(अनुवादीत. कवी-समीर)
नयन माझे अश्रुनी भरले
सांगशी तू मला हंसण्या
जीवन माझे नैराशाने भरले
सांगशी तू मला ते विसरण्या
दिवस माझे कठिण झाले
काय करू मी आता
मन माझे उचंबळून आले
दाह सहन करता करता
जखम मनाची ताजी असता
दुषणे देतोस कसा आता
कसे बरे जीवनामधे
प्रीति करीती लोक
नावे ठेवूनी सच्छिलतेला
हेवा करीती लोक
विझूनी गेली आग असता
जाळ लाविती लोक
कधी जेव्हा स्वप्ने पाहिली
मिळाली मृगजळे मला
कधी जेव्हा गर्दी पाहिली
मिळाला एकांत मला
चोहोबाजूला धूरच धूरच
वणवा शोधिशी कसा
जखम मनाची ताजी असता
दुषणे देतोस कसा
(ही माझी अनुवादीत कविता वाचून डॉ.दिलीप बिरुटे यांनी "मिसळपाव" ह्या बहुचर्चीत संस्थळावर लिहिण्याची शिफारस केली.ते आठवलं)
श्रीकृष्ण सामंत
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1942
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
आँख हैं भरी भरी और तुम...
आभार
In reply to आँख हैं भरी भरी और तुम... by फटू