जखम मनाची ताजी असता

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जे न देखे रवी...
27 Jun 2008 - 10:37 pm

(अनुवादीत. कवी-समीर)

नयन माझे अश्रुनी भरले
सांगशी तू मला हंसण्या
जीवन माझे नैराशाने भरले
सांगशी तू मला ते विसरण्या

दिवस माझे कठिण झाले
काय करू मी आता
मन माझे उचंबळून आले
दाह सहन करता करता
जखम मनाची ताजी असता
दुषणे देतोस कसा आता

कसे बरे जीवनामधे
प्रीति करीती लोक
नावे ठेवूनी सच्छिलतेला
हेवा करीती लोक
विझूनी गेली आग असता
जाळ लाविती लोक

कधी जेव्हा स्वप्ने पाहिली
मिळाली मृगजळे मला
कधी जेव्हा गर्दी पाहिली
मिळाला एकांत मला
चोहोबाजूला धूरच धूरच
वणवा शोधिशी कसा

जखम मनाची ताजी असता
दुषणे देतोस कसा

(ही माझी अनुवादीत कविता वाचून डॉ.दिलीप बिरुटे यांनी "मिसळपाव" ह्या बहुचर्चीत संस्थळावर लिहिण्याची शिफारस केली.ते आठवलं)

श्रीकृष्ण सामंत

कविता

प्रतिक्रिया

छान अनुवाद केला आहे...

पण प्रांजळ मत सांगायचं तर शब्दशः भाषांतर झाले आहे मुळ हिंदी गीताचे... मुळ शब्दांशी थोडीफार फारकत घेतली असती तर कदाचित अजुन चांगली रचना झाली असती...

पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

श्रीकृष्ण सामंत's picture

29 Jun 2008 - 12:48 am | श्रीकृष्ण सामंत

फटूजी,
प्रशंसे बद्दल आभार.
घडता घडता घडेल ते घडेल अशी माझी वृत्ति असल्याने तसं होतं
कोकणातला मी . रापण लावल्यावर जाळ्यात येतात ते मासे-शब्द्-मनात येतात.
आपल्याला कुठे कस लावायला जायचंय.

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com