सोबत होती तुझी जेथवर

शैलेश हिंदळेकर's picture
शैलेश हिंदळेकर in जे न देखे रवी...
10 Feb 2013 - 1:05 am

सोबत होती तुझी जेथवर
कधी एकटा ना पडलो
धुंद तुझ्या त्या सहवासातच
कसा होईना, पण घडलो

सकाळ तुझीया शिवाय माझी
होतच नव्हती सुरु तशी
दिवसभरातून तुझी भेट मग
घडतच होती माझ्याशी

तू नसल्यावर जीव व्हायचा
उगाच कासाविस माझा
परंतु तुझीया भेटी नंतर
स्वतःस समजे मी राजा

वैद्य भेट ती नित्य व्हायची
तुझीया संगे फिरल्याने
शुष्क खोकला आणिक थकवा
ऊर धुराने भरल्याने

परिवाराची मित्रांची मी
पथ्करली गे नाराजी
कारण तव दुर्गंध सोसण्या
होतच नव्हते ते राजी

अखेर सोडून दिधले तुजला
स्मरणही नाही होत तुझे
परतुनी येऊ नको मजकडे
हेच मागणे गे माझे
[वैधानिक इशारा - धुम्रपान आरोग्यास अपायकारक आहे ]

कविता

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

10 Feb 2013 - 1:16 am | संजय क्षीरसागर

महाराष्ट्र शासनाच्या जनहितार्थ प्रकाशनाकडे रवाना

अभ्या..'s picture

10 Feb 2013 - 1:35 am | अभ्या..

एकदम भारी विझवलीत. मस्त.
फक्त कोणीतरी मला एक सांगा, हे तुझीया, माझीया, तुजकडे, मजकडे असले लिहायची पध्दत कोणी सुरु केली?

पण आभ्यानं वेळीच सावरलंय

अत्रुप्त आत्मा's picture

10 Feb 2013 - 1:49 pm | अत्रुप्त आत्मा

@प्रतिसादाचं शीर्षक वाचून क्षणभर मला>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/giggle.gif हल्ली शीर्षकांवरून कोणाकोणाला काय काय वाटेल,सांगता येत नै व्बॉ.!!! http://www.sherv.net/cm/emo/laughing/smiley-face-laughing.gif

पैसा's picture

10 Feb 2013 - 8:36 am | पैसा

लै भारी!

शैलेश हिंदळेकर's picture

10 Feb 2013 - 3:40 pm | शैलेश हिंदळेकर

सर्वप्रथम धन्यवाद मित्रांनो, नवीन आहे तुमच्या दिग्गजांच्या जगात मी, आताशा कुठे सुचायला लागलय, त्यामुळे लहान मोठ्या चुका मोठ्या मनाने सहन कराल, अशी अपेक्षा

शैलेश हिंदळेकर's picture

11 Feb 2013 - 11:59 pm | शैलेश हिंदळेकर

प्रतिसाद सुरुवातील विषयाला धरुन असतात पण नंतर भरकटत का जातात…