जुनी गोष्ट आहे.
कन्या इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होती..
व लग्न हि ठरले होते तिचे.
रात्री जेवण झाले की आम्ही लॉग राईडला जात असू ..
दिवसभरातल्या गप्पा..पी.जे मजा यायची..
घरी जाताना कुठेतरी कॉफी असा कार्य क्रम असायचा..
मुलगी नव्या पिढीतली असल्याने सी.सी.डी वा तत्सम मध्ये कॉफी पिण्यास जाण्याचा आग्रह करीत असे..
मुळात मला कॉफी आवडत नाही..आम्ही चहा बाज..
त्यांतून जगातला सुंदर चहा फुगेवाडीच्या अशोक च्या टपरीवर मिळतो असे ठाम मत..
खर
मला म्हणजे कॉफी शॉप ही नवी संस्कृती फारशी पसंत नाहि..नव्यास विरोध असे
नाही पण कॉफीच्या कपाला अॅम्बियन्स च्या नावाखाली ७०-८०रुपये मोजणे मला
पटत नाही..त्या मुळे मी ते टाळत असे.. असो.
शेवटी कन्यच्या आग्रहा खातर आमची फौज सी.सी.डीला गेली..
मुलीचा व मैत्रिणीचा या ठिकाणी राबता असावा.कारण ऑर्डर घेणा~या मुलाने तिला ओळखीचे स्मित हास्य दिले.
हिने व कन्याने कॉफी मागवली व मी चहा..
व आम्ही गप्पात रंगलो..
थोड्याच वेळात त्या युवकाने कॉफी व चहा सर्व्ह केला.
चहा विदेशी पद्धतीने दिला होता म्हणजे चहा निराळा साखर व दूध निराळे..
मी
पण चहाच्या बॅग्ज्स डीप डीप करत होतो...कपाला हात लावल्यावर मला कप गरम
लागला नाही म्हणून मी चहात बोट बुडवले तर चहा अगदी कोमट व पिण्या योग्य
नसल्याचे ध्यानात आले..
त्या मुळे मी त्या मुलास हाक मारली व चहा कोमट असल्याचे सांगितले.
त्या वर त्याने "बहुतेक हीटर ची कॉइल गेली असेल..व दूध तर गरम आहे " असे सांगू लागला.
मला
त्या सबबी पटेनात..एक तर आमचे उभे आयुष्य कामगारा मधे गेलेले..किती अडचणी
असल्या तरी त्या वर मात करीत जॉब अचूक झालाच पाहिजे अश्या "स्कूल ऑफ
थॉट्स" मधून मी आलेला असल्याने मी त्याला सबबी न सांगणे..अडचणीवर मात करणे
ग्राहक व सेवा यावर १-दीड मिनिटात सुनावले व जर चहा गरम होत नसेल तर हरकत
नाही ऑर्डर कॅन्सल करा असे म्हणून विषय संपवला..
त्याने पण तो गार चहा उचलला व निघून गेला...
तो गेल्यावर कन्या भडकली व म्हणाली.." पपा तुम्ही म्हणजे न..किती लेक्चर दिले त्याला...
हे
ऐकल्यावर आर्यपत्नी तरी कशी संधी सोडेल? कन्येच्या सुरात सुर मिसळतं तिची
री ओढत त्या वदल्या "नाही तर काय..पपाला कुठे काय बोलावे समजतच नाही..
नुसते चहा गार आहे गरम करून आण इतके बोलायचे सोडून बसले लेक्चर देत.."
त्या
वर मी काहीच बोललो नाही..पण माझी प्रतिक्रिया खुप उत्स्फूर्त/प्रतिक्षिप्त
होती..का कुणास ठाऊक सबबी सांगणारे डोक्यात जातात..थोडे शांत झाल्यावर
मात्र मला हि पटले इतके बोलायची काही गरज नव्हती..
शेवटी दोघीची कॉफी पिणे संपल्यावर बिलाची वाट पाहतं बसलो..
मी हिला सांगितले तुम्ही बिल द्या तो पर्यंत मी कार इकडे आणतो..व चालू पडलो..
