✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

जुनी गोष्ट आहे.

अ
अविनाशकुलकर्णी यांनी
Fri, 05/04/2012 - 11:23  ·  लेख
लेख
जुनी गोष्ट आहे. कन्या इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होती.. व लग्न हि ठरले होते तिचे. रात्री जेवण झाले की आम्ही लॉग राईडला जात असू .. दिवसभरातल्या गप्पा..पी.जे मजा यायची.. घरी जाताना कुठेतरी कॉफी असा कार्य क्रम असायचा.. मुलगी नव्या पिढीतली असल्याने सी.सी.डी वा तत्सम मध्ये कॉफी पिण्यास जाण्याचा आग्रह करीत असे.. मुळात मला कॉफी आवडत नाही..आम्ही चहा बाज.. त्यांतून जगातला सुंदर चहा फुगेवाडीच्या अशोक च्या टपरीवर मिळतो असे ठाम मत.. खर मला म्हणजे कॉफी शॉप ही नवी संस्कृती फारशी पसंत नाहि..नव्यास विरोध असे नाही पण कॉफीच्या कपाला अ‍ॅम्बियन्स च्या नावाखाली ७०-८०रुपये मोजणे मला पटत नाही..त्या मुळे मी ते टाळत असे.. असो. शेवटी कन्यच्या आग्रहा खातर आमची फौज सी.सी.डीला गेली.. मुलीचा व मैत्रिणीचा या ठिकाणी राबता असावा.कारण ऑर्डर घेणा~या मुलाने तिला ओळखीचे स्मित हास्य दिले. हिने व कन्याने कॉफी मागवली व मी चहा.. व आम्ही गप्पात रंगलो.. थोड्याच वेळात त्या युवकाने कॉफी व चहा सर्व्ह केला. चहा विदेशी पद्धतीने दिला होता म्हणजे चहा निराळा साखर व दूध निराळे.. मी पण चहाच्या बॅग्ज्स डीप डीप करत होतो...कपाला हात लावल्यावर मला कप गरम लागला नाही म्हणून मी चहात बोट बुडवले तर चहा अगदी कोमट व पिण्या योग्य नसल्याचे ध्यानात आले.. त्या मुळे मी त्या मुलास हाक मारली व चहा कोमट असल्याचे सांगितले. त्या वर त्याने "बहुतेक हीटर ची कॉइल गेली असेल..व दूध तर गरम आहे " असे सांगू लागला. मला त्या सबबी पटेनात..एक तर आमचे उभे आयुष्य कामगारा मधे गेलेले..किती अडचणी असल्या तरी त्या वर मात करीत जॉब अचूक झालाच पाहिजे अश्या "स्कूल ऑफ थॉट्स" मधून मी आलेला असल्याने मी त्याला सबबी न सांगणे..अडचणीवर मात करणे ग्राहक व सेवा यावर १-दीड मिनिटात सुनावले व जर चहा गरम होत नसेल तर हरकत नाही ऑर्डर कॅन्सल करा असे म्हणून विषय संपवला.. त्याने पण तो गार चहा उचलला व निघून गेला... तो गेल्यावर कन्या भडकली व म्हणाली.." पपा तुम्ही म्हणजे न..किती लेक्चर दिले त्याला... हे ऐकल्यावर आर्यपत्नी तरी कशी संधी सोडेल? कन्येच्या सुरात सुर मिसळतं तिची री ओढत त्या वदल्या "नाही तर काय..पपाला कुठे काय बोलावे समजतच नाही.. नुसते चहा गार आहे गरम करून आण इतके बोलायचे सोडून बसले लेक्चर देत.." त्या वर मी काहीच बोललो नाही..पण माझी प्रतिक्रिया खुप उत्स्फूर्त/प्रतिक्षिप्त होती..का कुणास ठाऊक सबबी सांगणारे डोक्यात जातात..थोडे शांत झाल्यावर मात्र मला हि पटले इतके बोलायची काही गरज नव्हती.. शेवटी दोघीची कॉफी पिणे संपल्यावर बिलाची वाट पाहतं बसलो.. मी हिला सांगितले तुम्ही बिल द्या तो पर्यंत मी कार इकडे आणतो..व चालू पडलो.. चार पाउले चाललो नसेल तेव्हढ्यात मुलीची हाक आली मागे वळून पाहिले तर त्या युवकाने चहा आणलेला होता.. मी परत फिरलो..चहा व्यवस्थित गरम होता.