इश्कबाजांच्या मैफिलीत
तू असावीस गाजलेली
नशा शायरीत आणताना
तू असावीस लाजलेली.
दो जीवांची स्पंदने ही
असावी तुझ्यातच रुजलेली
वसंतातले रंग लेऊन
तू असावीस सजलेली.
घेऊन चांदणे उशाला
तू असावीस निजलेली
धुंद जाणिवेच्या धारांमध्ये
तू असावीस भिजलेली.
विरहसमय आला तरी
नसावी प्रेमवात विझलेली
बहू पालटले ऋतू जरी
नसावी गझल झिजलेली.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2021
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त.
अधिराज, क्या बात है!
गझल नाविन्य संपलेली किंवा
In reply to अधिराज, क्या बात है! by संजय क्षीरसागर
धन्यवाद!
In reply to गझल नाविन्य संपलेली किंवा by अधिराज
छान
चान चान आहे.
ऑ ?
असे शब्द
इश्कबाजांच्या मैफिलीत
सर्व प्रतिसादकर्त्यांचे व
अतिशय सुंदर जमलीये.
खपलो!
मी पायधुळ झाडलीन बरका ..