चार पाउले चाललो नसेल तेव्हढ्यात मुलीची हाक आली मागे वळून पाहिले तर त्या युवकाने चहा आणलेला होता..
मी
परत फिरलो..चहा व्यवस्थित गरम होता.त्याला थ्यांक्स केले व चहा घेतला व
बिल देऊन आम्ही बाहेर पडलो.मला खात्री होती की कामगारा ने मनात आणले की तो
अडचणीवर मात करू शकतो..मात्र मनात नसेल तर ...
पुढे कन्यचे लग्न झाले व ति सासरी गेली.त्या मुळे सारेच बंद झाले..
पुढे १-१.१/२ वर्षानंतर ति व जावई भारतात आले.
एका दुपारी बहिणीची मुलगी पण राहायला आली होती..गप्पा मारताना एकदम सी.सी.डी ला जायचे ठरले.
सी.सी.डी म्हटल्यावर हि व मुलगी माझ्याकडे बघून हसले व मलाही तो जुना प्रसंग आठवला.
कपडे
बदलून सारे तयार होत होतो तितक्यात हिने मुली समोर दादा गिरी करत मला
दटावले व जावया समोर लेक्चर बाजी नको.चहा गार असेल तर मला सांगा मी
व्यवस्था करते असा दम भरला.
च्यायला..बायका कुठे कसे उट्टे काढतील याचा नेम नसतो.
आम्ही
सी.सी.डी च्या कॉफी शॉप मध्ये गेलो..५-५.३० चा सुमार असल्याने पॅटिओ मधे न
बसता आत ए.सी त बसलो..मी मेनू कार्ड चाळत होतो.तेव्हढ्या मुलगी समोर उभ्या
असलेल्या एक्सेकुटिव्ह लुक असलेल्या युवकाशी बोलत असल्याचे लक्षात
आले..साधारण तो तिला हल्ली दिसत नाहीत व त्यावर ति सांगत होती की लग्न
झाले असून भारतात नसते अश्या स्वरूपाचे बोलणे काना वर आले..त्याने पण
माझ्या कडे बघून एक स्मित हास्य केले व मी पण परत फेड केली.
ओळखींचा वाटत होता पण नेमका कोण लक्षात येईना.
तो गेल्यावर कन्या म्हणाली पपा .ओळखला का याला? तुम्ही त्याला चहा गार दिला म्हणून लेक्चर दिले तो..आता हा या ब्रॅंच चा मॅनेजर आहे.
मी बर म्हतले.
आम्ही ऑर्डर दिली मी चहाच मागवला.
चहा मात्र यावेळी चांगला गरम होता..
गप्पा टप्पा संपल्यावर बिल आले मी बिल चेक करून पैसे काढले तेव्हढ्यात तो युवक समोर आला व मला म्हणाला..
सर चहा मनासारखा गरम होता ना?
मी ओळखले की तो युवक हि तो प्रसंग विसरलेला नाही..
हो मस्त मजा आली चहा पिताना.. मी त्याला हसत म्हटले.
तुम्हाला आठवते का एकदा चहा गार होता म्हणून तुम्ही मला काही टिप्स दिल्या होत्या...
संभाषण नेमके कुठल्या दिशेने जाणार न कळल्याने मी सावधपणे म्हटले ..हो चहा त्या वेळी फारच गार होता म्हणून जरा चिडलो पण होतो..
त्या
वर तो हसत म्हणाला..पण सर त्या प्रसंगा नंतर व टिप्स मुळे मी मात्र
बदललो..कामा कडे बघण्याचा माझा नजरीया बदलला. व मीजास्त इन्वॉल्व होऊन काम
करू लागलो...
माझ्यातला बदल म~नेजमेंटच्या पण लक्षात आला व काही महिन्या पूर्वीच मला प्रमोशन मिळाले व मी या ब्रांच्यचा इनचार्ज आहे....
ते ऐकून मला मात्र खूपं बरे वाटले.. अनेक कामगारांना मी शिकवले होते..नाठाळात बदल करून कामास उद्युक्त केले होते..
