा दूरध्वनी +91-22-24177000, +91-22-24146750 - 55 असा आहे. स्तनाच्या कर्क रोगाबद्दल लोकजागृती खालील स्थळावर मिळेल https://tmc.gov.in/cancerinfo/breast/Popup/Awareness.html https://tmc.gov.in/medical/departments/popup/css.htm
  • Log in or register to post comments

मासिक धर्मादरम्यान होणारा त्रास

स्मिता चौगुले
Fri, 02/22/2013 - 09:54 नवीन
२०-२५ वय असणार्‍या स्त्रियाणंमधे स्तनाचा कर्करोग होण्याचे प्रमाण किति आहे? मासिक धर्मादरम्यान कहि स्त्रियाना स्तनात जड्पणा किन्वा दुखणे म्ह्णजे कर्करोगचे कारण अथवा सुरुवात असु शकते का? या त्रासाचा कालवधी(ज्यात धोका नाही)काय असतो? हा त्रास होत असेल तर कोणत्या वैदयकीय चाचण्या करुन घ्याव्यात?
  • Log in or register to post comments

मासिक धर्मादरम्यान होणारा त्रास

सुबोध खरे
Fri, 02/22/2013 - 10:41 नवीन
स्मिता ताई , एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. कर्करोग कधीही दुखत नाही. दुर्दैवाने दुखत नाही म्हणून बहुसंख्य लोक डॉक्टर कडे जात नाही.स्तनात दुखत असेल तर तो कर्करोग नाही हे ९९.९% सत्य आहे तेंव्हा याची काळजी नसावी. राहता राहिली गोष्ट जड पणाची किंवा दुखण्याची. हा त्रास आपल्या संप्रेरकांच्या(हॉरमोन्स) च्या असमतोला मुळे होणारा प्रश्न आहे. मासिक पाळीच्या अगोदर शरीरातील होर्मोन वाढलेली असतात आणि त्याची पातळी एकदम खाली आल्यामुळे आपणास पाळी येते हे नैसर्गिक चक्र आहे. त्यामुळे पाळीच्या अगोदर शरीरात बऱ्याच प्रमाणात पाणी आणि क्षार हे साठून राहतात त्यामुळे हे जडत्व येते (शरीरात आणि स्तनात) या क्षार आणि पाण्याचा पाळी च्या वेळी निचरा होतो म्हणून पाळी झाल्यानंतर २-३ दिवसांनी हा सर्व त्रास एकदम कमी होतो.याला Premenstrual syndrome असे म्हणतात या साठी सोपा उपाय म्हणजे पाळी सुरु होण्याच्या आसपास तेलकट तळलेले पदार्थ कमी करा, भरपूर पाणी प्या, रात्री झोप पूर्ण घ्या सोपा आणि नियमित अस व्यायाम करा.इ जीवनसत्वाच्या गोळ्या घेतल्यास (४०० मिग्रा दिवसात एकदा वा दोन वेळा जेवणानंतर) वरील त्रास कमी होण्यास बरीच मदत होते. इ जीवन सत्व हे evion , E cap इ नावानी मिळतात.कोणत्याही औषधाच्या दुकानात सहज मिळतील. स्तनात दुखण्यासाठी--या काळात स्तनांना आधार देणे आवश्यक असते स्तनांना सूज आल्याने त्यांच्या आत असणाऱ्या cooper ligament वर ताण पडतो आणि जास्त दुखते. याकडे दुर्लक्ष्य केल्यास नंतर स्तन लोंबू लागतात(pendulous) एक म्हणजे व्यवस्थित फीट होणारी ब्रेसियर वापरणे अतिशय आवश्यक आहे कारण घट्ट किंवा नीट न बसणारी ब्रेसियर जास्त त्रास देऊ शकते. जास्त दुखत असल्यास एक क्रोसिन किंवा अस्प्रो ची गोळी घेऊ शकता. अधिक त्रास होत असेल तर त्या साठी आपल्या स्त्रीरोग तज्ञाकडून सल्ला घेणे.
  • Log in or register to post comments

