स्फुंदणे कोंदणे कोंडलेल्या स्वरांचे
मुके; बोलके आज झाले कसे
मिळाली दिशा बंद वार्यास जेणे
उधाणून आले जिणे देखणे
एक होता निखारा उरी कोवळा
स्नेहवातीपरी जाहला मोकळा
साचलेले उतू वाहिले अन तराणे
झणी भंगला दाटलेला गळा
रेशमी कोष अंगी तया लाभले
रोमरंध्रातले क्लेश आलोचले
व्यापलेल्या गळाल्या उणीवा कळा
रास राशीत नाचला कृष्ण सावळा
....................अज्ञात
प्रतिक्रिया
10 Aug 2012 - 9:02 pm | प्रचेतस
सुंदर.
10 Aug 2012 - 11:00 pm | पक पक पक
झक्कास...... :) आवड्ले...
10 Aug 2012 - 11:41 pm | अत्रुप्त आत्मा