उघड्या खांद्यावरती सखये--

पुष्कराज's picture
पुष्कराज in जे न देखे रवी...
24 Jun 2008 - 7:12 pm

उघड्या खांद्यावरती सखये
जरा ओढ्णी ओढून घे तू
नजर विखारी असते सखये
त्या नजरेला जाणून घे तू

साडी जेव्हा नेसतेस तू
गाली जेव्हा हासतेस तू
शततारा त्या जळूनी जाती
अशी अप्सरा वाटतेस तू

सुंदरता तू नकोस लपवू
परि मोकळी नकोस उधळू
डंख मारण्या सगळे तत्पर
एवढेच बघ जाणून घे तू

वीज नभातील लखलख्णारी
सहज जाळ्ते कोणालाही
परि ती उतरून येता खाली
सखे शेवटी विझूनी जाई

शाप लज्जा नाही सखये
सौंदर्याची ही अभीव्यक्ती
सखे कमी तू नाहीस कोठे
जाणून घे तू तव स्त्री शक्ती

कविताआस्वाद

प्रतिक्रिया

शितल's picture

24 Jun 2008 - 7:16 pm | शितल

मस्तच कविता केली आहे,
हल्लीच्या नट्याना तर काय बोलावे तेच कळत नाही.
शाप लज्जा नाही सखये
सौंदर्याची ही अभीव्यक्ती
सखे कमी तू नाहीस कोठे
जाणून घे तू तव स्त्री शक्ती

अविनाश ओगले's picture

24 Jun 2008 - 8:33 pm | अविनाश ओगले

सुंदर कविता...

llपुण्याचे पेशवेll's picture

25 Jun 2008 - 2:13 am | llपुण्याचे पेशवेll

साडी जेव्हा नेसतेस तू
गाली जेव्हा हासतेस तू
शततारा त्या जळूनी जाती
अशी अप्सरा वाटतेस तू


झक्कासच..

शाप लज्जा नाही सखये
सौंदर्याची ही अभीव्यक्ती
सखे कमी तू नाहीस कोठे
जाणून घे तू तव स्त्री शक्ती

सुंदरच..
पुण्याचे पेशवे

भडकमकर मास्तर's picture

25 Jun 2008 - 2:30 am | भडकमकर मास्तर

सुंदरता तू नकोस लपवू
परि मोकळी नकोस उधळू

खूपशा ओळी छान आहेत..
कविता आवडली..
..
विखारी नजरा टाळण्यासाठी , किंवा डंख मारणार्‍या लोकांपासून वाचण्यासाठी तू खांद्यावरून ओढणी घे, हे ठीक
पण त्यामुळे तिला स्त्रीशक्तीची जाणीव कशी होणार बुवा ? कपडे आणि स्त्रीशक्तीची जाणीव या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत असे वाटते...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

पुष्कराज's picture

29 Jun 2008 - 9:40 am | पुष्कराज

मास्तर ,माझ वयक्तिक निरीक्षण अस आहे हल्ली अनेक मुलींना अस वाट्त की आपण तंग वा कमी कपडे घातले की लोक
आपल्याकडे बघतिल ,पण मुळातच ती वासना असेल हे त्यांच्या लक्षात येत नाही, स्त्री खरतर पुरुषापेक्षा कणखर आहे,
पुरुष पैशाने समृद्धी आणतही आसेल पण स्त्री समाज घडवते, आपल्यातली निर्मितीची ताकद स्त्रीयांनी ओळ्खली पाहीजे,
मला हे म्हणायच आहे

फटू's picture

25 Jun 2008 - 7:03 am | फटू

उघड्या खांद्यावरती सखये
जरा ओढ्णी ओढून घे तू
नजर विखारी असते सखये
त्या नजरेला जाणून घे तू

पण हल्लीच्या पोरीबाळींना हे कळतंय कुठे...

बाकी कविता छान लिहिली आहे तुम्ही...

पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

अरुण मनोहर's picture

25 Jun 2008 - 9:10 am | अरुण मनोहर

आवडली.

शेखर's picture

25 Jun 2008 - 9:28 am | शेखर

वीज नभातील लखलख्णारी
सहज जाळ्ते कोणालाही
परि ती उतरून येता खाली
सखे शेवटी विझूनी जाई

ह्या ओळी आवडल्या..

शेखर

विसोबा खेचर's picture

25 Jun 2008 - 11:02 am | विसोबा खेचर

सुंदरता तू नकोस लपवू
परि मोकळी नकोस उधळू
डंख मारण्या सगळे तत्पर
एवढेच बघ जाणून घे तू

वा! ह्या ओळी आवडल्या. सुंदर काव्य!

तात्या.

प्राजु's picture

25 Jun 2008 - 11:05 am | प्राजु

सुंदर काव्य..

शाप लज्जा नाही सखये
सौंदर्याची ही अभीव्यक्ती
सखे कमी तू नाहीस कोठे
जाणून घे तू तव स्त्री शक्ती

हे खूप सुंदर..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

ध्रुव's picture

25 Jun 2008 - 11:24 am | ध्रुव

आवडली.
--
ध्रुव

चाणक्य's picture

25 Jun 2008 - 11:26 am | चाणक्य

आवडली कविता, छान आहे

चाणक्य