वा अभिनंदन ...असे म्हणून मी त्याच्या कडे बघून हसलो..व पैसे बिला जवळ ठेवले.
पुढे तो म्हणाला.. सर मी आपणास एक विनंती करतो की आजची ट्रीट तुमच्या परिवारास माझ्या कडुन..कृपया पैसे देऊ नका..व ट्रीट कबुल करा..
मी पण काहि न बोलता त्याच्या विनंतीस मान देऊन पैसे खिशात ठेवले..
खूपं बरे वाटत होते..
जाताना त्याच्या पाठी वर एक कौतुकाची थाप मारत कीप इट अप असे म्हणत बाहेर पडलो.
प्रतिक्रिया
4 May 2012 - 11:30 am | मुक्त विहारि
हे असेच तूमच्या सारखे साहेब मला पण भेटले....
घरकी मुर्गी डाल बराबर...
आणि
स्वामी तिन्ही जगाचा, पत्नी-पुढे नंदी बैल.
.... ही जगरहाटी आहे... त्यामूळेच तर आपले पाय जमीनीवर राहतात..
4 May 2012 - 11:32 am | स्पा
जरा अतिरंजक वाटतेय पण गोष्ट म्हणून आवडली
4 May 2012 - 6:59 pm | विश्वनाथ मेहेंदळे
इतके सिनिकल असू नये माणसाने...
असो, कुणी कसे.... ;-)
5 May 2012 - 12:41 am | आशु जोग
मग तुम्ही लिहा की अशी गोष्ट
तुमाला नक्की जमेल
पण अशी खिळवून ठेवणारी हवी
२, ४ पात्र अॅड करा.
(कुणाला सांगू नका मी टिप्स दिल्या म्हणून)
4 May 2012 - 11:34 am | कुंदन
चहा आवडला काका , पण त्या एकोळी जिलब्या नाही ब्वॉ आवडत आपल्याला.
4 May 2012 - 11:47 am | JAGOMOHANPYARE
छान
4 May 2012 - 11:50 am | परिकथेतील राजकुमार
ओक्के !
4 May 2012 - 12:15 pm | प्रकाश घाटपांडे
म्हनुन परा बिअर खोलायच्या आदुगर थंड आहे कि नाही हे हात लावुन चेक करतो. नंतर बूच खोलल्यावर वांधा नको!
4 May 2012 - 1:20 pm | संजय क्षीरसागर
पण मग वेटरचा मॅनेजर कसा होणार?
4 May 2012 - 1:24 pm | नाना चेंगट
पराला बिअर चढल्यावर (कोण रे म्हणतो की कधी उतरते?) काहीच भान रहात नाही.
त्यामुळे भरमसाट टिप देतो.
असे कळले आहे की तो वेटर आता हाटीलच खरेदी करणार आहे.
4 May 2012 - 1:32 pm | परिकथेतील राजकुमार
हे माझे कौतुक चालू आहे का चारित्र्यहनन ते लक्षात आले की प्रतिक्रिया देईन.
4 May 2012 - 2:23 pm | आदिजोशी
चारित्र्यहनन शब्द मनाला पार पार भिडला :)
5 May 2012 - 11:25 am | संजय क्षीरसागर
डायरेक्ट `कॅशच' देतो!
तुम्ही लेखकाचं पाहा त्यांनी प्रत्येक गोष्ट चेक करण्याची सवय लावून घेतलीये आणि बील माफ झाल्यावर कॅश खिशात ठेवली आहे त्यामुळे वेटरचा मॅनेजर झालायं!
4 May 2012 - 2:01 pm | बिपिन कार्यकर्ते
आणि मालक झाल्यावर तो सगळ्यात पहिल्यांदा पर्याला तिथून हाकलणार आहे. नाहीतर परा नवीन वेटरलाही अशाच टिपा देत राहील आणि मग तो नवीन वेटर या जुन्या वेटरला मालक म्हणून ओव्हरटेक करेल!
4 May 2012 - 2:06 pm | नाना चेंगट
सहमत आहे
पर्याला सगळे हाकलत असतात
बिचारा हा बार तो बार असा भटकत असतो
नशीब !! काय करणार तो तरी !!