त्याला थ्यांक्स केले व चहा घेतला व बिल देऊन आम्ही बाहेर पडलो.मला खात्री होती की कामगारा ने मनात आणले की तो अडचणीवर मात करू शकतो..मात्र मनात नसेल तर ... पुढे कन्यचे लग्न झाले व ति सासरी गेली.त्या मुळे सारेच बंद झाले.. पुढे १-१.१/२ वर्षानंतर ति व जावई भारतात आले. एका दुपारी बहिणीची मुलगी पण राहायला आली होती..गप्पा मारताना एकदम सी.सी.डी ला जायचे ठरले. सी.सी.डी म्हटल्यावर हि व मुलगी माझ्याकडे बघून हसले व मलाही तो जुना प्रसंग आठवला. कपडे बदलून सारे तयार होत होतो तितक्यात हिने मुली समोर दादा गिरी करत मला दटावले व जावया समोर लेक्चर बाजी नको.चहा गार असेल तर मला सांगा मी व्यवस्था करते असा दम भरला. च्यायला..बायका कुठे कसे उट्टे काढतील याचा नेम नसतो. आम्ही सी.सी.डी च्या कॉफी शॉप मध्ये गेलो..५-५.३० चा सुमार असल्याने पॅटिओ मधे न बसता आत ए.सी त बसलो..मी मेनू कार्ड चाळत होतो.तेव्हढ्या मुलगी समोर उभ्या असलेल्या एक्सेकुटिव्ह लुक असलेल्या युवकाशी बोलत असल्याचे लक्षात आले..साधारण तो तिला हल्ली दिसत नाहीत व त्यावर ति सांगत होती की लग्न झाले असून भारतात नसते अश्या स्वरूपाचे बोलणे काना वर आले..त्याने पण माझ्या कडे बघून एक स्मित हास्य केले व मी पण परत फेड केली. ओळखींचा वाटत होता पण नेमका कोण लक्षात येईना. तो गेल्यावर कन्या म्हणाली पपा .ओळखला का याला? तुम्ही त्याला चहा गार दिला म्हणून लेक्चर दिले तो..आता हा या ब्रॅंच चा मॅनेजर आहे. मी बर म्हतले. आम्ही ऑर्डर दिली मी चहाच मागवला. चहा मात्र यावेळी चांगला गरम होता.. गप्पा टप्पा संपल्यावर बिल आले मी बिल चेक करून पैसे काढले तेव्हढ्यात तो युवक समोर आला व मला म्हणाला.. सर चहा मनासारखा गरम होता ना? मी ओळखले की तो युवक हि तो प्रसंग विसरलेला नाही.. हो मस्त मजा आली चहा पिताना.. मी त्याला हसत म्हटले. तुम्हाला आठवते का एकदा चहा गार होता म्हणून तुम्ही मला काही टिप्स दिल्या होत्या... संभाषण नेमके कुठल्या दिशेने जाणार न कळल्याने मी सावधपणे म्हटले ..हो चहा त्या वेळी फारच गार होता म्हणून जरा चिडलो पण होतो.. त्या वर तो हसत म्हणाला..पण सर त्या प्रसंगा नंतर व टिप्स मुळे मी मात्र बदललो..कामा कडे बघण्याचा माझा नजरीया बदलला. व मीजास्त इन्वॉल्व होऊन काम करू लागलो... माझ्यातला बदल म~नेजमेंटच्या पण लक्षात आला व काही महिन्या पूर्वीच मला प्रमोशन मिळाले व मी या ब्रांच्यचा इनचार्ज आहे.... ते ऐकून मला मात्र खूपं बरे वाटले.. अनेक कामगारांना मी शिकवले होते..नाठाळात बदल करून कामास उद्युक्त केले होते.. वा अभिनंदन ...असे म्हणून मी त्याच्या कडे बघून हसलो..व पैसे बिला जवळ ठेवले. पुढे तो म्हणाला.. सर मी आपणास एक विनंती करतो की आजची ट्रीट तुमच्या परिवारास माझ्या कडुन..कृपया पैसे देऊ नका..व ट्रीट कबुल करा.. मी पण काहि न बोलता त्याच्या विनंतीस मान देऊन पैसे खिशात ठेवले.. खूपं बरे वाटत होते.. जाताना त्याच्या पाठी वर एक कौतुकाची थाप मारत कीप इट अप असे म्हणत बाहेर पडलो.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज

