निवडुंग

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
14 May 2012 - 10:02 am

रुतल्या कोर-कपारी दारी
अगणित वांछा संसारी
निवडुंग कुंपणी मी तैसा
चाकरी करी खडकाळ तिरी

निश्चल काटेरी खोड असे
माळल्या विशाखा संभारी
राखणे देखणे बहुतांचे
अंकीत होतसे सहज उरी

निरपेक्ष साधना जन्मभरी
जड देह उभा; जळ गाभारी
अवकाळहि माझा काळ नसे
मी चिरंजीव तव दरबारी

...............अज्ञात

शांतरसकविता

प्रतिक्रिया

सुंदर कविता.
निवडुंगाचं रूपक छान जमलय.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

14 May 2012 - 10:41 am | मिसळलेला काव्यप्रेमी

सुंदर रचना.
आवडली.

यकु's picture

14 May 2012 - 10:50 pm | यकु

खरोखर काटेरी निवडूंग किती तरी काळापासून तप करीत उभा असल्याची प्रतिमा निर्माण झाली.
सुंदरच.