पु.ल.देशपांडे उद्यान (सिंहगड रोड)

neeta's picture
neeta in कलादालन
17 Dec 2012 - 2:59 pm

हल्लीच पुण्यामध्ये सिंहगड रोड्वर ओकायामा ( पु.ल.देशपांडे उद्यान) पाहिली. महानगरपालिकेचे उद्यान असूनही इतके साफ आणि सुंदर आहे. सर्वांनी जरुर भेट द्या. काही फोटो टाकत आहे.

कला

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

17 Dec 2012 - 5:08 pm | ज्ञानोबाचे पैजार

उद्यानाला ५ रुपये प्रवेश शुल्क असल्या मुळे आमच्या सारख्या गरीबांना तेथे जाणे परवडत नाही.
या उद्यानाचे फुकट फोटो दाखववुन पाच रुपये वाचवल्या बद्दल तुमचे आभार.
संभाजी उद्यानात मत्स्यालयालाही असेच प्रवेश शुल्क आहे. तिकडलेही फोटो टाकले तर बरे होईल
पैजारबुवा,

परिकथेतील राजकुमार's picture

17 Dec 2012 - 5:16 pm | परिकथेतील राजकुमार

मला कात्रज सर्पोद्यानाचे फटू हवे आहेत.

चौकटराजा's picture

17 Dec 2012 - 6:30 pm | चौकटराजा

फोटो चाबुक आले आहेत ( असंच तो अवधूत दादा म्हणतो ना ?) आपल्या आमंत्रणा वरून पुण्यास ( चिंचवडहून) येऊन या उद्यानास भेट देणे आलेच ! पाच रुपये तिकीट ठेवल्याबद्द्ल महापलिकेचे आभार कारण आता त्यात चहा कपभर देखील मिळत नाही !

तर्री's picture

17 Dec 2012 - 8:36 pm | तर्री

शंकेखोर मना गप्प बस....पण गप्प बसेल तर शप्पथ !
१. बागेत छक्के नकोत्या जागी / नकोत्या जागी वेळी टपकतात का ? (५ रूपरे आधीच गेलेत )
२. बागेत "पाण्याची - पिण्याची " सोय आहे का ?
३. पोलीस वेळी अवेळी फेऱ्या मारतात का ?
४. बागेत दिव्यांची सोय ( गैरसोय !) आहे का ?

फोटोवरून काही समजत नाही तेंवा खुलासा करावा ....

रेवती's picture

17 Dec 2012 - 8:42 pm | रेवती

जरा चार पाच ओळी आणखी लिहायच्यात की हो ताई!
फोटू चांगलेच आलेत. आता हे उद्यान असेच नेहमी स्वच्छ राहो म्हणजे मिळवली.
पाच रू. शुल्क घेतात का? घेऊ दे! स्वच्छ ठेवा म्हणजे झालं.
@तर्रीसाहेब, आता जर शुल्क असेल तर तृतीयपंथींनाही शुल्क असेल असे वाटते म्हणून ते फिरकणार नाहीत अशी आशा. ;) पिण्याच्या पाण्याबरोबर स्वच्छतागृहांचीही सोय हवी असे वाटते.

हुकुमीएक्का's picture

17 Dec 2012 - 11:05 pm | हुकुमीएक्का

फोटो अतिशय छान आलेत . . . पुण्यात एव्हडे छान उद्यान आहे हे माहीत नव्हते . . . धन्यवाद . . :)

मुंबईत आहे असलं उद्यान. पैसे देउन येतात म्हणुन पक्षी जसे तारेवर बसतात तसे एकमेकाशेजारी शंभरवर जोडपी बसतात अन .......
तरीही फोटो छान आहेत. माहितीबद्दल धन्यवाद.

मुम्बैत असले उद्यान कोठे आहे सांगाल का?

स्पंदना's picture

23 Dec 2012 - 11:48 am | स्पंदना

हिरानंदानी. लवर्स गार्डन्च म्हणतात तिला.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Dec 2012 - 12:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर उद्द्यान !

'कोई' माश्यांमुळे जपानी टच आलाय... हा बहूतेक 'ओकायामा' चा प्रभाव असावा. या माश्यांना पुर्वेकडे (जपान, चीन ई. मध्ये) शांती, सुबत्ता आणि प्रेमाचे प्रतिक समजतात.

एकेक फोटो उघडणं प्रयास आहे