काही प्रश्न -->

अप्पा जोगळेकर
Mon, 03/25/2013 - 09:25 नवीन
काही प्रश्न --> १. रिसेप्टर सेल ही काय भानगड आहे ? केमोथेरपीमधे ही सेल नष्ट झाली नसेल तर पुन्हा कॅन्सर होतो असे ऐकतो. म्हणजे काय ? २. निरोगी स्त्रीनेसुद्धा वरचेवर जाउन वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी हे अर्थहीन वाटत नाही काय ? अवांतर - प्रजनन करत राहणे ही स्त्रीची नैसर्गिक प्रेरणा असल्यामुळे कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स खाणे म्हणजे चक्र उलटे फिरवणे असे ऐकतो आणि यामुळे स्त्रियांना मिश्या येतात हे खरे आहे काय ?
  • Log in or register to post comments

रिसेप्टर सेल

सुबोध खरे
Mon, 03/25/2013 - 13:52 नवीन
अप्पा साहेब, रिसेप्टर सेल(ग्रहणशील पेशी) या तुमच्या शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी असतात . आपल्या शरिरास होणाऱ्या संवेदना जाणून घेणे हे या पेशींचे कार्य आहे. म्हणजे त्वचेच्या आत असणाऱ्या स्पर्श ज्ञानाच्या किंवा तापमान जाणणार्या पेशी हे एक उदाहरण आहे पण त्याचा कर्करोगाशी काय संबंध आहे हे मी अजून कोठेही वाचलेले नाही. आपल्याजवळ त्याचा संदर्भ असल्यास कृपया कळवावा म्हणजे मलाही फायदा होईल निरोगी स्त्रीने वैद्यकीय तपासणी करून घेणे एका विशिष्ट वयापूर्वी (चाळीशी च्या अगोदर) कदाचित उपयुक्त नाही परंतु त्यानंतर केवळ आपल्याला काही होत नाही म्हणून तपासणी न करणे हे धोक्याचे ठरू शकते. आपण वजन रक्तदाब, मधुमेह नियंत्रित ठेवून आणि नियमित व्यायाम करून आणि आहाराची काळजी घेऊन हृदय रोगापासून आपले मोठ्या प्रमाणात संरक्षण करू शकतो परंतु कर्करोगाबाबत दुर्दैवाने असे ठाम कोणतेही प्रतिबंधक उपाय आपल्याला योजता येत नाहीत. तसेच सडपातळ, रक्तदाब व मधुमेह नसलेल्या आणि नियमित व्यायाम करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा हृदय रोग झालेले वारंवार आपल्या पाहण्यात येतात. त्यामुळे आपण प्रतिबंधक अशा चाचण्या करणे शहाणपणाचे ठरते असे आढळून आले आहे. अभियांत्रिकी भाषेत दोन तर्हेची देखभाल(maintenance) असते. १)preventive maintenance (प्रतिबंधात्मक देखभाल ) आणि २) breakdown maintenance(सेवा खंडित झाल्यावर केलेली दुरुस्ती/देखभाल) यात कोणती अंतिमतः फायदेशीर ठरते ते आपण जाणताच. मी लोकांना एकच म्हणतो.डोळे मिटून हम रस्ता(highway) पार करा शंभरात ९०-९५ वेळा आपण पार व्हालच पण ते सुरक्षित आहे कि नाही हे आपणच ठरवा. गर्भ निरोधक गोळ्या मुळे चक्र उलटे फिरते हे बरोबर नाही. शरीरात जी संप्रेरके तयार होतात तीच संप्रेरके आपण गोळ्यांच्या माध्यमातून देतो त्यामुळे शरीराला संप्रेरके तयार करण्याचे काम थोडे कमी होते. त्याने मासिक पाळी नियमित तर होतेच परंतु गर्भाशयाच्या आणि बीजांड कोशाच्या कर्करोगापासून पण बचाव होतो.त्या गोळ्या घेऊन आपल्याला पाळी थोडीशी (५-६ दिवस) पुढे मागे सहज करता येते हे नियमन त्या स्त्रीच्या हातात राहते. (आपली पाळी नियमित येते हे काय सुख आहे हे स्त्रियांना विचारून पहा)पाळी च्या वेळेस होणारा रक्तस्त्राव खूप कमी झाल्यामुळे anemia (पंडुरोग) पण कमी होतो. गर्भ निरोधक गोळ्यानचा मिशी येण्याशी काहीही संबंध नाही. ओठावर मिशी/ लव येणे हे स्त्री संप्रेरकांचे पुरुष संप्रेरकात रुपांतर झाल्याने हे होते. हे बहुतांश लठ्ठ स्त्रियांमध्ये दिसते (PCOS -polycystic ovarian syndrome) यामुळे हे होते. PCOS मुळे बर्याच स्त्रियांना मूल होत नाही सुरुवातीला आम्ही planning करीत आहोत असे त्या सांगतात नंतर गोळ्या घेतल्याने मूल होत नाही असे सांगतात त्यामुळे लोकांमध्ये गैरसमज पसरतात. मूळ कारण लठ्ठ पणा आहे.वजन कमी केले तर पाळी नियमित होते आणि प्रसवशक्ति(fertility) पण सुधारते. पण वजन कमी करणे एवढे सोपे असते तर VLCC वगैरेंचा व्यवसाय एवढा फोफावला नसता. No situation in life is so bad that it cant be blamed on some one else. .
  • Log in or register to post comments