4 May 2012 - 5:40 pm | राजो
"बार बार देखो... हजार बार देखो..." :)
4 May 2012 - 3:57 pm | संजय क्षीरसागर
म्हणून तर जास्त `टेक' केलेल्या माणसाला, यानी आज `ओव्हरटेक' केलीये म्हणतात आणि मग त्याला सुखरूप घरी पोहोचवायच काम कुणाला तरी `अंडरटेक' करावं लागतं
4 May 2012 - 6:19 pm | बॅटमॅन
हेहेहेहे वाचून टेकीस आलो :P
4 May 2012 - 11:51 am | चिरोटा
गोष्टीतून शिकण्यासारखे आहे.
विदेशी पद्धतीने चहा भारतातल्या हॉटेलात देणे मला वेडेपणाचे वाटते.शिवाय अनेक सी.सी.डी.मध्ये पाश्चात्य संगित का वाजवतात हे ही कळत नाही.
4 May 2012 - 12:34 pm | संजय क्षीरसागर
तुम्ही तीन गोष्टी एकदम साधल्यात:
सतत उत्स्फूर्ततेनं वागणार्या पुरूषांना अत्यंत निकटच्या स्त्रिवर्गानं कितीही नामोहरम केलं तरी त्यांनी उत्साह सोडू नये हे दाखवून दिलंत
आपण बरोबर असू तर मागे हटण्याची गरज नाही मग कुणीका मागे खेचेना आणि सीसीडी असो की बीबीसी, अजिबात सोडायच नाही, ....आणि
जो या सर्व अडथळ्यांची शर्यतपार करतो तो अंतीम विजयी ठरतो
पण एक गोष्ट सांगायची राहिली,
इतरांना त्याचं काही कौतुक नसतं मग त्यांची आपली पुन्हा रोजचीच गोष्ट सुरु होते!
4 May 2012 - 12:42 pm | रणजित चितळे
वाचुन खूप मजा आली.
..का कुणास ठाऊक सबबी सांगणारे डोक्यात जातात..
अगदी खरे आहे.
4 May 2012 - 12:49 pm | सानिकास्वप्निल
आवडले :)
4 May 2012 - 12:55 pm | प्रचेतस
धमाल किस्सा.
बाकी तो फुगेवाडीच्या अशोकचा चहा म्हणजे लाजवाब.
4 May 2012 - 8:58 pm | धन्या
बहुतेक आम्ही नाणेघाट सहलीला जाताना हा चहा घेतला होता. सहलीतील जाणकार प्रकाश टाकतीलच.
हे लेखन मुक्तक/कथा/स्फुट म्हणून आवडलं. वास्तवात असं होईल असं वाटत नाही.
5 May 2012 - 5:31 pm | इष्टुर फाकडा
लेख आवडला
4 May 2012 - 1:43 pm | प्रभाकर पेठकर
मला अज्जिबात अतिरंजीत वाटले नाही. मी ही अस्साच आहे.
चूकीच्या गोष्टी न विसरता नजरेत आणाव्यात. सेवेत फरक पडू शकतो.
सेवाभाव मनी नसलेले अनेक व्यावसायिक भेटतात. अगदी आश्चर्य वाटते. ही माणसे उपहारगृहासारख्या सेवा व्यवसायात टिकतातच कशी?
अनेकांना सल्ले देताना घरच्यांची नाराजी मी ही ओढाउन घेतली आहे. पत्नीला सुधारण्याच्या प्रयत्नात पडत नाही (एकतर तिचे ते {सुधारण्याचे} वय उलटून गेले आहे आणि संभाव्य 'दुष्परिणाम' टाळावेत असे माझे धोरण आहे.) पण मुलाला हमखास सांगतो,' हजार जणांना सांगितल्यावर निदान एकजण जरी बदलला तरी मी ते माझे यश समजतो.
अविनाशकुलकर्णीसाहेब,
तुम्ही केलेत ते योग्यच केलेत. फक्त तुम्ही भारच भाग्यवान आहात की समोरच्या व्यक्तीने त्याच्या व्यक्तिमत्वात झालेल्या सकारात्मक बदलाचे श्रेय आपणास दिले.
