रख्स-ए-बिस्मिल (DANCE OF A WOUNDED)

हरवलेल्या जहाजाचा कप्तान's picture
हरवलेल्या जहाजा... in जे न देखे रवी...
31 Oct 2012 - 7:44 am

या शहरात,
इंद्रियांची भूमिका
विस्तारते क्षणोक्षणी.
देह शिणत नाही.
पण, जीव शिणतो नेमाने.

इथेही आहेत
वारुळांचे चक्रव्युह,
सनातन वेदनांचे
अमानुष पर्याय,
गिधाडं-प्रेतांच्या
बेगुमान वस्त्या,
सावलीला दिवस
आणि
करुणेला रात्र.

इथे
काळोखाच्या ओठांतून,
बर्फाळ प्रार्थनाही
वाहत जातात,
अवरोधाच्या उगमाकडे.
भळाभळा अस्तित्व सांडत
गर्दी जगत रहाते,
होकार नकारांमध्ये
अडकलेल्या
ऐतिहासिक आवृत्त्या...

इथल्या किंकाळीतच,
नग्न आत्म्याचा देह
वस्रांसकट जन्म घेतो.
भयमग्न आवेगात
देह नग्न होतो.
आत्मा वस्र घेतो...

या गर्दीतच माझाही
चेहरा असतो हुबेहूब.
सुरा घेतलेले तरुण आणि
फुलं माळलेल्या बायकांमध्ये.
आणि मी असतो,
काळोख जगणारया शरीरात,
भूकेच्या टोलांवर,
जीवाला झोके देत.
सर्वांसह, स्वतःच्या
खुनाचे निर्विकार
कट रचत.

मनातल्या मनात मात्र,
पलिकडचे डोळे
खुणावून सांगतात,
'हे संदर्भ मिटले जावेत.
ही नियती पुसली जावी.
मौनाची रौद्र गाज
रक्तातून कानी यावी.
पैलु पाडलेल्या मुठींना
शुळांचे कोंभ फुटावे.
बंद देहाच्या अवयवांनी
दार मोकळे करावे.
माझाही व्हावा सर्वनाश
माझ्याशिवाय.'

तेव्हा शुभ्र शांततेच्या
एकांतात खुंट तोडुन,
बेहोष वेदनेत मी
सुगंध नाचवत नेईन,
क्षितिजाच्या पारावर
जिवंत होईल,
रख्स-ए-बिस्मिल!

a
(पूर्वप्रकाशित: नवाक्षर दर्शन, जुलै २०१२)

रौद्ररसकविता

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

31 Oct 2012 - 11:03 am | अत्रुप्त आत्मा

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

31 Oct 2012 - 11:54 am | मिसळलेला काव्यप्रेमी

तुफान आहे....
हि रचना अनुवाद आहे? कि आपणचं लिहीली आहे?

हरवलेल्या जहाजाचा कप्तान's picture

31 Oct 2012 - 12:31 pm | हरवलेल्या जहाजा...

हा अनुवाद नाही. ही माझीच कविता आहे.

कवितानागेश's picture

31 Oct 2012 - 2:52 pm | कवितानागेश

मला शेवटचे कडवे कळले...

तर्री's picture

31 Oct 2012 - 12:36 pm | तर्री

काही चमकदार शब्द रचना आहेत पण तरीही कविता काहीशी शब्द बंबाळ वाटली.
नाही आवडली असे मात्र नाही.

संजय क्षीरसागर's picture

31 Oct 2012 - 1:27 pm | संजय क्षीरसागर

अआ अनुमोदन!

निरन्जन वहालेकर's picture

3 Nov 2012 - 9:01 pm | निरन्जन वहालेकर

काहीच समजले नाही बुवा.क्षमस्व.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Nov 2012 - 10:15 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्तमौला जगताना आपण हस्तिदंती मनोर्‍यात राहून चालत नाही. कदाचित जगणंच मुश्कील होऊन जातं.

चित्रं कवितेसाठी चपखल वाटलं; ते ही आवडलं.