एक रस्ता असाही ...
एका गजबजलेल्या रस्त्यावर एक पोर भिक मागत आपल्याकडे,
भुकेने व्याकु़ळ असुनही आपल्या नजरेतील हेटळणीचा विखार
त्यालाही उमजतो व तो रडवेला होतो.
त्याला तसाच रडवेला करुन आपण गाडी रेमटवतो .
गाडीच्या धुराशी आपणच सोडत असलेल्या सिगरेटच्या धुर एकमेकात मिसळुन.
आपली सिगारेट महाग असते त्या पोराच्या भुकेपुढे ....
त्याच रस्त्यावर एका कडेला एक रुग्णालय असत.
एकदम पंचतारांकीत म्हणता येईल अस .
त्याच्या समोर असाच एक अपघात होतो आपल्या समोर.
पण जखमेने मरणपंथाला लागलेल्या अभागी जीवाला
रुग्णालयात घेउन जायच म्हटल की मन मात्र घाबरत.
त्याला तिथेच सोडुन आपल मन आपल्यासकट तिथुन सटकत.
त्याच रस्त्यावर एक सिग्नल असतो.
त्याचे नियम आपल्या साठी नसतातच कधी.
वाटल तर पाळायचे नाहीतर सुसाट वेगात आपल्या गाडीखाली तुडवायचे.
त्याच रस्त्यावर भन्नाट वेगात जाताना तंग कपड्यात तरुणी दिसते
नजरेत अधाशीपण व तोंडात शिटी येते.
त्याच वखवखलेपणात आपण गाडी चालवतो जोश्यात.
सिग्नल कधि तोडतो आपण ते कळतच नाही
त्याच रुग्णालयासमोर एकास उडवुन
आपण मात्र गाडी पळवतो वेगात
आपण मात्र गाडी पळवतो वेगात...
वा!!
सुन्दर
मुक्त विहारि साहेब, मन्या फेणे साहेब तुमचे मनापासुन आभार.
सुंदर कविता
गणामास्तर साहेब, आपले मनापासुन आभार
मन थिजलेल्या समाजाची
चौकटराजा साहेब, अतिशय खर बोललात.