तुम्हालाही सांगावेसे वाटते 'किप इट अप.'
4 May 2012 - 2:18 pm | संजय क्षीरसागर
मग काय मजा?
पुलंनी म्हटलंय ते त्यांच्या अध्यात्मिक मित्राकडे गेले तेव्हा घरातल्या भिंतीवर त्यानं जरा सुद्धा मोकळी जागा सोडली नव्हती.
अनेकानेक गुरुंचे शिर्षासनातले, भस्मविलेपित, फासळ्या दाखवणारे, नुसत्या नजरेनं भस्म करतील असे, त्रिशूळावर बसून साधना करणारे इतके फोटो होते की दत्तानं अकरा गुरू केले असं ऐकिवात होतं पण या मित्रानं केलेले गुरू दत्तत्रेयानं पाहिले असते तर दोन्ही हाताची दाही बोटं तिन्ही तोंडात घातली असती.
पण उजव्या कोपर्यातला फोटो बघून मात्र पुलंना स्वतःला तोंडात बोट घालण्याची वेळ आली कारण त्या फोटोत मित्राची बायको त्याला नमस्कार करत होती!
सो डोंट गिव्ह अवे, कीप इट अप!
4 May 2012 - 6:35 pm | प्रदीप
समोरच्या व्यक्तिच्या व्यक्तिमत्वात बदल झाला हेच मुळात अत्यंत छान आहे. त्याने त्याचे श्रेय योग्य तिथे दिले, हा बोनस.
4 May 2012 - 2:17 pm | पिंगू
चला काका, आता मला चहा कधी पाजणार?
- पिंगू
4 May 2012 - 2:25 pm | गणपा
किस्सा आवडला. :)
4 May 2012 - 2:55 pm | प्यारे१
चला काका, फुगेवाडीला.
अशोककडे पिंगूला घेऊन चहा प्यायला जाऊ.
पण अशोक चांगला चहा देतो म्हणून चहावालाच राहिला बिचारा.
आता तो मॅनेजर कसा होईल ब्रं????
खरंच चांगलं च्या नावाखाली लोक काहीही आणि भरपूर महाग खपवतात.
4 May 2012 - 5:14 pm | चिरोटा
गोष्ट जुनी आहे. अशोकचे अशोकराव झाले असून 'अशोक अमृततुल्य'चे अशोक बार आणि रेस्टोरंट झाले आहे.(असा माझा अंदाज).
4 May 2012 - 5:23 pm | गणपा
पऱ्या लक्ष आहे ना इकडे?
अजून एका पाणवठ्याची सोय झाली बर्का. ;)
5 May 2012 - 10:20 am | प्रचेतस
नाय नाय.
अजूनही हॉटेल अशोकच आहे. पण आता जागा मोठी झालीय.
तिथली मिसळ आणि भजी पण लै भारी आहेत.
त्याला पुणे मुंबई रस्ता रूंदीकरणासाठी ३/४ वेळा जागा बदलाव्या लागल्या. आता मात्र स्थिर आहे.
5 May 2012 - 12:21 pm | पिंगू
वल्लीशेठ, ठरवा आता कधी जायचं ते. वेळ काढून मीपण येतोच.
- (आमंत्रणाच्या प्रतिक्षेत) पिंगू
5 May 2012 - 12:24 pm | प्रचेतस
कधीपण चला.
आपण तयार आहोतच.
5 May 2012 - 4:21 pm | मी ऋचा
त्यांनाही अकुंनी टिप्स दिल्यात वाटतं! :)
4 May 2012 - 5:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व्वा काका, प्रसंग आवडला. मोठ्या माणसांनी काही सांगितल्यावर ' च्यायला, काय ही कीटकीट ' असा हा कुरकुरण्याचा काळ. पण, या कीटकीटीला सकारात्मक दृष्टीने घेतले तर आयुष्यही बदलू शकते, अशी साठा उत्तराची सफळ कहाणी आवडली.