माझा आणि वैद्यक शास्त्राचा

अप्पा जोगळेकर
Mon, 03/25/2013 - 14:38 नवीन
माझा आणि वैद्यक शास्त्राचा परिचय नाही. त्यामुळे रिसेप्टर सेल बद्दल ज्या डॉक्टर मित्राकडून ऐकले त्याच्याशी संपर्क करुनच मी उत्तर देउ शकेन. बाकीच्या तपशीलवार माहितीबद्दल आभारी आहे. काही गैरसमज दूर झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

रिसेप्टर सेल नव्हे

बहुगुणी
Tue, 04/02/2013 - 07:44 नवीन
अप्पा जोगळेकरः 'केमोथेरपीमधे ही सेल नष्ट झाली नसेल तर पुन्हा कॅन्सर होतो' अशा वर्णनावरून आपल्याला रिसेप्टर सेल ऐवजी कर्करोगाच्या मूळ पेशी (cancer stem cell) अभिप्रेत असेल असं वाटतं, याविषयी आधिक माहिती इथे मिळेल. आपल्या इतर दोन प्रश्नांना डॉक्टर खर्‍यांनी यथोचित उत्तरे दिली आहेतच.
  • Log in or register to post comments

मी म्हणणार होते की सरांनी हा

पिलीयन रायडर
गुरुवार, 02/04/2016 - 18:42 नवीन
मी म्हणणार होते की सरांनी हा धागा नजरेखालुन घालावा आणि सगळं नीट लिहीलय ना ते तपासुन घ्यावं.. पण सरच ते! इतर पामरांसाठी वर आणतेय.. इथे चर्चा होऊ शकते ना सर?
  • Log in or register to post comments

सनी लियोनच्या अस्तित्त्वाला

संदीप डांगे
गुरुवार, 02/04/2016 - 18:45 नवीन
सनी लियोनच्या अस्तित्त्वाला उरोजाच्या कर्करोगाच्या विळख्यातून सोडवल्याबद्दल पिरातैचे जाहीर आभार - शुभेच्छुक: मेगाबायटीप्रतिसादमंडळाचे सगळे सक्रिय कार्यकर्ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

तुमच्या धाग्याला एवढा वेळ वर

पिलीयन रायडर
गुरुवार, 02/04/2016 - 18:50 नवीन
तुमच्या धाग्याला एवढा वेळ वर ठेवला.. एवढा ट्यार्पी दिला त्याचं काही कौतुकच नाही तुम्हाला..!! संपादक मंडळ.. तिकडची चर्चा इकडे हलवता येईल का? खरे काकांचा धागा पळवु आता आपण.. पण सर उत्तर का देत नसावेत..? आम्हा अज्ञानी जनांचे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

ओ तै, धन्यवादच है की त्यो!

संदीप डांगे
गुरुवार, 02/04/2016 - 19:40 नवीन
ओ तै, धन्यवादच है की त्यो! तुम्ही कोणत्या तरी झाडाचा कसला तरी पाला खाऊ घातला, कूनीतरी गप्प बसण्यासाठी म्हणे! पेटंट घ्या त्येचं. .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा