गाभा:
कै .बाळासाहेबांच्या स्मारका साठी शिवाजी पार्क असे सुचवले गेले पण त्याला मैदान बचाव समितीने विरोध दर्शवला ..
मग कोहिनूर मिल असे सुचवले गेले व त्याला पर्याय म्हणून इंदू मिल चे नाव पुढे आले.
इंदू मिल म्हणताच सारी आंबेडकरी जनता अस्वस्थ झाली..
दादर स्टेशन ला माननीय कै .बाळासाहेबांचे नाव देण्याचा प्रस्ताव कोन्ग्र्स कडून पुढे आला ..
श्री. रामदास आठवले यांनी .काँग्रेसच्या नयना सेठ आणि मनसेचे
संदीप देशपांडेंचं डोकं फिरलं असून त्यांना वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती
करावं अशी प्रतिक्रिया इंदू मिलच्या स्मारकाप्रकरणी व्यक्त केली ....
तसेच तसंच 29 नोव्हेंबरला संसदेवर मोर्चा काढणार असल्याचंही
त्यांनी सांगितलंय...
कुठे असावे माननीय कै .बाळासाहेबांचे स्मारक???
प्रतिक्रिया
23 Nov 2012 - 7:11 pm | कपिलमुनी
असे माझे मत आहे
23 Nov 2012 - 9:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>> कुठे असावे माननीय कै .बाळासाहेबांचे स्मारक ???
शिवसैनिकांना वाटतंय ना, स्मारक शिवाजी पार्कात व्हावं तर तिथे व्हावं.
इंदू मिल, कोहीनूर मिल, इथे स्मारक करा किंवा अन्यत्र कुठे करा, असा वाद बरेच दिवस चालू राहील असे वाटते, पण तसे होऊ नये.
शिवाजी पार्क ज्यांनी प्रत्यक्ष पाहिलं असेल तर मला एक माहिती हवी होती तिथे आणखी कोणा कोणाचे पुतळे उभारले गेले आहेत. [म्हणजे आहेत का ?] आणि आता मैदान बचाव समितीचा विरोध का आहे ?
नवी मुंबईतील विमानतळाला बाळासाहेबांचं नाव द्यावं अशी एक मागणी वाचण्यात आली. नरीमन किनारपट्टीच्या महामार्गाला साहेबांचं नाव द्यावं असंही वाचण्यात आलं. असो.
-दिलीप बिरुटे
23 Nov 2012 - 9:07 pm | सोत्रि
शिवसेना भवन हेच एक स्मारक का होउ शकत नाही?
- (प्रश्न पडलेला) सोकाजी
23 Nov 2012 - 11:25 pm | यश पालकर
बाळासाहेबांच राजकारण नेहमी सर्वांनी पसंद केल पण आता बाळासाहेबांवर राजकारण होऊ नये असाच वाटत.
बाळासाहेब नेहमीच प्रत्येकाच्या मनात राहतील त्यासाठी स्मारक असावच अस नाही आहे. दादरच नाव नेहमी दादर राहील हे बाळासाहेबांच वाक्य आहे मग आता त्याच नाव दादरला देन कितपत योग्य ठरेल . बाळासाहेब नेहमी आपल्या कृतीतून दिसले पाहिजेत स्मारकरुपी नाहीत.
24 Nov 2012 - 6:42 am | खटासि खट
धागाकर्त्याने पूर्ण माहीती द्यावी. श्री मनोहर जोशी यांचे स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर असलेले प्रेम पाहता कोहीनूर भवन इथे स्मारक झाल्यास सर आनंदाने जागा देतील असा एक प्रस्ताव काल रा. रा. निखील वागळे यांनी आयबीएन लोकमत वाहीनीवरून सांगितला. कोहीनूर मिलची जागाही त्यांनी खरेदी केलेली असल्याने आणि मराठी लोकांच्या हक्कासाठी राजसाहेब अत्यंत आग्रही असल्याने तिथे स्मारक व्हावे असाही प्रस्ताव आहे म्हणे.
24 Nov 2012 - 1:37 pm | सुहास झेले
काल बाबासाहेब पुरंदरे आयबीएन लोकमतच्या मुलाखतीत ह्या स्मारक विषयावर बोलले की, थोर माणसांचे विचार अत्तरासारखे केवळ हातावर लावायचे नाहीत, तर ते आपल्या रक्तात भिनले पाहिजेत. पुस्तके माणसांच्या कपाटात ठेवा, लाकडी कपाटात नव्हे.....असं सांगणाऱ्या बाळासाहेबांचे सिमेंट-दगडांचे स्मारक...श्या :( :(
24 Nov 2012 - 2:29 pm | स्पा
एक काम करता येईल मुंबईतल्या सगळ्या थोर पुरुषांची स्मारक सरळ इंदू मिल मध्ये हलवा
त्यामुळे अनेक गोष्टी होतील .
१. सगळे खुश होतील ,कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत .
२. मुंबईतली बरीच जागा वाचेल
३. इंदू मिल ला कडक सिक्युरिटी द्यावी , म्हणजे सर्व स्मारकांच एकत्रित रक्षण होईल
४. तिकीट लावून " मादाम तुसा " सारखे "स्मारक भवन " सर्वांना दाखवता येईल , त्याने सरकार ला थोडेफार पैसे देखील सुटतील
५. हे स्मारक अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज असे अनेक मजल्यांचे असल्यास भविष्यात अनेक वर्ष यात अनेक मान्यवर व्यक्ती सामावल्या जातील :P
24 Nov 2012 - 6:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मा.मुख्यमंत्री म्हणतात '' शिवाजी पार्कात बाळासाहेबांचं स्मारक शक्य नाही !''
