रंगरेखा कलेचे-( Graphics) चे जग असते कसे ?

चौकटराजा's picture
चौकटराजा in जनातलं, मनातलं
10 Feb 2013 - 7:14 pm

मानवी देहाला पांच संवेदना इंद्रिये आहेत त्यात त्चचेखालोखाल डोळा हे महत्वाचे संवेदना इंद्रिय आहे. कारण याने पाठविलेले संदेश ग्रहण मेंदूने करून बर्‍याच गोष्टीचे आकलन आपल्याला होत असते. डोळया पेक्षा त्चचेचे स्थान महत्वाचे असायचे कारण परिसराची अधिक महत्वाची माहिती उदा. तापमान त्वचा करून देते हे होय. ज्ञानासाठी मात्र डोळयाचे महत्व अनन्य असे आहे.

डोळ्यातील सूक्ष्म रचनेमुळे आपल्याला रंगाचे , मितीचे, व आरेखनाचे ज्ञान होते. या तिन्ही मूलभूत घटकानी मिळून ज्याचे प्रकटीकरण होते त्यास ग्राफिक्स असे म्हणू या. आपल्या घरातील दूरदर्शन चा पडदा, सिनेमाचा पडदा, आपली पुस्तके, पाटी, फळा, इतकेच काय आपल्याला स्वप्न दाखविणारे आपले मनःचक्षू हे सारे ग्राफिक्स दाखविणारे आपले मित्र आहेत.यावर दिसंणारा जो काही भाग आहे (content) त्याचा गाभा मुख्यत्वे दोन प्रकारच्या तत्वानी बनलेला आहे .
१. रंग २. रेषा .
रंग म्हणजे विशिष्ट तरंग लांबी असलेला प्रकाशकिरण तर रेषा म्हणजे विशिष्ट आकारमानाचा बिंदूचा एखाद्या दिशेत झालेला
प्रवास.
रंगात अनेक छटा असतात त्या निरनिराळ्या छटा अनेक सूक्ष्म बिदूच्या (pixals ) माध्यमातून दाखवून एकत्रित परिणाम स्वरूपात चित्र दृग्गोचर होते त्याला बी एम पी ग्राफिक्स म्हणतात . असे ग्राफिक्स हाताळणार्‍या आज्ञावलीस "पेंट प्रोगाम "असे म्हणतात. यात सूक्ष्म छटांचा अविष्कार करता येत असला तरी आकार मोठा केला की यात मूळ पिक्सलचे चौकोन दिसू लागून " चित्र" स्वरूपाचे आकलन भरकटून जाते. याउलट आरेखन हाताळणार्‍या ज्या आज्ञावली असतात त्यात भौमितिक समीकरणे वापरून माहिती हाताळली जाते. सबब चित्र मोठे केले तरी समीकरण बिघडत नसल्याने " चित्र" स्वरूपाचे आकलन भरकटत नाही. याचा आणखी एक फायदा असा की फाईल ची साईज कमी होते. या अशा आरेखन प्रोगाम ना object handlling programme म्हणतात . यानी तयार केलेले ग्राफिक्स vector graphics होय.

रंग रेखा यांची मूलभूत संकल्पना समजणे जसे महत्वाचे तसेच मिती ची संकल्पना ही महत्वाची आहे.
मानवी डोळ्याला ( दोन डोळे असतील तर ) , दोन डोळयातील अंतरामुळे निरनिराळ्या कोनातून समोरची वस्तू दिसते. त्याचा एकत्रित परिणाम म्हणून मेंदूला लांबी रुंदी बरोबर खोलीचेही ज्ञान होत असते. कॅमेरा व डोळा यांच्या कार्यात बरेच साम्य असले तरी कॅमेर्‍याला एकच भिंग असल्याने त्याची अवस्था एक डोळा असलेल्या माणसासारखी होते. त्याला खोलीचे ज्ञान होत नाही. एकाच कॅमेर्‍याने दोन वेगवेगळ्या कोनातून फोटो काढून ते दोन फोटो विशिष्ट काचा वापरून पाहिले तर
त्रिमिती फोटो पहायला मिळतो हे आपणास माहीत आहेच.
ग्राफिक्स च्या दुनियेत फाईलमधे माहिती साठविताना रंग रेखा यांचा उल्लेख जसा सक्तीचा असतो . तसाच पडद्या वरचे
स्थान को ऑर्डेनेटच्या स्वरूपात साठवणे सक्तीचे असते. त्रिमिती माहिती साठवायची आल्यास तीन प्रकारची स्थाने उल्लेखावी
लागतात यानाच आपण x y x axis information म्हणतो. द्विमिती मधे ही माहिती फक्त x y axis साठी च साठविली जाते. साहजिकच त्रिमिती चा विचार करणार्‍या फाईल्स चा आकार मोठा त्यासाठी आवश्यक प्रोसेसर भारी व मेमरी अधिक जास्त व प्रगत लागते हे आलेच.

आणखी एक महत्चाची संकल्पना समजणे आवश्यक आहे की चित्र हे स्थिर आहे की अनेक स्थ्रिर चित्रांचा तो सरकता असा पट आहे. यातही स्थिर चित्रासाठी लहान फाईल चालते तर चलतचित्रासाठी मोठ्या आकारमानाची फाईल तयार होते.

नमनात आपल्याला इतके जर नीट समजले तर या जादूभर्‍या दुनियेची सफर रंजक व ज्ञानवर्धक होईल अशी खात्री आहे .

क्रमश:

मांडणीकलातंत्रमौजमजाछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्रआस्वादमाध्यमवेधलेखअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

10 Feb 2013 - 8:54 pm | अभ्या..

वा राजासाब, सुरुवात एकदम झकास झाली आहे.
समस्त मिपाकरांनो ही लेखमाला केवळ मनोरंजनासाठी नव्हे तुमचे संगणकावरचे, मिपावरचे, आंतरजालावरचे वावरणे बर्‍याच अंशी सुलभ करण्यासाठी आहे. पा़कृ चे फोटो कसे टाकू? खफवर व्हिडीओ कसा टाकू?, इमेज लहान कशी करु? अशा बेसिक प्रश्नांची उत्तरे तर मिळतीलच पण सध्याचे संवादाचे सर्वात सुलभ आणि परिणामकारक असे माध्यम 'ग्राफीक्स' याविषयी सुध्दा बर्‍याच शंकाचे निरसन होईल.
(मुख्य म्हणजे संपादक लोकांचे काम जरासे हलके झाले तरी खूप छान)
खूप खूप धन्यवाद राजासाब.

वा मग तर लैच मजा येईल!!! भारी भारी :)

(ग्राफिक्स-निरक्षर) बॅटमॅन.

परिकथेतील राजकुमार's picture

11 Feb 2013 - 4:16 pm | परिकथेतील राजकुमार

रेखाची संकल्पना समजून घ्यायला आवडेल.

अभ्या..'s picture

11 Feb 2013 - 5:09 pm | अभ्या..

सुरुवात बिंदू पासून करु. :)

बॅटमॅन's picture

11 Feb 2013 - 6:53 pm | बॅटमॅन

+१.

बिंदू आहे रे तुझ्या बोलण्यात ;)

धन्या's picture

11 Feb 2013 - 5:21 pm | धन्या

छान लेख आहे काका. तांत्रिक बारकावे अतिशय सहज सोप्या भाषेत समजावले आहेत.