प्रतिक्रिया द्या
10557 वाचन

💬 प्रतिसाद (66)

प्रतिक्रिया

सूपर.....

मुक्त विहारि
Fri, 05/04/2012 - 11:30 नवीन
हे असेच तूमच्या सारखे साहेब मला पण भेटले.... घरकी मुर्गी डाल बराबर... आणि स्वामी तिन्ही जगाचा, पत्नी-पुढे नंदी बैल. .... ही जगरहाटी आहे... त्यामूळेच तर आपले पाय जमीनीवर राहतात..
  • Log in or register to post comments

जरा अतिरंजक वाटतेय पण गोष्ट

स्पा
Fri, 05/04/2012 - 11:32 नवीन
जरा अतिरंजक वाटतेय पण गोष्ट म्हणून आवडली
  • Log in or register to post comments

इतके सिनिकल असू नये

विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 05/04/2012 - 18:59 नवीन
इतके सिनिकल असू नये माणसाने... असो, कुणी कसे.... ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

मग तुम्ही लिहा की अशी

आशु जोग
Sat, 05/05/2012 - 00:41 नवीन
मग तुम्ही लिहा की अशी गोष्ट तुमाला नक्की जमेल पण अशी खिळवून ठेवणारी हवी २, ४ पात्र अ‍ॅड करा. (कुणाला सांगू नका मी टिप्स दिल्या म्हणून)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

चहा आवडला

कुंदन
Fri, 05/04/2012 - 11:34 नवीन
चहा आवडला काका , पण त्या एकोळी जिलब्या नाही ब्वॉ आवडत आपल्याला.
  • Log in or register to post comments

छान

JAGOMOHANPYARE
Fri, 05/04/2012 - 11:47 नवीन
छान
  • Log in or register to post comments

ओक्के !

परिकथेतील राजकुमार
Fri, 05/04/2012 - 11:50 नवीन
ओक्के !
  • Log in or register to post comments

बिअर थंड

प्रकाश घाटपांडे
Fri, 05/04/2012 - 12:15 नवीन
म्हनुन परा बिअर खोलायच्या आदुगर थंड आहे कि नाही हे हात लावुन चेक करतो. नंतर बूच खोलल्यावर वांधा नको!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

लै भारी!

संजय क्षीरसागर
Fri, 05/04/2012 - 13:20 नवीन
पण मग वेटरचा मॅनेजर कसा होणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

मॅनेजर? छे मालक !!

नाना चेंगट
Fri, 05/04/2012 - 13:24 नवीन
पराला बिअर चढल्यावर (कोण रे म्हणतो की कधी उतरते?) काहीच भान रहात नाही. त्यामुळे भरमसाट टिप देतो. असे कळले आहे की तो वेटर आता हाटीलच खरेदी करणार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

हम्म्म

परिकथेतील राजकुमार
Fri, 05/04/2012 - 13:32 नवीन
हे माझे कौतुक चालू आहे का चारित्र्यहनन ते लक्षात आले की प्रतिक्रिया देईन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

चारित्र्यहनन

आदिजोशी
Fri, 05/04/2012 - 14:23 नवीन
चारित्र्यहनन शब्द मनाला पार पार भिडला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

म्हणजे परा `चेक' करत नाही

संजय क्षीरसागर
Sat, 05/05/2012 - 11:25 नवीन
डायरेक्ट `कॅशच' देतो! तुम्ही लेखकाचं पाहा त्यांनी प्रत्येक गोष्ट चेक करण्याची सवय लावून घेतलीये आणि बील माफ झाल्यावर कॅश खिशात ठेवली आहे त्यामुळे वेटरचा मॅनेजर झालायं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

असे कळले आहे की तो वेटर आता

बिपिन कार्यकर्ते
Fri, 05/04/2012 - 14:01 नवीन
असे कळले आहे की तो वेटर आता हाटीलच खरेदी करणार आहे.
आणि मालक झाल्यावर तो सगळ्यात पहिल्यांदा पर्‍याला तिथून हाकलणार आहे. नाहीतर परा नवीन वेटरलाही अशाच टिपा देत राहील आणि मग तो नवीन वेटर या जुन्या वेटरला मालक म्हणून ओव्हरटेक करेल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

सहमत आहे पर्‍याला सगळे हाकलत

नाना चेंगट
Fri, 05/04/2012 - 14:06 नवीन
सहमत आहे पर्‍याला सगळे हाकलत असतात बिचारा हा बार तो बार असा भटकत असतो नशीब !! काय करणार तो तरी !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

"बार बार देखो... हजार बार

राजो
Fri, 05/04/2012 - 17:40 नवीन
"बार बार देखो... हजार बार देखो..." :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

एकदम करेक्टंय!

