एक रस्ता असाही ...

निश's picture
निश in जे न देखे रवी...
3 May 2012 - 12:52 pm

एका गजबजलेल्या रस्त्यावर एक पोर भिक मागत आपल्याकडे,
भुकेने व्याकु़ळ असुनही आपल्या नजरेतील हेटळणीचा विखार
त्यालाही उमजतो व तो रडवेला होतो.
त्याला तसाच रडवेला करुन आपण गाडी रेमटवतो .
गाडीच्या धुराशी आपणच सोडत असलेल्या सिगरेटच्या धुर एकमेकात मिसळुन.
आपली सिगारेट महाग असते त्या पोराच्या भुकेपुढे ....

त्याच रस्त्यावर एका कडेला एक रुग्णालय असत.
एकदम पंचतारांकीत म्हणता येईल अस .
त्याच्या समोर असाच एक अपघात होतो आपल्या समोर.
पण जखमेने मरणपंथाला लागलेल्या अभागी जीवाला
रुग्णालयात घेउन जायच म्हटल की मन मात्र घाबरत.
त्याला तिथेच सोडुन आपल मन आपल्यासकट तिथुन सटकत.

त्याच रस्त्यावर एक सिग्नल असतो.
त्याचे नियम आपल्या साठी नसतातच कधी.
वाटल तर पाळायचे नाहीतर सुसाट वेगात आपल्या गाडीखाली तुडवायचे.

त्याच रस्त्यावर भन्नाट वेगात जाताना तंग कपड्यात तरुणी दिसते
नजरेत अधाशीपण व तोंडात शिटी येते.
त्याच वखवखलेपणात आपण गाडी चालवतो जोश्यात.
सिग्नल कधि तोडतो आपण ते कळतच नाही
त्याच रुग्णालयासमोर एकास उडवुन
आपण मात्र गाडी पळवतो वेगात

आपण मात्र गाडी पळवतो वेगात...

कवितामुक्तक

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

3 May 2012 - 1:50 pm | मुक्त विहारि

मस्तच...

स्पा's picture

3 May 2012 - 2:10 pm | स्पा

खूप चान कविता..
अतिशय हळवी करून जाणारी

आपण मात्र गाडी पळवतो वेगात........

शेवट सुन्न करून गेला

मुक्त विहारि साहेब,
मन्या फेणे साहेब ,
तुमचे मनापासुन आभार.

गणामास्तर's picture

4 May 2012 - 3:21 pm | गणामास्तर

तुमच्या कविता नेहमीच अंतर्मुख करुन जातात.
पु.ले.शु.

गणामास्तर साहेब, आपले मनापासुन आभार

चौकटराजा's picture

6 May 2012 - 7:34 am | चौकटराजा

मन थिजलेल्या समाजाचे चित्र .
निशा, हे जग निवडक पुण्यावान माणसांच्या जीवावर चाललं आहे .
है रात अंधेरी पर दिया जलाना कब मना है - नीरज
पु कशु

चौ रा

चौकटराजा साहेब, अतिशय खर बोललात.

खर आहे हे जग निवडक पुण्यावान माणसांच्या जीवावर चाललं आहे .
म्हणुनच आजही ते अंधारात चाचपडत का होईना पण ते ह्याच निवडक पुण्यावान माणसांच्या जीवावर आपली योग्य दिशा चालत आहे. ही लोक आहेत म्हणुन तर चांगल्या गोष्टीं वरचा माझा विश्वास आजही टी़कुन आहे.

चौकटराजा साहेब, अतिशय खर बोललात.