इश्कबाजांच्या मैफिलीत

अधिराज's picture
अधिराज in जे न देखे रवी...
9 Feb 2013 - 12:46 pm

इश्कबाजांच्या मैफिलीत
तू असावीस गाजलेली
नशा शायरीत आणताना
तू असावीस लाजलेली.

दो जीवांची स्पंदने ही
असावी तुझ्यातच रुजलेली
वसंतातले रंग लेऊन
तू असावीस सजलेली.

घेऊन चांदणे उशाला
तू असावीस निजलेली
धुंद जाणिवेच्या धारांमध्ये
तू असावीस भिजलेली.

विरहसमय आला तरी
नसावी प्रेमवात विझलेली
बहू पालटले ऋतू जरी
नसावी गझल झिजलेली.

जीवनमान

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

9 Feb 2013 - 12:52 pm | प्रचेतस

मस्त.

संजय क्षीरसागर's picture

9 Feb 2013 - 12:56 pm | संजय क्षीरसागर

विरहसमय आला तरी
नसावी प्रेमवात विझलेली
बहू पालटले ऋतू जरी
नसावी गझल थांबलेली

असं हवं का?

गझल नाविन्य संपलेली किंवा कंटाळवाणी झालेली नसावी ह्या अर्थी तो शब्द वापरला आहे. पण तुमचा "थांबलेली" बी चालायला हरकत नाही. तुमच्यासाठी काय पन!

संजय क्षीरसागर's picture

9 Feb 2013 - 7:05 pm | संजय क्षीरसागर

शब्द नज़ाकतदार हवा. कविता (किंवा गज़ल) सखीशी नातं असतं तशी असावी.

सखी थांबते. तिचं नाविन्य संपत नाही, तिचा सहवास कधी कंटाळवाणा होत नाही. आपला तिच्याकडे पाहण्याचा नज़रिया नाविन्यपूर्ण लागतो. ती अस्तित्वाचं प्रकटरूप असते, नित्यनूतन!

तुमच्यासाठी काय पन!... क्या बात है! म्हणून तर लिहीलं.

अभ्या..'s picture

9 Feb 2013 - 1:24 pm | अभ्या..

मस्त जमलीय. सुरेख.

अत्रुप्त आत्मा's picture

9 Feb 2013 - 2:36 pm | अत्रुप्त आत्मा

चान चान आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

9 Feb 2013 - 6:33 pm | परिकथेतील राजकुमार

इश्कबाज ??

शब्द अंमळ खटकून गेला बॉ.

तिमा's picture

10 Feb 2013 - 12:25 pm | तिमा

कधीकधी खटकतात. मागे एकदा,मी एका कुठेही झोप येऊ शकणार्‍या मित्राला 'इच्छाशयनी' म्हटले तर त्याने वेगळाच अर्थ घेतला.

मनीषा's picture

10 Feb 2013 - 12:56 pm | मनीषा

इश्कबाजांच्या मैफिलीत
तू असावीस गाजलेली (?)

हे जरा वेगळं वाटते आहे .
बाकी कविता छान!

सर्व प्रतिसादकर्त्यांचे व येथे पायधूळ झाडून गेलेल्या सर्वांचे मनापासून आभार!

श्रिया's picture

11 Feb 2013 - 11:18 am | श्रिया

अतिशय सुंदर जमलीये.

दो जीवांची स्पंदने ही
असावी तुझ्यातच रुजलेली
वसंतातले रंग लेऊन
तू असावीस सजलेली.

एकदम खास!

अग्निकोल्हा's picture

11 Feb 2013 - 9:54 pm | अग्निकोल्हा

.

जेनी...'s picture

11 Feb 2013 - 9:56 pm | जेनी...

मी पायधुळ झाडलीन बरका .. अधिकाका :)