स्मारकाचा मुद्दा हा भावनिक मुद्दा असल्यामुळे मा.साहेब, तुम्ही भाजप-सेनेला
सत्तेच्या दिशेने प्रवास करायला सांगत आहात काय ?
-दिलीप बिरुटे
25 Nov 2012 - 9:21 am | श्री गावसेना प्रमुख
का नाही?
देतील थोडे दिवस थांबा
24 Nov 2012 - 7:06 pm | वेताळ
कारण मातोश्री म्हटले कि बाळासाहेब व मांसाहेब आठवतात. मातोश्री चा दरारा खुप मोठा होता. बाळासाहेबाना भेटायचे म्हटले कि लोक मातोश्रीवरच भेटु शकत होते.मग आता बाळासाहेबाना भेटायचे तर सर्वानी मातोश्रीवरच जायला हवे.
25 Nov 2012 - 9:44 am | प्रभाकर पेठकर
स्मारक 'मनांत' असावे. 'कृती'त दिसावे.
25 Nov 2012 - 1:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खालील मागण्या* पाहता शिवसेनेच्या नेत्यांनी महाराष्ट्रातच एकच असं भव्य स्मारक उभारावं की शिवसैनिक आणि महाराष्ट्रातील त्यांच्यावर प्रेम करणा-यांना एक समाधान मिळालं पाहिजे, असं वाटतं. रस्त्याला नको की गावागावात पुतळे नको. बाकी, आपल्या वाटण्याला तसाही काय अर्थ आहे, म्हणा....!
___________________________________________________________________
मागण्या * विविध राजकीय पक्ष , शिवसेनेकडून आलेल्या सूचना [सौजन्य मटा.]
* शिवाजी पार्क येथे बाळासाहेबांचे स्मारक बांधा - मनोहर जोशी , शिवसेना नेते
* मुंबई - गोवा कोस्टल माहामार्गाला बाळासाहेबांचे नाव द्या . - यशोधर फणसे , नगरसेवक ( शिवसेना )
* दक्षिण मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकाला बाळासाहेबांचे नाव द्या . - रमेश कोरगावकर , नगरसेवक , ( शिवसेना )
* शालेय पुस्तकांमध्ये बाळासाहेबांवरील धड्याचा समावेश करा . - राजू पेडणेकर , नगरसेवक ( शिवसेना )
* बाळासाहेबांच्या स्मरणार्थ आंतरराष्ट्रीय संग्रहालय बांधा . - शिवसेना
* महापालिकेच्या मुख्यालयाजवळ बाळासाहेबांचा पुतळा उभारा . - शिवसेना
* महापौर बंगल्यात बाळासाहेबांचे स्मारक बांधण्यात यावे . - छगन भुजबळ , सार्वजनिक बांधकाम मंत्री
* मुंबईतील महापालिकांच्या शाळेत बाळासाहेबांच्या नावे वर्त्कृत्व स्पर्धा सुरू करा . - चेतन कदम , नगरसेवक ( मनसे )
* मुंबईतील सर्वात महत्त्वाचे रेल्वे स्थानक असलेल्या दादर रेल्वे स्थानकालाच बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या . - नयना सेठ , नगरसेविका ( काँग्रेस )
* इंदू मिलच्या विस्तृत अशा १२ एकर जागेवर बाळासाहेबांच्या आठवणींशी संबंधित संग्रहालय बांधा . - सुनील मोरे , नगरसेवक ( काँग्रेस )
* नवी मुंबईतील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेबांचे नाव द्या . - दिलीप पटेल , भाजप .
* पुण्यात बाळासाहेबांचे स्मारक व्हावे . - मंगेश तेंडुलकर , साहित्यिक
* ठाणे , औरंगाबाद , अहमदनगर महापालिकांमध्ये बाळासाहेबांचे पुतळे उभारण्यास संमती
25 Nov 2012 - 1:13 pm | श्री गावसेना प्रमुख
हे तर भारतरत्न ज्यांना हवाय किंवा दिला जावा अशां लोकांच्या यादी सारख वाढत चाललय,
26 Nov 2012 - 6:10 am | विकास
बाकी पुतळे-रस्ते - पुस्तकातला धडा वगैरे स्मारकाचे त्यांना काय करायचे ते करूंदेत, पण खालील सुचनेस नक्कीच अनुमोदनः
मुंबईतील महापालिकांच्या शाळेत बाळासाहेबांच्या नावे वर्त्कृत्व स्पर्धा सुरू करा . - चेतन कदम , नगरसेवक ( मनसे )
25 Nov 2012 - 1:16 pm | श्री गावसेना प्रमुख
बाळासाहेबांच स्मारक महापौर बंगल्यात
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17358378.cms
26 Nov 2012 - 7:34 am | चिरोटा
शिवसेना
हीच मागणी योग्य वाटते.
मुंबई आंतरराष्ट्रीय शहर म्हणायला ठीक असले तरी सर्वप्रथम नजरेत भरतो तो शहराचा दिखाऊपणा/बकालपणा.स्वातंत्र्यानंतर राज्यात किती बघण्यासारखी आंतरराष्ट्रीय संग्रहालये,वास्तु, उद्याने,वाचनालये उभारली गेली हा संशोधनाचा विषय आहे.कुठल्याही प्रदेशाची ओळख असते ती अशा वास्तूंमधे, पुतळे,रस्त्यांच्या नावात नाही.