मी बघत बसतोय माझ्या मुलाकडे ....!!..

प्रकाश१११'s picture
प्रकाश१११ in जे न देखे रवी...
27 Apr 2012 - 12:06 pm

तो माझे बोट धरून चालत असतो शाळेचा रस्ता
माझ्या घराजवळच आहे त्याची शाळा
रस्ता वळला की लगेच दिसू लागते त्याची शाळा
जशी शाळा जवळ येते तशी त्याची पकड घट्ट होते माझ्या बोटांची
थरथर जाणवते त्याच्या बोटांची माझ्या बोटांना
मी पण माझ्या हाताची पकड घट्ट करतो
त्याच्या चिमुकल्या पंजाची
नि अलगद सोडून देतो त्याला त्या घनगर्द जनअरण्यात
पाण्यात ढकलले की प्रथम जसे घाबरायला होते
तसा तो बिचकून जातो
मग कोणी मित्र भेटला की त्याचा हात धरून
हलकेच मला टाटा करतो

रात्री अगदी घट्ट बिलगून झोपतो
मी बघत बसतो त्याच्याकडे
त्याच्या पापण्याची कधीतरी दिसते फडफड
नि त्याच्या बोटांची घट्ट पकड माझ्या बोटाना जाणवत असते
कदाचित त्याला शाळेत जायची वाटत असावी भीती [?]
आणि मी निर्दयपणे त्याला ढकलून देत असतो
ह्या प्रचंड घनगर्द जनअरण्यात
स्वप्न बघत बसतो उद्याची ...
मला त्याला करायचे असते डाक्टर ,इंजिनियर ,नि अधिक काहीतरी
नि नासवून टाकतो त्याचा वर्तमान काळ
त्याच्या मनातील फुलबाग
नि त्याला बनवीत असतो ह्या यंत्रयुगाचा एक खिळा
माझ्या निष्टुर लोखंडी हातांनी ....!!

करुणकविता

प्रतिक्रिया

प्रकाश१११ साहेब, अतिशय सुरेख कविता आहे.
मला माझ्या लहानपणीची आठवण आली.

मी ही असाच शाळेत जायला घाबरायचो.

खरच एक मस्त कविता.

कदाचित आपण आपल्या मुलाना आपली स्वप्न साकारणारी यंत्र बनवत असु .. कदाचित.

पण कविता सुरेख आहे

वेलकम ब्याक प्रकाशजी :)
कविता आवडली :)

पैसा's picture

27 Apr 2012 - 8:11 pm | पैसा

कविता आवडली. पण याच मुलाना मग शाळा, मित्र आणि बाई आवडायला लागतात आणि घरापासून हळूहळू ती सुती होत जातात.

michmadhura's picture

28 Apr 2012 - 3:45 pm | michmadhura

खूपच छान कविता.

दादा कोंडके's picture

28 Apr 2012 - 3:51 pm | दादा कोंडके

शिर्षक वाचून मला वाटलं, आपापल्या पोराबाळांचं कौतुक करणारा आणखी एक धागा आला की काय? :)

मस्त भाव उतरले आहेत.
किती खरं पण तितकंच गरजेचं !!