संजय क्षीरसागर
Fri, 05/04/2012 - 15:57 नवीन
म्हणून तर जास्त `टेक' केलेल्या माणसाला, यानी आज `ओव्हरटेक' केलीये म्हणतात आणि मग त्याला सुखरूप घरी पोहोचवायच काम कुणाला तरी `अंडरटेक' करावं लागतं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

हेहेहेहे वाचून टेकीस आलो

बॅटमॅन
Fri, 05/04/2012 - 18:19 नवीन
हेहेहेहे वाचून टेकीस आलो :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

छान

चिरोटा
Fri, 05/04/2012 - 11:51 नवीन
गोष्टीतून शिकण्यासारखे आहे. विदेशी पद्धतीने चहा भारतातल्या हॉटेलात देणे मला वेडेपणाचे वाटते.शिवाय अनेक सी.सी.डी.मध्ये पाश्चात्य संगित का वाजवतात हे ही कळत नाही.
  • Log in or register to post comments

रोजचीच गोष्ट आहे!

संजय क्षीरसागर
Fri, 05/04/2012 - 12:34 नवीन
तुम्ही तीन गोष्टी एकदम साधल्यात: सतत उत्स्फूर्ततेनं वागणार्‍या पुरूषांना अत्यंत निकटच्या स्त्रिवर्गानं कितीही नामोहरम केलं तरी त्यांनी उत्साह सोडू नये हे दाखवून दिलंत आपण बरोबर असू तर मागे हटण्याची गरज नाही मग कुणीका मागे खेचेना आणि सीसीडी असो की बीबीसी, अजिबात सोडायच नाही, ....आणि जो या सर्व अडथळ्यांची शर्यतपार करतो तो अंतीम विजयी ठरतो पण एक गोष्ट सांगायची राहिली, इतरांना त्याचं काही कौतुक नसतं मग त्यांची आपली पुन्हा रोजचीच गोष्ट सुरु होते!
  • Log in or register to post comments

मस्त

रणजित चितळे
Fri, 05/04/2012 - 12:42 नवीन
वाचुन खूप मजा आली. ..का कुणास ठाऊक सबबी सांगणारे डोक्यात जातात.. अगदी खरे आहे.
  • Log in or register to post comments

आवडले

सानिकास्वप्निल
Fri, 05/04/2012 - 12:49 नवीन
आवडले :)
  • Log in or register to post comments

धमाल किस्सा. बाकी तो

प्रचेतस
Fri, 05/04/2012 - 12:55 नवीन
धमाल किस्सा. बाकी तो फुगेवाडीच्या अशोकचा चहा म्हणजे लाजवाब.
  • Log in or register to post comments

बाकी तो फुगेवाडीच्या अशोकचा

धन्या
Fri, 05/04/2012 - 20:58 नवीन
बाकी तो फुगेवाडीच्या अशोकचा चहा म्हणजे लाजवाब.
बहुतेक आम्ही नाणेघाट सहलीला जाताना हा चहा घेतला होता. सहलीतील जाणकार प्रकाश टाकतीलच. हे लेखन मुक्तक/कथा/स्फुट म्हणून आवडलं. वास्तवात असं होईल असं वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

काका, CCD वगैरे थेरं मलाही नाही आवडत

इष्टुर फाकडा
Sat, 05/05/2012 - 17:31 नवीन
लेख आवडला
  • Log in or register to post comments

किप इट अप.

प्रभाकर पेठकर
Fri, 05/04/2012 - 13:43 नवीन
मला अज्जिबात अतिरंजीत वाटले नाही. मी ही अस्साच आहे. चूकीच्या गोष्टी न विसरता नजरेत आणाव्यात. सेवेत फरक पडू शकतो. सेवाभाव मनी नसलेले अनेक व्यावसायिक भेटतात. अगदी आश्चर्य वाटते. ही माणसे उपहारगृहासारख्या सेवा व्यवसायात टिकतातच कशी? अनेकांना सल्ले देताना घरच्यांची नाराजी मी ही ओढाउन घेतली आहे. पत्नीला सुधारण्याच्या प्रयत्नात पडत नाही (एकतर तिचे ते {सुधारण्याचे} वय उलटून गेले आहे आणि संभाव्य 'दुष्परिणाम' टाळावेत असे माझे धोरण आहे.) पण मुलाला हमखास सांगतो,' हजार जणांना सांगितल्यावर निदान एकजण जरी बदलला तरी मी ते माझे यश समजतो. अविनाशकुलकर्णीसाहेब, तुम्ही केलेत ते योग्यच केलेत. फक्त तुम्ही भारच भाग्यवान आहात की समोरच्या व्यक्तीने त्याच्या व्यक्तिमत्वात झालेल्या सकारात्मक बदलाचे श्रेय आपणास दिले. तुम्हालाही सांगावेसे वाटते 'किप इट अप.'
  • Log in or register to post comments