-दिलीप बिरुटे
4 May 2012 - 5:32 pm | किसन शिंदे
किस्सा छान आहे पण वर्षा-दिड वर्षात तो मुलगा वेटरचा मॅनेजर झाला हे वाचून आश्चर्य वाटलं.
4 May 2012 - 5:36 pm | परिकथेतील राजकुमार
अल्ला मेहेरबान तो गधा पेहेलवान !
4 May 2012 - 6:52 pm | विश्वनाथ मेहेंदळे
किस्ना, तो मुलगा त्या प्रसंगाआधी किती काळ वेटर चे काम करत होता ते कसे कळणार? म्हणजे तो लागला त्याच दिवशी हा प्रसंग घडला असता तर आश्चर्य, पण समजा तो त्या आधी २ वर्षे हे काम करत होता, तर एकूण अनुभव झाला की नाही ३.५ वर्षांचा ?
बाय द वे, किती वर्षांनी मॅनेजर झाला तर आश्चर्य नाही वाटणार तुला? :-)
4 May 2012 - 7:02 pm | किसन शिंदे
वेटर म्हणून ३-४ वर्ष काढली असतील तर असो पण म्हणून काय वेटर नंतर डायरेक्ट मॅनेजर होतो का कुणी?
4 May 2012 - 7:20 pm | चिरोटा
आय टी सारखे तिकडे जुनियर वेटर,सिनियर वेटर,टीम लीडर ,प्रिन्सिपल वेटर,स्क्रम मास्टर वेटर आहे का ?
5 May 2012 - 2:17 pm | विश्वनाथ मेहेंदळे
CCD मधली पदांची उतरंड (job heirarchy) यावर प्रकाश टाकच तू आता.
5 May 2012 - 2:23 pm | स्पा
काय विमे...
शाब्दिक वाद घालण्याची खुमखुमी आलीये वाटत ;)
5 May 2012 - 2:38 pm | मोदक
लॉजीकल वाद घालतोय तोपर्यंत ठीक आहे...
ते आऊटलेट CCD ची फ्रँचाईसी असेल आणि तो मुलगा फ्रँचाईसी मालकाचा जावई झाला असेल तर काही दिवसांमध्ये मॅनेजरच काय मालकही होईल.. :-D
5 May 2012 - 2:42 pm | स्पा
हो येस.. यावरून तुम्ही सांगितलेला किस्सा आठवला मला
5 May 2012 - 2:59 pm | मोदक
पुण्याला ये ना... डोंबीवलीहून कशाला..? ;-)
4 May 2012 - 6:20 pm | अशोक पतिल
छान किस्सा ! प्रत्येकाला असे अनुभव कधी कधी आलेले असतील .
4 May 2012 - 6:25 pm | तिमा
मला 'कहाण्या' आवडतात. उतु नये मातु नये, घेतला वसा टाकू नये.
4 May 2012 - 6:43 pm | गणपा
आपले ते 'किस्से' दुसर्याच्या त्या 'कहाण्या' असेच कायसे आठवले. ;)
6 May 2012 - 10:17 am | तिमा
प्रतिक्रिया हलकेच घ्यायच्या असतात, हे तुमच्या स्मायलीवरुन समजले. तसेच ते इतरांनाही समजावे ही सदिच्छा.
4 May 2012 - 7:17 pm | कर्ण
छान केले .. तेंव्हाच्या तेंव्हा टोकला पाहिजे.
5 May 2012 - 12:26 am | मराठे
टोकला पाहिजे ? म्हणजे काय बॉ?
"तो बघ कसा घुरतोय मला" याच पठडीतलं वाक्य वाटतंय.
4 May 2012 - 7:18 pm | फारएन्ड
"ये बच्चा जिंदगीभर जुते पॉलिश नही करेगा" आठवले :)
5 May 2012 - 2:24 pm | नितिन थत्ते
आवडला.
6 May 2012 - 5:50 am | शुचि
एकच प्रामाणिक शंका आहे - तुम्ही बोट बुडवलेला चहा त्याने फेकला की तुम्हाला दिला की अन्य कोणाला दिला.
6 May 2012 - 7:56 am | संजय क्षीरसागर
त्यापेक्षा सीसीडी सारख्या ठिकाणी, चहात बोट बुडवून, तो एकाच वेळी पिण्यास योग्य - म्हणजे गार कि गरम, गोड कि अगोड, कितपत उकळलेला वगैरे गोष्टींचा माग काढण्याचं लेखकाचं धारिष्ट्य पहावं
शिवाय चित्रदर्शी आणि सर्वस्पर्शी लेखनाचा नमुना म्हणून लेखाचा आनंद घ्यावा
चित्रदर्शी म्हणजे एकाच वेळी स्वतःची सांपत्तिक स्थिती (तुम्ही बिल द्या तो पर्यंत मी कार इकडे आणतो), कुटुंबातील व्यक्तींच्या माहिती, त्यांची शैक्षणिक आहर्ता (कन्या इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होती), त्यांची अभिरुचि (पण कॉफीच्या कपाला अॅम्बियन्स च्या नावाखाली ७०-८०रुपये मोजणे), स्वतःचा दिनक्रम (रात्री जेवण झाले की आम्ही लाँग राईडला जात असू ), स्वतःची विचारप्रणाली ("स्कूल ऑफ थॉट्स"), नोकरीतील हुद्दा (एक तर आमचे उभे आयुष्य कामगारा मधे गेलेले), इतकेच नव्हे तर जामातांचे वास्तव्य (पुढे १-१.१/२ वर्षानंतर ति व जावई भारतात आले), जाताजाता वाचकांना मार्गदर्शन (उन्हाच्या वेळी पॅटिओ मधे न बसता आत ए.सी त बसावे) आणि शेवटी स्वतःचे कर्तृत्व ( अनेक कामगारांना मी शिकवले होते..नाठाळात बदल करून कामास उद्युक्त केले होते)! हे सर्व लेखकानं मोठ्या खुबीनं केलंय, आणि
सर्वस्पर्शी म्हणजे वाचकांना स्पर्शानुभूती देणं (मी चहात बोट बुडवले तर चहा अगदी कोमट !) ही कमाल पाहावी आणि नुसते `ठिक वाटला' असे मोघम प्रतिसाद एखादे वेळी लेखकास हतोत्साह करू शकतात याचीही दखल घ्यावी
शिवाय लेखाचा मतितार्थ बघता `तुम्ही बोट बुडवलेला चहा त्याने फेकला की तुम्हाला दिला की अन्य कोणाला दिला?' यापेक्षा ..` की तुम्ही बोट बुडवलेला चहा त्यानी कृतकृत्य होऊन स्वतःच प्राशन केला?' असा प्रश्न योग्य ठरला असता.
6 May 2012 - 8:15 am | चिरोटा
बोट बुडवलेला चहा त्याने दुसर्या कुणालातरी दिला असणार. म्हणूनच मॅनेजर केला त्याला दीड वर्षात.
6 May 2012 - 12:35 pm | नितिन थत्ते
हा प्रतिसाद आवडला नाही.
6 May 2012 - 7:30 pm | विश्वनाथ मेहेंदळे
एकदम असेच म्हणतो. मलाही अजिबात आवडला नाही. पूर्वग्रहदुषित वाटला (नसेलही कदाचित, पण वाटला)
6 May 2012 - 10:36 am | अविनाशकुलकर्णी
अजुन एक किस्सा लिहित आहे..
6 May 2012 - 11:58 am | नाना चेंगट
अरे देवा ! आता कशात बोट घातलंत??
6 May 2012 - 4:30 pm | कुंदन
आच्र्ट नान्या...
6 May 2012 - 4:47 pm | संजय क्षीरसागर
हे निव्वळ अनुमानानं सांगतो.
6 May 2012 - 11:58 am | सहज
हा लेख आवडला.
पेपर, नियतकालिकांमध्ये छापून यावा असा लेख आहे [बहुदा सीसीडीचा थेट नामोल्लेख टाळून]..
अविनाशकुलकर्णी यांनी आपल्या इतर धाग्यांनी जी प्रतिमा निर्माण केली आहे त्याला छेद देणारा लेख. अजुन येउ द्या.