घे उत्तुंग भरारी,दाही दिशा मोकळ्या आहेत
भिऊ नकोस डगमगू नकोस,अनंत वाट खुल्या आहेत
रस्ते बंद आहेत म्हणून, चालायचे तू थांबू नकोस
नवीन रस्ता शोधण्याचा, प्रयन्त मात्र सोडू नकोस
एका जागी थांबून, तुला कोणी काही देणार नाही
हात हलवल्याशिवाय, घास तोंडात जात नाही
सुरुवातीच्या अपयशानंतर हि, पुढे उज्वल यश आहे
दाट अंधारानंतरही, पुढे तेजस्वी प्रकाश आहे
चढ उतार,सुख दुख: तर जीवनात येतच असतात
इथे समर्थपणे लढनारेच, यशस्वी होत असतात
प्रतिक्रिया
21 Jan 2013 - 12:01 pm | स्पंदना
कोनच्या लढाईतल म्हणायच तुमी?(ह.घे.)
कविता ठिक्केय!
21 Jan 2013 - 12:02 pm | व्हिआदेश
प्रोत्साहनात्मक काव्य
छान आहे
21 Jan 2013 - 1:23 pm | प्रचेतस
कविता जमली नाही.
विषेशतः तानाजी मालुसर्यांच्या पोवाड्याच्या पार्श्वभूमीवर तर खूप फिक्कं वाटलं.
21 Jan 2013 - 3:13 pm | अनिल तापकीर
अपर्णा,आदेश, वल्लीजी धन्यवाद,
वल्लीजी परखड प्रतिसादाबद्दल धन्यवाद, ही कविता माझी सुरुवातीच्या काळातील आहे. म्हण्जे जेव्हा मी कविता करण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हाची आहे कदाचित चांगली नसेल. पण काही हरकत नाही. असेच मार्गदर्शन करत रहा