>पत्नीला सुधारण्याच्या प्रयत्नात पडत नाही

संजय क्षीरसागर
Fri, 05/04/2012 - 14:18 नवीन
मग काय मजा? पुलंनी म्हटलंय ते त्यांच्या अध्यात्मिक मित्राकडे गेले तेव्हा घरातल्या भिंतीवर त्यानं जरा सुद्धा मोकळी जागा सोडली नव्हती. अनेकानेक गुरुंचे शिर्षासनातले, भस्मविलेपित, फासळ्या दाखवणारे, नुसत्या नजरेनं भस्म करतील असे, त्रिशूळावर बसून साधना करणारे इतके फोटो होते की दत्तानं अकरा गुरू केले असं ऐकिवात होतं पण या मित्रानं केलेले गुरू दत्तत्रेयानं पाहिले असते तर दोन्ही हाताची दाही बोटं तिन्ही तोंडात घातली असती. पण उजव्या कोपर्‍यातला फोटो बघून मात्र पुलंना स्वतःला तोंडात बोट घालण्याची वेळ आली कारण त्या फोटोत मित्राची बायको त्याला नमस्कार करत होती! सो डोंट गिव्ह अवे, कीप इट अप!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

सहमत

प्रदीप
Fri, 05/04/2012 - 18:35 नवीन
अविनाशकुलकर्णीसाहेब, तुम्ही केलेत ते योग्यच केलेत. फक्त तुम्ही भारच भाग्यवान आहात की समोरच्या व्यक्तीने त्याच्या व्यक्तिमत्वात झालेल्या सकारात्मक बदलाचे श्रेय आपणास दिले. तुम्हालाही सांगावेसे वाटते 'किप इट अप.'
समोरच्या व्यक्तिच्या व्यक्तिमत्वात बदल झाला हेच मुळात अत्यंत छान आहे. त्याने त्याचे श्रेय योग्य तिथे दिले, हा बोनस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

चला काका, आता मला चहा कधी

पिंगू
Fri, 05/04/2012 - 14:17 नवीन
चला काका, आता मला चहा कधी पाजणार? - पिंगू
  • Log in or register to post comments

किस्सा आवडला.

गणपा
Fri, 05/04/2012 - 14:25 नवीन
किस्सा आवडला. :)
  • Log in or register to post comments

चला काका, फुगेवाडीला. अशोककडे

प्यारे१
Fri, 05/04/2012 - 14:55 नवीन
चला काका, फुगेवाडीला. अशोककडे पिंगूला घेऊन चहा प्यायला जाऊ. पण अशोक चांगला चहा देतो म्हणून चहावालाच राहिला बिचारा. आता तो मॅनेजर कसा होईल ब्रं???? खरंच चांगलं च्या नावाखाली लोक काहीही आणि भरपूर महाग खपवतात.
  • Log in or register to post comments

गोष्ट

चिरोटा
Fri, 05/04/2012 - 17:14 नवीन
गोष्ट जुनी आहे. अशोकचे अशोकराव झाले असून 'अशोक अमृततुल्य'चे अशोक बार आणि रेस्टोरंट झाले आहे.(असा माझा अंदाज).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

पऱ्या लक्ष आहे ना इकडे?अजून

गणपा
Fri, 05/04/2012 - 17:23 नवीन
पऱ्या लक्ष आहे ना इकडे? अजून एका पाणवठ्याची सोय झाली बर्का. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

नाय नाय. अजूनही हॉटेल अशोकच

प्रचेतस
Sat, 05/05/2012 - 10:20 नवीन
नाय नाय. अजूनही हॉटेल अशोकच आहे. पण आता जागा मोठी झालीय. तिथली मिसळ आणि भजी पण लै भारी आहेत. त्याला पुणे मुंबई रस्ता रूंदीकरणासाठी ३/४ वेळा जागा बदलाव्या लागल्या. आता मात्र स्थिर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

वल्लीशेठ, ठरवा आता कधी जायचं

पिंगू
Sat, 05/05/2012 - 12:21 नवीन
वल्लीशेठ, ठरवा आता कधी जायचं ते. वेळ काढून मीपण येतोच. - (आमंत्रणाच्या प्रतिक्षेत) पिंगू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

कधीपण चला. आपण तयार आहोतच.

प्रचेतस
Sat, 05/05/2012 - 12:24 नवीन
कधीपण चला. आपण तयार आहोतच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंगू

त्यांनाही अकुंनी टिप्स

मी ऋचा
Sat, 05/05/2012 - 16:21 नवीन
त्यांनाही अकुंनी टिप्स दिल्यात वाटतं! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

व्वा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 05/04/2012 - 17:16 नवीन
व्वा काका, प्रसंग आवडला. मोठ्या माणसांनी काही सांगितल्यावर ' च्यायला, काय ही कीटकीट ' असा हा कुरकुरण्याचा काळ. पण, या कीटकीटीला सकारात्मक दृष्टीने घेतले तर आयुष्यही बदलू शकते, अशी साठा उत्तराची सफळ कहाणी आवडली. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

किस्सा छान आहे पण वर्षा-दिड

किसन शिंदे
Fri, 05/04/2012 - 17:32 नवीन
किस्सा छान आहे पण वर्षा-दिड वर्षात तो मुलगा वेटरचा मॅनेजर झाला हे वाचून आश्चर्य वाटलं.
  • Log in or register to post comments

हॅ हॅ हॅ

परिकथेतील राजकुमार
Fri, 05/04/2012 - 17:36 नवीन
अल्ला मेहेरबान तो गधा पेहेलवान !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

किस्ना, तो मुलगा त्या

विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 05/04/2012 - 18:52 नवीन
किस्ना, तो मुलगा त्या प्रसंगाआधी किती काळ वेटर चे काम करत होता ते कसे कळणार? म्हणजे तो लागला त्याच दिवशी हा प्रसंग घडला असता तर आश्चर्य, पण समजा तो त्या आधी २ वर्षे हे काम करत होता, तर एकूण अनुभव झाला की नाही ३.५ वर्षांचा ? बाय द वे, किती वर्षांनी मॅनेजर झाला तर आश्चर्य नाही वाटणार तुला? :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

किती त्या चौकश्या??

किसन शिंदे
Fri, 05/04/2012 - 19:02 नवीन
वेटर म्हणून ३-४ वर्ष काढली असतील तर असो पण म्हणून काय वेटर नंतर डायरेक्ट मॅनेजर होतो का कुणी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

3/4

चिरोटा
Fri, 05/04/2012 - 19:20 नवीन
आय टी सारखे तिकडे जुनियर वेटर,सिनियर वेटर,टीम लीडर ,प्रिन्सिपल वेटर,स्क्रम मास्टर वेटर आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

CCD मधली पदांची उतरंड (job

विश्वनाथ मेहेंदळे
Sat, 05/05/2012 - 14:17 नवीन
CCD मधली पदांची उतरंड (job heirarchy) यावर प्रकाश टाकच तू आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

काय विमे... शाब्दिक वाद

स्पा
Sat, 05/05/2012 - 14:23 नवीन
काय विमे... शाब्दिक वाद घालण्याची खुमखुमी आलीये वाटत ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

लॉजीकल वाद घालतोय तोपर्यंत ठीक आहे...

मोदक
Sat, 05/05/2012 - 14:38 नवीन
लॉजीकल वाद घालतोय तोपर्यंत ठीक आहे... ते आऊटलेट CCD ची फ्रँचाईसी असेल आणि तो मुलगा फ्रँचाईसी मालकाचा जावई झाला असेल तर काही दिवसांमध्ये मॅनेजरच काय मालकही होईल.. :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

येस

स्पा
Sat, 05/05/2012 - 14:42 नवीन
हो येस.. यावरून तुम्ही सांगितलेला किस्सा आठवला मला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

पुण्याला ये ना... डोंबीवलीहून कशाला..? ;-)

मोदक
Sat, 05/05/2012 - 14:59 नवीन
पुण्याला ये ना... डोंबीवलीहून कशाला..? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

छान किस्सा ! प्रत्येकाला असे

अशोक पतिल
Fri, 05/04/2012 - 18:20 नवीन
छान किस्सा ! प्रत्येकाला असे अनुभव कधी कधी आलेले असतील .
  • Log in or register to post comments

म्हणूनच

तिमा
Fri, 05/04/2012 - 18:25 नवीन
मला 'कहाण्या' आवडतात. उतु नये मातु नये, घेतला वसा टाकू नये.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा