एक नाव
जिचे मी अस्तित्व आहे
जिची मी ओळख आहे
एक नाव
जिचे मी स्वप्न आहे
जिची मी इच्छा आन्कांक्षा आहे
एक नाव
जिच्या आयुष्यातील मी एक आनंद आहे
एक नाव
जिने मला हसायला शिकवले अन रडायला शिकवले
एक नाव
जी माझ्या दु:खात बुडालेली आहे
एक नाव
जिच्या ओंजळीत आकाशही ठेंगण आहे
एक नाव
जी मला प्रत्येक संकटातून मार्ग काढून जपत आहे
एक नाव
जिने मला ह्या जगात आणल्याचे उपकार आहे
हो,
तेच एक नाव
जिचा मी प्राण आहे
फक्त आणि फक्त
" आई "
प्रतिक्रिया
17 Aug 2012 - 8:31 am | लीलाधर
फारच सुंदर करुण काव्य रचले गेले आहे. :)
17 Aug 2012 - 12:34 pm | पक पक पक
18 Aug 2012 - 2:48 pm | ज्ञानराम
----^----